आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त घटक मराठी व्याकरण शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे.
व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्धलेखन म्हणतात. अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी अनुस्वार ऱ्हस्व,दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
शुद्धलेखनाचे काही नियम
1) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा. उदा कांदा, भिंत, सुगंध,दिंडी, संबंध इ.
2) एक अक्षरी शब्दातील 'इ' व 'उ' हा स्वर दीर्घ लिहावा. उदा. मी, जी, ती, धू, जू, इ .
3) सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा 'इ ' किंवा 'उ 'हा स्वर दीर्घ लिहावा. उदा. कवी, रवी, विद्यार्थी, गुरु,अणू,पशू इ. (अपवाद 'आणि', परंतु, तथापि.) मात्र हे शब्द जोडशब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा 'इ ' किंवा 'उ ' स्वर ऱ्हस्व लिहावा.उदा. कविचरित्र, विद्यार्थिभांडार,गुरुकृपा, पशुधन इ.
4) अकारान्त शब्दातील उपांत्य (शेवटून दुसरे अक्षर) 'इकार' व 'उकार' दीर्घ लिहावा.उदा. वीट, मीठ,खीर, दूध, तूप, नवनीत, जमीन,कबूल इत्यादी.
5) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील 'इकार' व 'उकार' बहुदा ऱ्हस्व लिहावा. उदा. गरिबी, पाहुणा, किती, दिवा, महिना, नमुना, हुतुतू, बहिणी, वकिली इत्यादी.
आता आपण इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित काही शुद्ध शब्द पाहूयात.
नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, आज आपण चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी क्र.10 सोडवणार आहोत. यापूर्वीच्या सरावचाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा. आपल्याला या सरावचाचण्या निश्चितच उपयुक्त ठरतील.
12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती. 'तेजस्विता' आणि 'तपस्विता' हे दोन शब्द आपल्यासमोर जेव्हा उभे राहतात , तेव्हा तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून 'स्वामी विवेकानंद' यांचे नाव आपल्यासमोर उभे राहते. अशा या महान विभूतीचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कोलकत्ता येथील सिमेलिया या ठिकाणी झाला. विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरी देवी यांचे पुत्र म्हणजे विवेकानंद.
स्वामीजींच्या शालेय जीवनापासून पाहिले तर असंख्य दाखले आणि उदाहरणे स्वामीजींच्या बाबतीत पहावयास मिळतात.देव आणि धर्म,कर्मकांड यामध्ये विभागलेल्या समाजाच्या परिस्थितीकडे स्वामीजींनी स्वतःचे लक्ष वेधले . स्वामीजी त्यांच्या याच कृतीतून उदयास आले व संपूर्ण देश भ्रमंती करण्याचा निर्णय स्वामी विवेकानंदांनी घेतला.
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत , कोणत्याही राष्ट्राचे भवितव्य हे त्या राष्ट्रातील युवा पिढीवरती अवलंबून असते. राष्ट्राची जडणघडण ही त्या देशातील युवाशक्तीच्या प्रेरणेवरती अवलंबून असते. अशीच शक्ती मला राष्ट्रासाठी संघटित करायची आहे. हे स्वामीजींच्या मुखामध्ये सदैव उद्गार असत. अंगावरती भगवी वस्त्रे , डोक्यावरती फेटा घालून स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान लोकांच्या समोर मांडण्यासाठी जगभ्रमंती केली.
शिकागोतील धर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबरला स्वामीजी ज्यावेळी शिकागो येथे धर्म परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी स्वामीजींचा वेश पाहून सर्व लोक अचंबित झाले होते.हा संन्याशी माणूस काय बोलणार, असा सर्व लोकांना प्रश्न पडला होता.स्वामीजी ज्यावेळी बोलायला उभे राहिले, सभागृहावरती चौफेर नजर फिरवल्यानंतर स्वामीजींनी आपल्या भाषणाची सुरुवात ' माझ्या बंधू आणि भगिनींनो' या एकाच वाक्याने केली आणि सभागृहांमध्ये प्रचंड टाळ्या. एका भाषणाने सर्व लोकांना मंत्रमुग्ध केले आणि विवेकानंदांनी आपल्या हजारो शिष्यांची निर्मिती केली.पाश्चिमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत असलेल्या भारतीय संस्कृतीला ,भारतीय जनतेला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य स्वामीजींनी केले.
सर्वधर्मसमभाव, संयम आणि शांततेचा मार्ग पत्करणारा महापुरुष महान,त्यागी देशभक्त ,महान तत्वज्ञ, बुद्धिजीवी व्यक्तिमत्व, प्रतिभा संपन्न असा वक्ता म्हणून स्वामीजींच्याकडे पाहिले जाते. जगभराची भ्रमंती करणाऱ्या या महामानवाने वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रान्स, जर्मन ,अमेरिका व इंग्लंड या ठिकाणी गाजलेली त्यांची पाच भाषणे आजही प्रसिद्ध आहेत.
