November 25, 2021

Made for each other

 💞MADE 4 EACH OTHER💞

      " एक अत्युत्तम समुपदेशन" 

         

 (डॅाक्टर चेतन विसपुते यांचे मुंबईच्या वधूवर मेळाव्यातिल भाषणाचे अंश) 


कागदावर जुळलेली पत्रिका

आणि

काळजावर जुळलेली पत्रिका यात  अंतर राहतं.


लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.


वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?


सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.


सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.


निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं

नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?. त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.


- अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.


कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा..  या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.


लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं.


तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे' पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं...

जाब विचारू शकतो आपण?


किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची

आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं - असं स्वप्न आहे!'

पण

प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं.

प्रवासाची आवड कसली?

- कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब... वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर

उत्तर म्हणून फक्त जांभया देतो.

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर...


मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.


तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली.


अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.


पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना

सांगितलंच जात नाहीये;


नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.


आणि मग करा काय??


आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.


धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?-

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी

देऊन मगच संसार मांडायला हवा.


आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या

व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..


ती तृप्तपदी होण्यासाठी हा सर्व ऊपद्व्याप.

हेच संसाराचं खरं मर्म आहे.


आपल्याला ऊदंड वैवाहिक आनंदी आयुष्य लाभो हीच प्रार्थना


"मेड फॉर इच अदर"

आपोआप होत नाहीत.

होत जातात. 💞💞


*...सुप्रभात...*

सेवानिवृत्ती - एक हृदयद्रावक कथा





 सेवा-निवृत्ती शाप की वरदान! 

    वाचा मात्र जरूर!


ह्रदय पिळवटून टाकणारी कथा !!

जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस!

                ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58 व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.

            नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 

                            ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे. आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 

त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो., तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.

रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.

गरजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं. वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत’ असा तिचा आग्रह होता.

हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.

तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,ही जाणीव तिला बोचत असावी. 

खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, *सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ, तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला  काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 

तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 

हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला. आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, ‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!


त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं! ‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’* तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली! *‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’ हे ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणाला, *‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो! 

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणा साठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. 

तिच्या मनांत तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचेबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 

पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचार शक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे *आणि एक दिवस अचानकच तो गेला. सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरांत धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत ‘सॉरी, ही इज नो मोअर’* सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.

तो मात्र त्याच्या स्वभावा प्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘Before Time असं मरण नको होतं ,असा प्रत्येकाचाच सूर होता.

तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले ‘आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली’ असे लोक म्हणत होते . आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ?वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 

आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.

तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.

असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला. पण ‘सतत तुझंच कौतुक कसं  करायचं ?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.

नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?’ असं चिडक्या स्वरांत विचारू लागले. 

तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेंव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण ‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’ हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. 'तुझी  उपयोगिता संपायला आलीय' याची जाणीव लोक आडून पाडून  तीला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासू साठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 

ती रोज आतल्या आत रडायची. ‘देवा, उचल मला’ म्हणून प्रार्थना करायची. ‘भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला’ म्हणत मनातल्या मनांत त्याला दुषणं देत पडून रहायची. 

फारसं आठवायचं नाही तिला काही आज काल. मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते....!

‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता! ‘तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता की आशीर्वाद ? हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं....

मित्रांनो!

आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत व काही निवृत्ती'च्या उबंरठ्यावर आहेत. एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा.

सदरचा लेख कुणी लिहिला ,माहित नाही.  

मात्र लेखकाने लिहीलेले प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, असे जरी ग्रहित धरले तरी देखील, सदरची घटना सहजासहजी  मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही हे निश्चित. मात्र अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवा निवृत्ती नंतर जर घडत असेल, तर हे फारच भयानक व ह्रदयद्रावक चित्र आहे.

जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस"--- 

        हा लेख  रिटायर्ड व्यक्तींनी जरुर जरुर वाचावा.   

       

November 24, 2021

जैविक घड्याळ

 जैविक घड्याळ पाळा, आरोग्यवान व्हा


झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की "लवकर नीजे,  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे " हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही का चालणार ? चला पाहूया....


खरे तर तुमच्या शरीरात एक जैविक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.


रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेलीअसते.

तुमचे यकृतात अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून  विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते.


तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात  साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत होत असते.

तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.


जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो.

जर 12 वाजता झोपलात तर 3 तास

जर 1 वाजता झोपलात तर 2 तास आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी.....

आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?


तर दुर्दैवाने तुमच्या शरीराला खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ मिळणार नाही.


जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर ही विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात  कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?


ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.


पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हालचाली, व्यायाम, आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋणभाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.


सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.


सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.


*असा आहे तुमचा दिवस उत्तम प्रकारे सुरु करण्याचा आणि आरोग्य टिकवण्याचा राजमार्ग....*


ग्रामीण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे हे वेळापत्रक पाळतात. म्हणून ते सदृढ असतात. शहरात रहात असताना मात्र आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युतप्रकाश, टी व्ही आणि मोबाईल गेम्स्,  WhatsAap, Facebook,  ईंटरनेट इ. आहेत. पण त्यामध्ये आपण जास्त व्यस्त असल्यामुळे आपली अमुल्य अशी झोपेची वेळ आपण पाळत नाही.