'मातापित्यांबरोबरच मातृभूमीला ही महत्त्व देणारा एक महान योगी आणि एक ब्रह्मचारी' अशी ख्याती स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत पहावयास मिळते. अशा या महान विभूतीचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला. आज ही कन्याकुमारी या ठिकाणी गेल्यानंतर स्वामीजींच्या कर्तृत्वाची ओळख होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा 'युवक दिन' म्हणूनही साजरा केला जातो. तारुण्याचा उपयोग हा जनसामान्यांसाठी करायचा असतो. देश प्रेमाने व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रसार करणाऱ्या विभूतींमध्ये स्वामीजींचा समावेश होतो. आजच्या युवा पिढीने याच गोष्टींचा आदर्श घेण्याचे कार्य जर केले तर स्वामीजींच्या स्वप्नातील हा देश साकार होईल असे वाटते.
कर्मकांडांना विरोध करून मानवतावादी विचार मांडणारा, समतेचा संदेश देणारा ,राष्ट्रप्रेमाची पताका खांद्यावरती घेऊन धर्मप्रसार करणारा एक महान विभूती म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जाते. याच तपस्वी, त्यागी वृत्तीचा, प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी करत असताना घेणे गरजेचे आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांचीच आपल्याला मोठ्या प्रमाणात आठवण होत असताना पहावयास मिळते. देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' पद्धतीला अगदी तशाच पद्धतीने उत्तर दिले पाहिजे, असे रोखठोकपणे प्रखर विचार मांडणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा राज्यातील कटक या गावी 23 जानेवारी 1897 साली झाला. आपले महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर ते विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील परकीयांच्या सेवेत गुंतण्यापेक्षा स्वकीयांची सेवा कधीही चांगली, ही भूमिका समोर ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजींच्या समवेत स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले. 1923 मध्ये महात्मा गांधीजी व नेताजी यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले. यातूनच नेताजींनी 'स्वराज्य पक्षात' प्रवेश केला.
नेताजी आपल्या कृतीशील विचारांमुळे बंगाल नगरपालिकेचे कार्याधिकारी बनले. 1924 साली नेताजींचे क्रांतिकारी विचार पाहून , त्यांना मिळणारा तरुणांचा प्रतिसाद पाहून ब्रिटिशांनी नेताजींना तुरुंगात धाडले. नेताजी 1938व 1939 या दोन्ही वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. पुन्हा 1939 साली आपल्याच विचारश्रेणीत 'फॉरवर्ड ब्लॉक' पक्षाची स्थापना केली.
भारतात राहून ब्रिटिशांचा पराभव करता येणार नाही तर जागतिक अंदाज घेऊन ब्रिटिशांचा पाडाव करता येईल, अशी नेताजींची ठाम भूमिका होती. नेताजी 1941 साली रशिया मार्गे जर्मनीला पोहोचले. परदेशात गेल्यानंतर नेताजींनी 'आझाद हिंद सेना' ही संघटना रासबिहारी बोस व कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने 1942 साली स्थापन केली. तसेच 1943 साली आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद स्वीकारले. आपल्या सेनेत नुसते पुरुष असून चालणार नाहीत तर स्त्रियांचाही सहभाग असला पाहिजे यासाठी नेताजींनी आझाद हिंद सेनेत 'झाशीची राणी' रेजिमेंट ची सुरुवात केली आणि त्याचे नेतृत्व हे कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्याकडे दिले. पारतंत्र्याच्या कालखंडातही स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारा क्रांतिकारक महापुरुष म्हणून नेतांजींकडे पाहिले जाते. सैन्याचे, प्रजेचे नेतृत्व करण्याची क्षमता पाहून जनतेने त्यांना 'नेताजी' ही पदवी बहाल केली.