पण आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना एकदा तुम्हाला शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाली तर ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत राहा.


जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर, कोणी जरी जास्त पगार दिला तरी ती नोकरी नाकारण्याचा मी सल्ला देईन.  दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील हे लक्षात ठेवा.


ह्याप्रकारे जास्तीत जास्त प्रमाणात वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक अशा प्रकारे तयार कराल तर मला खात्री आहे तुम्ही संपूर्ण दिवस अधिक उत्साही, ताजेतवाने रहाल आणि दीर्घआयुषी व्हाल!

November 21, 2021

20 भाकरी - आपले कर्म

 *२० भाकरी...*


एक माणूस असतो तो एवढा गरीब असतो की त्याला दोन वेळेचे अन्न देखील नीट मिळत नसते. तो एका ठिकाणी बसलेला असतो तेंव्हा त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठे साधू महाराज चाललेले असतात तो त्यांना बघून म्हणतो, महाराज तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात मला सांगा माझ्या नशिबात नक्की काय लिहले आहे मला दोन वेळची नीट भाकरी सुद्धा खायला मिळत नाही आणि आयुष्यात नुसते दुःखच दुःख आहे.


तेंव्हा महाराज म्हणतात ठीक आहे, आणि ते डोळे बंद करून थोडी साधना करतात काही वेळानंतर डोळे उघडल्यानंतर ते त्या माणसाला सांगतात इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त 20 भाकरी लिहल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही. 20 भाकरी मिळतील पण त्यानंतर तू राहशील नाही राहणार हे मी सांगू शकत नाही. तेंव्हा तो माणूस म्हणतो, महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुम्ही एवढे भविष्य बघता तेंव्हा असे काहीतरी करा की या 20 च्या 20 भाकरी मला एक साथ आत्ता मिळायला हव्या. कारण मी आतपर्यंत एक साथ कधी दोन भाकरी सुद्धा बघितल्या नाहीत.


तेंव्हा महाराज म्हणतात, अरे तुला या 20 भाकरी मिळून तर जातील पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाहीये. या शेवटच्या 20 भाकरी असणार आहेत. तेंव्हा तो माणूस म्हणतो महाराज ठीक आहे नंतर काही नाही मिळाले तरी चालेल, पण आत्ता 20 भाकरी मिळाल्या तर बरं होईल. तेंव्हा ते साधू महाराज म्हणतात ठीक आहे. आणि कसेतरी ते आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या माणसासाठी 20 भाकरींची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात या तुझ्या वाट्याच्या राहिलेल्या 20 भाकरी आहेत. आणि असे बोलून ते महाराज निघून जातात.


आता तो माणूस त्या भाकरी खायला सुरुवात करतो. तो खूप खुष असतो, ज्याने 2 भाकरी कधी एक साथ खाल्ल्या नाहीत त्याला एकदम 20 भाकरी मिळालेल्या असतात. मग ती अर्धी भाकर खातो, नंतर एक भाकर खातो, नंतर 2 खातो. आयुष्यात त्याने एवढे जेवण कधीच केलेले नसते. 2 भाकरी खाल्ल्या नंतर त्याचे पोट भरते. आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की या राहिलेल्या 18 भाकरींचे मी काय करू? तेंव्हा तो बघतो की एक त्याच्या सारखाच माणूस समोरून चाललेला असतो. तो सुद्धा खायला काही मिळते का याच्या शोधात असतो मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की आज माझ्याकडे 18 भाकरी आहेत त्यातल्या दोन तू घे.


जसे तो त्या गरीब माणसाला दोन भाकरी देतो, तो दुसरा माणूस  पळत पळत जातो  आणि त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडे आज भाकरी आहेत. तेंव्हा ते सगळे गरीब त्या माणसाकडे येतात मग तो राहिलेल्या सगळ्या भाकरी त्या गरीब लोकांमध्ये वाटतो. काही वर्षे उलटल्या नंतर ते जे साधू महाराज असतात ते त्याच रस्त्याने चाललेले असतात. ते विचार करतात मी काही वर्षांपूर्वी इथे एका माणसाला 20 भाकरी दिल्या होत्या, ज्या त्याच्या नशीबातल्या शेवटच्या भाकरी होत्या. आता बघू तरी त्या माणसाचे काय हाल आहेत?


ते जेंव्हा त्या जागेजवळ येतात तेंव्हा ते बघतात तर तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो, त्याने तिथे खूप मोठा मांडव घातलेला असतो, तिथे हजारो लोक जेवत असतात. जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान्न असतात. ते साधू महाराज एकदम हैराण होतात. ते त्या माणसाजवळ येतात आणि विचारतात हे कसं झालं? तुझ्या हाताच्या रेषांवर, तुझ्या मस्तकावर फक्त 20 भाकरी लिहल्या होत्या, याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हते. पण आज तर तू धनवान झालास. तुझ्यामुळे आज हजारो लोक जेवत आहेत.


तेंव्हा तो माणूस म्हणतो, महाराज जेंव्हा तुम्ही मला 20 भाकरी देऊन गेलात तेंव्हा त्यातल्या मी फक्त दोनच भाकरी खाऊ शकलो मग बाकीच्या 18 भाकरी मी माझ्या सारख्याच गरीब लोकांना वाटल्या. आणि जसे मी भाकरी वाटल्या माझ्याकडे अजून लोक जेवण घेऊन येऊ लागली जसे तुम्ही मला 20 भाकरी दिल्या होत्या तसेच बाकीचे लोक सुद्धा मला जेवण देऊ लागली. परत मी त्यातले थोडे खायचो आणि बाकीचे वाटायचो आणि असे करत करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायची आणि एक दिवस एवढे जेवण आले की मी खाऊन सुद्धा शंभर लोकांना वाटू शकलो.


जेवढे मी वाटू लागलो त्याच्या कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येत गेले. माझं हे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिले. त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला. माझा व्यवसाय माझी बायको बघते. आणि मी दिवसभर हे जेवण वाटायचे काम करतो. आज हजारो लोक रोज जेवण करतात. मला माहित नाही कुठून हे येतं. पण जेवढे जास्त मी वाटतो त्याच्या अनेक पटीने माझ्याकडे येतं. मित्रांनो हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे. जेवढे तुम्ही दुसऱ्याला देता निसर्ग तुम्हाला अनेक पटीने देतोच देतो आणि हा नियम शंभर टक्के काम करतो.


तरी तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहल्या असतील पण तुम्ही देण्याचे कर्म सतत करत असाल तर तुमच्या नशिबात लिहलेल्या गोष्टींपेक्षा 10 पट जास्त तुम्हाला मिळते आणि हे मी स्वतः अनुभवातून सांगत आहे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की द्यायचे म्हणजे  फक्त पैसे द्यायचे पण तसे नाहीये. तुमच्याकडे देण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. तुम्ही तुमच्याकडे असलेले एखादे कौशल्य शिकवू शकता. तुम्ही एखाद्याला चांगले मार्गदर्शन करू शकता. तुम्ही एखाद्याला आधारासाठी तुमचा खांदा देऊ शकता. तुम्ही एखाद्याला त्याच्या संकट काळात धीराचे दोन शब्द देऊ शकता.


काही जमत नसेल तर एखादे छानसे हास्य तर देऊ शकता. मित्रांनो एक लक्षात ठेवा जेंव्हा जमिनीमध्ये आपण बी पेरतो तेंव्हा झाडाला यावच लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. तसेच ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी द्यायला सुरुवात करता निसर्गाला तुम्हाला द्यावेच लागते हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपली अपेक्षा असते आपण ज्याला मदत केली त्यानेच आपली मदत केली पाहिजे. आणि मग आपण म्हणतो मी त्याला एवढी मदत केली आणि नंतर त्याने धोका दिला.


तर मित्रांनो जरुरी नाही की ज्याला तुम्ही मदत केली त्याच्याकडूनच तुम्हाला काही मिळेल, ते वेगळ्या रुपात सुद्धा मिळू शकते. जसे तुमचे ऑफिस मध्ये प्रोमोशन होईल, तुमच्या मुलांना चांगली शाळा मिळेल, तुमची अडकलेली कामे पटापट व्हायला सुरुवात होईल. पण तुम्ही वाटले की तुम्हाला मिळणार हे निश्चित. अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती म्हणजे स्वतःचे नुकसान करून दुसऱ्यांना काही देऊ नका. त्या गरीब माणसाने आधी स्वतःचे पोट भरले आणि मग राहिलेले दुसऱ्यांना वाटले. तसेच तुम्ही सुद्धा स्वतःचे नुकसान होऊ न देता दुसऱ्यांची मदत करा. म्हणून जो माणूस देणारा असतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही.

November 17, 2021

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा

 पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच -05

https://scholareducation1.blogspot.com/2021/11/5.html

https://scholareducation1.blogspot.com/2021/11/5.html

5th Scholarship Practice Tests पहा.

👇👇👇👇👇👇👇

👉 महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न.

👉 प्रश्न सोडवा.

👉आपले उत्तर Submit करा.

👉View Score वर क्लिक करा.

 👉आपले गुण पहा.

----------------------------------------------

शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच -01

https://scholareducation1.blogspot.com/2021/10/blog-post_27.हतमल

https://scholareducation1.blogspot.com/2021/10/blog-post_27.html

शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच -02


https://scholareducation1.blogspot.com/2021/10/02.html 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच -03

https://scholareducation1.blogspot.com/2021/10/03.html

शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच -04

https://scholareducation1.blogspot.com/2021/11/gk-test-04.html 

----------------------------------------

शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाचे व्हिडीओज पाहण्यासाठी 👇👇👇👇लिंक :-

https://www.youtube.com/playlist?list=PLkEVI7wPogWfz8ydsLQkAgNS09pOVWS0c

----------------------------------------

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती समूह.

Online Educational Platform

----------------------------------------

         Share for All.