"तुम मुझे खून दो ! मै तुम्हे आझादी दूंगा!" या एका वाक्यात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कलकत्त्यापासून सिंध पर्यंत लाखो तरुणांना संघटित करण्याचे कार्य नेताजींनी केले.देशाला स्वातंत्र्य हे शांततेतून नाही तर क्रांतीच्या बळावरच मिळणार आहे, हे नेताजींना माहीत होते. नेताजींनी 'जय हिंद!' आणि 'चलो दिल्लीचा' नारा दिला. 1943 ला अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यांचे नामकरण 'शहीद', 'स्वराज्य' असे केले 1944 साली आझाद हिंद सेनेने मॉवडॉक हे ठाणे जिंकून भारतीय भूमीतील पहिला विजय साजरा केला व थेट कोहिमा व इंफाळ पर्यंत धडक मारली. 1945 मध्ये 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा व 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या जपान मधील शहरांवरती अणुबॉम्ब टाकल्याने युद्धाची गती थंडावली गेली. आझाद हिंद सेनेचे कार्य हे अल्प प्रमाणात भारतात थोड्या पद्धतीत थंडावले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी शिवनीतीचा वापर करत वेशांतर करून देशांतर करणारे एक क्रांतिकारी महापुरुष म्हणून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याकडे पाहिले जाते. जपान, जर्मनी यांसारख्या देशांची मदत मिळवण्यासाठी ते यशस्वी झाले होते. त्याचबरोबर आपल्या समवेत क्रांतिकारी विचारांचे तरुण निर्माण करत होते. अशा या महान नेत्यावरती ब्रिटिशांनी वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले ,तुरुंगात डांबले पण नेताजींनी तुरुंगात असतानाही आमरण उपोषण केले. ब्रिटिशांना त्यांना तुरुंगातून सोडून द्यावे लागले .ज्यावेळी नेताजी घरी होते त्यावेळी त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. अशा या महान महापुरुषाचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी टोकियोकडे जात असताना ताई पै येथे विमान अपघातात झाला.
एक उत्तम प्रशासकीय अधिकारी ते स्वातंत्र्य सेनानी म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारी विचारांची चळवळ अंमलात आणून शस्त्राच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा एक महान सेनानी म्हणून, नेताजींचे नाव घेतले जाते. परकीय सत्तेचा योग्य पद्धतीने संबंध ठेवून, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची मदत घेऊन स्वातंत्र्याचे गीत गाणारे व परकीय सत्तेला नेस्तनाबूत करणारा महान योद्धा म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गौरव होतो.
नेताजींच्या मृत्यूनंतर सुद्धा आझाद हिंद सेनेचे कार्य नेताजींच्या विचारांनी प्रभावी झालेल्या लाखो तरुणांनी प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या असंख्य समर्थकांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले गेले. पण या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या समर्थकांच्या बचावा करता पंडित नेहरू, देसाई यांसारख्या नामवंत वकिलांनी वकिली केली. त्यांच्यावरती असणारे खटले रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. आज याच महापुरुषांच्या विचारांचा आपण आदर्श घेऊया.
सन्माननीय व्यासपीठ , व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर , वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो ,
आज २६ जानेवारी - म्हणजेच आपला ' प्रजासत्ताक दिन '. आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणांस काही चार शब्द सांगणार आहे , ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे.
आपण सर्वजण सन १९५० पासून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' किंवा ' गणराज्य दिवस' म्हणून साजरा करतो .भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे.म्हणजेच लोकांनी, लोकांच्यासाठी , लोकांकरवी चालवलेले राज्य आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण इंग्रजाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालो.स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय देणारी राजकीय व्यवस्था सुरु झाली . यालाच आपण 'लोकशाही शासनव्यवस्था' असेही म्हणतो.
या सर्वांचा पाया होता ' भारतीय राज्यघटना'.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार , नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे , हे देशासमोर मोठे आव्हान होते.शेवटी ही जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिलया पेलली.त्यामुळे सर्व जगात श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून ओळखली जाणारी 'भारतीय राज्यघटना' आकारास आली.त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना ' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर , डॉ.राजेन्द्रप्रसाद , यासारख्या अनेक महनीय व्यक्तींचे घटनानिर्मितीत मोलाचे कार्य आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करणेत आला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले.साऱ्या देशाने अन्यायाची,गुलामगिरीची कात टाकली आणि भारतभूमीत स्वातंत्र्य , समता , न्याय व बंधुता या लोकशाहीच्या सोनेरी पानांचा उदय झाला.म्हणूनच स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच हा दिवसही आपणा सर्वांसाठी आनंदाचा , आदराचा ,उत्साहाचा व त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
याच दिवशी आपल्या पवित्र भारतभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला.प्रत्येक मानवास सन्मानाने जगण्याचे, उंच भरारी घेण्याचे बळ या घटनेने दिले.म्हणूनच आपण हा दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा करत आहोत व करत राहणार !
या मंगलदिनी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो .त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या व सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व थोर व्यक्तींना याप्रसंगी वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो !
सर्व चाचण्या सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
नमस्कार विद्यार्थीमित्रांनो,
आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा सराव पेपर .आपल्याला ही सराव मालिका नक्की आवडेल .आपण या चाचण्या आपली शाळा, वर्गमित्र यांना नक्की पाठवा. भरपूर सराव करा व यशस्वी व्हा !
आज आपणांस इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा विविध घटकावर आधारित Online Tests सोडवायला मिळणार आहेत. आपण सरावासाठी त्या नक्की सोडवा व आपल्या मित्रांना Share करा.