'विश्वासघात' प्रेरणादायी कथा

 *एका बाजारात तितर पक्षी विकणारा बसला होता.*

*त्याच्याकडे मोठ्या जाळीच्या टोपलीत बरेच तितर पक्षी होते ..!*

*आणि एका छोट्या जाळीच्या टोपलीत फक्त एकच तितर पक्षी होता ..!*

*एका ग्राहकाने विचारले एक तितर पक्षी कितीचा आहे ..?*

*"५० रुपयाला ..!"*

*ग्राहकाने छोट्या जाळीत असलेल्या तितर पक्षीची किंमत विचारली.*

*पक्षी विकणारा म्हणाला,*

*"मला ह्याला विकायचं नाही ..!*

*"पण तू आग्रह धरत असशील तर मी ५०० रुपये लावीन  ..! "*

*ग्राहकाने आश्चर्याने विचारले,*


*ह्या तितर पक्षीचा भाव इतका कसा काय ..?*


*पक्षी विकणारा म्हणाला "खरंतर हा माझा स्वतःचा पाळीव पक्षी आहे आणि तो इतर तितर पक्ष्यांना अडकावण्याच काम करतो .."*

*जेव्हा तो जोरात ओरडतो, आणि इतर पक्ष्यांना स्वतः कडे बोलावतो, आणि इतर तितर पक्षी विचार न करता एकाच ठिकाणी जमतात, तेव्हा मी त्या सर्वांची सहजपणे शिकार करतो, त्यांना पकडतो ..*

*"नंतर मी या माझ्या पाळीव तितर पक्षीला त्याच्या आवडीचे एक जेवण (खुराक) देतो ज्यामुळे तो आनंदित होतो ..*

*म्हणूनच त्याची किंमत खूप जास्त आहे ..!*

*त्या माणसाने ५०० रुपये देऊन तो तितर पक्षी विकत घेतला व भर बाजारात त्याची मान मोडून टाकली.*


*एकाने विचारले,*


*अहो, तुम्ही असं का केलं..?*

*त्याचे उत्तर होते,*

*अश्या विश्वासघात करणाऱ्याला जगण्याचा हक्क नाही जो आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या समाजाला अडकवतो आणि आपल्या लोकांना फसवण्यासाठी काम करतो ..!"*

               *असे खूप तितर आपल्या आजूबाजूला सभोवताली आहेत त्यांना शोधा,ओळखा व त्यांची संगत सोडा ........!*

तर तुम्ही सुरक्षित राहाल.नाही तर विनाश..🙏🏻😊

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

November 12, 2021

मी कसा आहे? प्रेरणादायी कथा

 *मी कसा आहे?*


         आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी अाहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. "आज कसं येणं झालं ?" उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की,समोर त्यांचा घरमालक उभा आहे.घरमालक विनम्रपणे म्हणाला, "मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं." उद्योगपती वरमले आणि म्हणाले, "हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा." एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.घरमालक   उद्योगपतींलना म्हणाला," तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता,याचे मला आश्चर्य वाटते." यावर उद्योगपती हसले व

म्हणाले, "मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या

काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो." घरमालक काही समजला नाही.तो भाडे घेऊन निघून गेला.


     हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या  ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले, तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,"सर, तुम्ही रांगेत का उभे आहात? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा.तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.उद्योगपती म्हणाले, "आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. उद्योगपती हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे." एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 


       तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळतआपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.


       एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते.त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले.त्यामुळे ती घाबरली.तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला.ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, "तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'" हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, "माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा,व्हिस्की सांड.", उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.


असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते.त्याची उत्सुकता चाळविली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, "साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते ?आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??."

उद्योगपती म्हणाले, "अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, *"तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण तू कसा आहेस हे फार महत्त्वाचे आहे.आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा."*


"तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की,

खरोखरच आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसतेच. आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते."

'या उत्तुंग उद्योगपतीचे नाव 

*रतन टाटा.* 

खरंच,जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंतसाधी कुठलीही गुंतागुंतनसलेलीअशीअसतातखरेतर साधे राहणे,हेच कठीण असते. व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.

वास्तव कथा

 *खूपच छान आणि वास्तव कथा.*


मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आज पर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल." 


त्याची मुलगी सारा म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या." 

थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला. 

तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..

मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, "तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ.....?

यावर सारा म्हणाली, "मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत."

मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, "ओहो, तू टॉम स्मिथची  मुलगी आहेस? "

पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, "हा स्मिथ नांवाचा मनुष्य तोच आहे बरं कां ज्याने ' Institute of Administrators ' या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो.त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं..." 

इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, "मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा..."

सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं. 

नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.    

एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारलं गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली, "माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिक दृष्ट्या जरी ते गरीब होते तरी सचोटी, शिस्त  आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.

"आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?" या, मुलाखतकाराच्या प्रश्नावर

 त्या उत्तरल्या, "माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून ऊठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही."

मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 

 "मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल कां?"

यावर त्या म्हणाल्या,"मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दीवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे कांही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते."

आपणही टाँम स्मिथसारखेच आहोत कां..? 

किर्तीरूपाने शिल्लक राहता येऊ शकते. किर्ती पसरायला आणि किर्तीरूपाने जीवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..

सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणिव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..

आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..

आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनूया.....‼️

November 11, 2021

सेवानिवृत्ती

 *निवृत्त होईपर्यंत प्रत्येकाने  प्रमाणिकपने काम करणे...!! हेच सर्वोत्तम....* 🌹🌹


*एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते...*🏵️🏵️


ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता...


तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे...


आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते...


तेंव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ.... 


एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला...


पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते...


आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते...


कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता...


कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो...


झालं बाबा कसतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेंव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो...


हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता...


मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला...?? काय चालले असेल त्याच्या मनात...??


मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते...


अरे!!! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड, पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही. 



का मी असे केले...??


*"नोकरीचे असो नाहीतर इतर, कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजुन करा..."* 🪴


*"आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही...आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल...!!"*🪴🪴


*सुंदर आहे ना कल्पना...!!*  🌚


*कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा...चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते...!!* 🤝🤝🤝🤝🤝

November 10, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर


अंधारच होता नशिबी ज्यांच्या 

त्यांना प्रकाशाचं दान दिलं

तुमचे मानावे किती उपकार

साहेब, तुम्ही संविधान दिलं

ज्योतीबांची विचारधारा टिकण्यासाठी 

निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी 

तुम्ही वेचलं आयुष्य 

सामान्यांच्या सुखासाठी 

आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही 

बाबासाहेबाना स्मरतो आम्ही 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

शाहू फुलेच्या विचारांना 

ओंजळीत या धरतो आम्ही 

जरी वेगळ्या भाषा असल्या 

तरी एकता कायम आहे 

कारण तुम्ही दिलेल्या संविधानात

समानतेचा नियम आहे 

हा सलोखा ही बंधुता 

राष्ट्रभावना वाढत जाईल 

रोज पहाटे सूर्य दिसला 

की तुमची आठवण येत राहील.

कृष्णावळ



कथा - कृष्णावळ 



आज आमच्या सासूबाई म्हणाल्या पोह्यांसाठी 2 कृष्णवळ द्या ,मी ऐकतच राहिलो ,मग त्या म्हणाल्या अहो म्हणजे कांदे ,

कांद्याला कृष्णवळ म्हणतात हे मला पाहिल्यानंदीच समजले 

का ते कोणी काही ज्ञानात भर घालेल का 


 कृष्णावळ..



अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द !


आजकाल कोणीही नाही वापरत !


कृष्णावळ चा अर्थ कांदा ! 


कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. 


कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो... 





आणि 


आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. 


शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. 


ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.


कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे. 


पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार  व  पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो...


आहे की नै गंमत... 


डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे 

November 9, 2021

संस्कार कथा

खूपच छान आणि वास्तव कथा.


मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आज पर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल." 


त्याची मुलगी सारा म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे.


 आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवऊं द्या." 


थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला. 

तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..


मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, "तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ.....?

यावर सारा म्हणाली, "मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत."


मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, "ओहो, तू टॉम स्मिथची  मुलगी आहेस? "


पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, "हा स्मिथ नांवाचा मनुष्य तोच आहे बरं कां ज्याने ' Institute of Administrators ' या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो.त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं..." 


इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, "मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा..."


सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं. 


नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.

    

एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारलं गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली, "माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिक दृष्ट्या जरी ते गरीब होते तरी सचोटी, शिस्त  आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.


"आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?" या, मुलाखतकाराच्या प्रश्नावर

 त्या उत्तरल्या, "माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून ऊठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही."


मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 


 "मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल कां?"

यावर त्या म्हणाल्या,"मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दीवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे कांही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते."


आपणही टाँम स्मिथसारखेच आहोत कां..? 


किर्तीरूपाने शिल्लक राहता येऊ शकते. किर्ती पसरायला आणि किर्तीरूपाने जीवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..


सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणिव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..

आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..

आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या आणि ही सत्यकथा आपल्या माणसांत अधिकाधिक शेअर करू या.

अडाणी आईवडील

 *अडाणी आईवडील*

-------------------------------------------

मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला, अग छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत शालांत परिक्षेत..!


 आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली,  बघुया मला दाखवा...!


 इतक्यात मुलगा पटकन बोलला.

 "बाबा तिला कुठे Result दाखवताय! तिला काय लिहता वाचता येते क!? अशिक्षित आहे ती...!" 


भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.


ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली, मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले. "हो रे ! ते पण खरच आहे.


तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती... 

*अशिक्षित होती ना...*


तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची..... 

*अशिक्षित होती ना...*


तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...

*अशिक्षित होती ना...*


तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास. तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....

*अशिक्षित होती ना...*

 

तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.

*अशिक्षित होती ना....*


बाळा. चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात. पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.

*अशिक्षित आहे ना ती...*


ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची. म्हणून मी अभिमानाने सांगतो की *'तुझी आई अशिक्षित आहे...'*


हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो. आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.

आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन,पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल...!


*बोध:* प्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा.

त्यांच्यासाठी काय काय सोसलय आईवडिलांनी..

*आई साठी नक्कीच शेअर करा.*.

प्रेरणादायी स्टोरी

 तुमची फसवणूक होऊ शकते



वाचायला सुरुवात करण्याआधी... आपले डोळे अलगद बंद करा... जीवनातील असा एक प्रसंग आठवा की तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगले केले होते... त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती...


तीन धडे


एक यशस्वी उद्योजक *नारायण मुर्ती यांनी सांगितले की :


जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. 


माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली. 


एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो.”


 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 


म्हणूनच मी ज्या  वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 


जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,  *“बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”


 दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”


ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.


 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले,* *“बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”


तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका  वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?”


 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”


माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर  एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो!


माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, *"माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस  की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!”


मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. 


नारायण मुर्ती

मालक

 एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..


वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.


गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.


थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या  जंगलाचा राजा आहे;  माझा कोणी मालक नाही;  मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची  नाही.

 वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.

थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.


आता या कथेतून बोध हा आहे की,

गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.

वाघ हे आपले अहंकारी मन आहे.

मालक हे ईश्वराचे प्रतीक आहे ,तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही  अस्तित्वाची लढाई आहे.

कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही ,परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते.

वो फिर नही आते


वो फिर नही आते

काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी…वो फिर नहीं आते…. आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. 

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही “मीच का?” या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी  हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं….. संपर्कात रहायला हवं. 

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ?…. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. 


ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशिर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेल्या. 


त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का ? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो …..  “वो फिर नहीं आते……” हि अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं “मी” पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो. 


गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर

पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं

वो बहारों के आने से खिलते नहीं

कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं

वो हजारों के आने से मिलते नहीं

उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम

वो फिर नहीं आते… 


माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि.......

ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

आँख धोखा है, क्या भरोसा है

दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है

अपने दिल में इसे घर बनाने न दो

कल तड़पना पड़े याद में जिनकी

रोक लो रूठ कर उनको जाने न दो

बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम

वो फिर नहीं आते… 


आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना….  नसेल तर…. खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल ...नाही का ? 

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..

शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्या   प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत  हीच ती  सुंदर माणसं.... तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी .. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची....

 सच कहा है किसीने...

...वो फिर नही आते....

ऋण



सुंदर कथा  'ऋण'


पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या 'आशा दीप' नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधून मधून पोस्टमन येउन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा,  तेंव्हा हे ठरावीक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या अविर्भावात,  बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेउन वाचत बसलेले असत.  किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत. 


त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली 'देशमुख काका... तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेउन जा..' तेंव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच. 


'आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?' असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात 'बार' भरला होता. मानेनेच 'जाउन या..बघा काय आलय..' असे नानांनी आप्पांना सुचवले तसे आप्पा  लगबग ऑफिसमधे आले. रजिस्टरला नोंद करुन ते जाडजूड envelope आपल्या हातात घेउन ते उठले. 


पाकीट दिल्लीवरुन स्पिड पोस्टने पाठवलेले होते. 

त्यावर पाठवणा-याचे नाव नव्हते. फक्त एवढेच लिहीले होते

If undelivered, please return to

Assistant Secretary-Planning

Ministry of Finance

10, Sansad Marg, New Delhi-01


आप्पा देशमुख ला दिल्लीवरुन कसलेसे जाडजूड टपाल आलय हे एव्हाना दत्तूकरवी सर्वांना समजले होते. 

सारेजण आप्पांभोवती जमा झाले..

मग एक एक प्रतिक्रिया येउ लागल्या..


'काय रे आप्पा, या वयात लव्ह लेटर आले काय तुला? एवढं दिवस सांगितलं नाहीस आम्हाला ते..' आबा क्षिरसागरने आप्पांची खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला.


'अरे आबा..लव्ह लेटर नसेल..उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावलं असेल राष्ट्रपतींनी आप्पाला..तो मास्तर म्हणून रिटायर होउन पाच वर्षे झालीयेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या..' बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले. 


'छे रे..बापू..अरे पत्र बघ कोणाकडून आलय..Department of Planning, Ministry of Finance. आयला, म्हणजे आप्पाला planning commision मधे घेताहेत की काय? अभिनंदन आप्पा..!!' पांडूकाका पवार बोलले. 


तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना वर्टीकरने सगळ्यांना शांत केले..

'अरे बाबांनो..असा अंदाज लावत बसण्यापेक्षा आप्पाला ते पाकीट उघडू तरी द्यात. काय ते कळेलच...ए आप्पा.. उघड रे ते पाकीट..'


आप्पानी नानांच्या आदेशा प्रमाणे पाकीटाची एक कड  कात्रीने सावकाश कापली. आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते. तीन वर्षापूर्वी पत्नी गेली अन सुने बरोबर पटेनासे झाले तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येउन राहिले होते. मुलगा महिन्यातून एकदा येउन त्यांना भेटून जायचा. शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे. आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते. आता त्यांचे खाजगी, वैयक्तिक असे काही नव्हतेच. म्हणूनच हे पाकीट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भिड वाटली नाही. 


पाकीटात तीन चार गोष्टी होत्या. आधी एक ग्रिटींग कार्ड निघाले. त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भित्तीचित्र होते व त्यावर सुवाच्य अक्षरात एक मेसेज लिहीला होता..


'माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक दिना निमीत्त सप्रेम नमन.'

खाली फक्त नाव होते..आरती.


नानांनी ते ग्रिटींग पाहिले व म्हणाले..'अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या...'


आप्पा विचारात पडले. पस्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकिर्दीत, आरती नावाच्या अनेक मुली त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.  तीन चार विद्यार्थिनी त्यांना आठवतही होत्या.  पण 'ही' त्यातली नक्की कोण हे त्यांना लक्षात येत नव्हते. 


'ते बघ आत एक चिठ्ठी देखील आहे ती वाच..' 


आतून एक छान गुळगुळीत पण उच्च प्रतिच्या स्टेशनरीचा कागद बाहेर आला व त्यावर सुवाच्य अक्षरात एक पत्र लिहीले होते. आश्रमात 'पत्र वाचन' हा बापू देशपांडेंचा प्रांत.

आप्पांनी त्यांच्याकडे ते पत्र वाचायला दिले. 


बापू देशपांड्यांनी आपल्या खणखणीत आवाजात पत्र वाचायला सुरु केले..


'प्रिय सर,


मी तुमची विद्यार्थिनी आरती देसाई. 

मला ठाउक नाही की तुम्हाला मी पटकन चेह-यानिशी आठवेन की नाही. कारण 'देसाई  बाल अनाथ आश्रमा'त वाढलेल्या माझ्यासारख्या  बहुतेक मुला मुलींची आडनावे ही देसाईच असायची व अशी बरीच मुले मुले आपल्या शाळेत होती. तुमच्या हातून कुठल्या न कुठल्या इयत्तेत इंग्रजी शिकला नाही असा एकही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून बाहेर पडला नसेल. त्यातली एक भाग्यवान विद्यार्थिनी मीही होते. 


सर, आम्ही अनाथालयात राहणारी मुले. इतर मुलांसारखे मधल्या सुट्टीत डबे नसायचे आम्हाला. मला अजूनही आठवतं..वर्गातल्या प्रत्येक देसाई आडनावाच्या मुला मुलीला तुम्ही रोज मधल्या सुट्टीत पाच रुपये द्यायचात. खरे तर आम्हीच मिळून तुमच्याकडे यायचो व ते तुमच्याकडून हक्काने घ्यायचो. आपल्याच गुरुकडून पैसे मागायची भिड नाही वाटायची तेंव्हा आम्हाला. त्यात तुम्ही आम्हाला जवळचे वाटायचात. 


तुम्ही दिलेल्या त्या पैशातून आम्ही 'देसाई मुले मुली' मिळून कधी चिरमुरे, कधी बिस्कीटे, कधी भडंग पाकीट असे काही एकत्र घेउन खायचो. बिकट परिस्थितीला एकत्र लढण्याची ताकत व हिंमत, दोन्ही, तुम्ही आम्हा मुलांना त्या न कळत्या वयात दिलीत. तुमच्यामुळेच आज ही मुले कुठे ना कुठे सुव्यवस्थित पोजीशन वर कार्यरत आहेत.


मला तुम्ही मी आठवीत असताना  शिकवलेली ती कविता,  जशी तुम्ही शिकवली, तशीच अजूनही आठवते


'The Woods are lovely dark and deep

But I have promises to keep 

And miles to go before I sleep..'


या कवितेतून तुम्ही दिलेली प्रेरणा मला आजन्म पुरणारी होती..आहे. मी आता गेल्यावर्षी  IAS ची परिक्षा उत्तीर्ण होउन दिल्ली मधे अर्थ खात्यात Planning Department मधे Assistant Secretary या पदावर गेल्या सहा महिन्यांपासून रुजु झाली आहे. इथे आल्यापासून मी तुमचा शोध सुरु केला व मला काही जुन्या मित्रांकरवी ही माहिती मिळाली की तुम्ही..'इथे' आहात. 


सर, मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या बाबांच्या जागी असलेल्या माझ्या सरांना आज वृद्धाश्रमात रहावे लागत आहे, ही कल्पनाच मी सहन करु शकत नाही.  या लिफाफ्यात एक विमानाचे तिकीट पाठवत आहे. तुम्ही दिल्लीला माझ्याकडे, आपल्या मुलीकडे या, हवे तितके दिवस, महिने माझ्याबरोबर रहा. कायमचे राहिलात तर सर्वात भाग्यवान मुलगी मी असेन..


असे समजू नका की मी तुमचे ऋण फेडत आहे. कारण मला कायम तुमच्या ऋणातच रहायचे आहे...


खाली माझा ऑफीस व मोबाइल दोन्ही नंबर आहेत.

मला फोन करा सर..

वाट बघते आहे..

याल ना सर.........बाबा...?


तुमचीच, 


- आरती देसाई


पत्र वाचताना नानांचा आवाज कधी नव्हे ते कापरा झाला..

त्यांनी आप्पांकडे पाहिले..


आप्पा ते पाकिट छातीशी धरुन 

रडत होते...


शेवटी एवढेच म्हणेन  

माणसाचे अश्रू सांगतात तुम्हांला

            दुःख किती आहे.

संस्कार सांगतात कुटुंब कस आहे.

    गर्व सांगतो पैसा किती आहे.

   भाषा सांगते माणूस कसा आहे.

 ठोकर सांगते लक्ष किती आहे.

    आणि सर्वात महत्त्वाचे वेळ

       सांगते नात कस आहे..!



आकाशकंदील

 एक सुंदर कथा


आयुष्य उजळवणारा आकाशकंदील




दारावरची बेल वाजली म्हणून कोण आलंय ते बघायला गेलो, बघतो तर आमच्या शेजारचे आणि समोरचे, पॅसेजमध्ये उभे होते आणि त्यांच्या समोर  सडपातळ बांध्याच्या, उंची साधारण चार फूट असलेला, तरतरीत नाकाचा, हातात दोन आकाशकंदील घेऊन एक मुलगा ऊभा होता. तो चेहरा ओळखीचा होता, हा मुलगा आपल्या इथेच कुठे तरी राहतो हे माहिती होतं, कारण तो रोज सकाळी आमच्या बिल्डिंगखाली शाळेच्या बसची वाट पाहत ऊभा असतो. " काय रे? काय पाहिजे? " असं विचारल्या बरोबरच तो सुरू झाला...


"नमस्कार ! माझं नाव कार्तिक  आहे. मी नववीत आहे. मी इथेच तुमच्या एरियामध्ये राहतो. ह्या वर्षी पासून मी स्वतः आकाशकंदील बनवून विकणार आहे. माझ्याकडे हे २ प्रकारचे डीजाईन्स आहेत. हे मी सँपल म्हणून आणले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या रंगांमध्ये करून मिळतील. ह्या मध्ये बल्ब लावण्याची सोय सुद्धा व्यवस्थित केली आहे.ह्या मध्ये तुम्हाला छोटा किंवा मोठा आकार हवा असेल तर तसही करून मिळेल. किंमत एकच राहील.  ह्यांची किंमत आहे फक्त ₹ १४०. तुम्हाला कोणाला घ्यायचे असतील तर सांगा."  एका काकूंनी सरळ 'नाही'  म्हणून दार लावून घेतलं. "नववीच्या अभ्यासाचं  बघा", एक काका हा असा फुक्कटचा उपदेश देऊन गेले. मी तर त्याच्या त्या मार्केटिंग स्किल्सने अचंबित झालो होतो, त्याच्याकडे कौतुकाने बघत होतो. तेवढ्यात, "दादा, तुला घ्यायचा आहे का कंदील?" त्याच्यापेक्षा त्याचे डोळे खूप मोठ्या अपेक्षेने बोलत होते. मी त्याला घरात घेतलं.


मी : बैस रे ! छान आहेत तुझे आकाशकंदील. हे बघ, जर का तू मला एक योग्य किंमत सांगशील तर मी तुला माझ्या मित्रांकडून अजून ऑर्डर्स मिळवून देईल. विचार कर.खूप लोकं घेतील.


कार्तिक : नाही, दादा ! मी फक्त दहाच कंदील करणार आहे. कारण माझी परिक्षा पण सुरू आहे, शनिवार पर्यंत  माझी परिक्षा आहे. आणि रविवारी सगळ्यांना कंदील मिळाले पाहिजेत. अभ्यास करत मला हे कंदील करायचे आहेत म्हणूम दहाच लिमीट ठेवलं आहे आणि १४० रुपयेचं फिक्स किंमत.


(दहाचं कंदीलांचा बिझनेस आणि त्याच प्लॅनिंग किती पर्फेक्ट केलंय ह्याने, ह्याच खूप कौतुक वाटत होतं मला)


मी : बरं ! एक खर खर सांग. एका कंदीला मागे किती खर्च आहे आणि किती प्रॉफिट होणार?


कार्तिक : चाळीस रुपये खर्च आणि १०० रुपये प्रॉफिट.  (हे त्याने अगदी निरागसपणे खर सांगितलं)


मी : व्वा ! म्हणजे दहा कंदीलाचे १००० रुपये प्रॉफिट कमवणार तू ! मस्तच ! पण काय रे, तूला हा आकाशकंदीलाचा बिझनेस हे ह्या वर्षीच कसं काय सुचलं ? 


कार्तिक : (खूपच अभिमानाने त्याने उत्तर दिलं )   कारण मला ह्या दिवाळीला माझ्या आईला एक साडी गिफ्ट करायची आहे.


मी : अरे व्वा ! क्या बात ! खूपच भारी रे ! पण अरे हजार रुपयांमध्ये येणार का साडी?


कार्तिक : हो ! एकदम साधीच घेणार आहे. एके ठिकाणी सेल लागलाय, तिथे मी चौकशी केली आहे. ८५० ची एक साडी मी बघून ठेवली आहे. तशीच घेणार आहे. 


मी : व्वा व्वा व्वा ! मस्तच ! आणि तसही गिफ्ट मध्ये साधं आणि भारी काहीच नसतं. वस्तूच्या किंमती पेक्षा त्या मागचं आपलं प्रेम आणि भावना महत्वाची आणि जगातल्या सगळ्याच आयांना मुलांचे गिफ्ट्स बेस्टच वाटतात. छान ! पण, ह्याच दिवाळीत आई आठवली का रे तुला साडी गिफ्ट देण्यासाठी? (मी थोडं मस्करीत त्याला विचारलं)


कार्तिक : नाही ! गेल्या वर्षी पर्यंत बाबा आणायचे आईला साडी, पण मग बाबा फेब्रुवारी मध्ये गेले. म्हणून मी घेणार तिला ह्या वर्षी साडी. 


निःशब्द ! अंगावर सरसरून काटा ! आणि डोळ्यात पाणी ! माझ्या, त्याच्या आणि कदाचित तुमच्या सुद्धा. 


आयुष्य शिकवून गेला तो ! त्याने घेतलेली ती साडे आठशेची साडी त्याच्या आईला ह्या दिवाळीत लाख मोलाचा आनंद देईल.

मराठी विनोद

कोल्हापूरला जयप्रभा स्टुडियोमधे   एका मराठी चित्रपटाच शूटिंग चालु होत !


एक वयस्क पागोटेवाला खेडुत स्टुडियो बाहेर आला तर त्याच़ रुप बघुन दरवानाने हटकले ..


तुम्हाला आत जाता येणार नाही. दिग्दर्शकांची सक्त ताकीद आहे!


खेडुताने विचारले..


कोन दिग्दर्शक हाय सा?


*दिनकर द. पाटील*


खेडुत :  "तेस्नी म्हणाव ! *द* आलाय "


😁😁😁😁😁