शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aअनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा –
अष्टावधानी
aअरण्याचा राजा – वनराज
aअरण्याची शोभा – वनश्री
aअपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित
aअस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
aआपल्या लहरीप्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
aआग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र
aइनाम म्हणून वंशपरंपरगत मिळालेली जमीन – वतन
aईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक
aईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक
aउंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
aऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधीर
aभाषण ऐकणारे – श्रोते
aअंग राखून काम करणारा – अंगचोर
aकथा सांगणारा – कथेकरी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aकथा (गोष्ट) लिहिणारा – कथाकार ,कथालेखक
aकल्पना नसताना आलेले संकट – घाला
aकधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
aकर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा –
कर्तव्यदक्ष
aकसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ
aकष्ट करून जगणारा – कष्टकरी
aश्रमांवर जगणारा – श्रमजीवी
aकविता करणारा /रचणारा – कवी
aगाणे गाणारा – गायक
aकविता करणारी – कवयित्री
aकमी आयुष्य असलेला – अल्पायू / अल्पायुषी
a कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी ,क्षणभंगुर
aकादंबऱ्या लिहिणारा / लिहिणारी – कादंबरीकार
aकिल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट
aकुस्ती खेळण्याची जागा – हौद ,आखाडा
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aकेलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
aकेलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
aकैदी ठेवण्याची जागा – कारागृह ,बंदिशाळा,तुरुंग
aखूप दानधर्म करणारा – दानशूर
aखूप आयुष्य असलेला – दीर्घायू ,दीर्घायुषी
aखूप मोठा विस्तार असलेला – ऐसपैस , विस्तीर्ण
aखूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
aगाईसाठी काढून ठेवलेला घास – गोग्रास
aगोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा – वावटळ
aघरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
aघोडे बांधायची जागा – पागा ,तबेला
aचरित्र लिहिणारा – चरित्रकार
aचार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चवाठा
aअनेकांमधून निवडलेले – निवडक
aचांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुद्धपक्ष , शुक्लपक्ष
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aचित्रे काढणारा – चित्रकार
aजमिनीखालील गुप्त मार्ग – भुयार
aजमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
aजमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे
प्राणी – उभयचर
aजमिनीचे दान – भूदान
aजादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
aज्याला आईवडील नाहीत असा – पोरका , अनाथ
aज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि ,चक्रधर
aज्याला मरण नाही असा – अमर
aज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
aज्याला लाज लाज नाही असा – निर्लज्ज
aज्याचा तळ लागत नाही असा – अथांग
aठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे –
नियतकालिक
aढगांनी भरलेले – ढगाळलेले , अभ्राच्छादित
aतीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aथोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट
aदगडावर / दगडाच्या मूर्ती घडवणारा – शिल्पकार
aदगडावर कोरलेले लेख – शिलालेख
aदररोज प्रसिद्ध होणारे –दैनिक
aदर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
aदर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
aदर महिन्याने प्रसिद्ध होणारे – मासिक
aदर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे –
त्रैमासिक
aदर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे –
षण्मासिक
aदर वर्षाला ,वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे –
वार्षिक
aदररोजचा ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम
aदारावरील पहारेकरी – द्वारपाल , दरवान
aदुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त
aदुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी
aस्वतःवर
अवलंबून असलेला - स्वावलंबी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aदोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण – संगम
aदेशाची सेवा करणारा – देशसेवक
aदेवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
aदुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
aधान्य साठवण्याची जागा – कोठार
aनदीची सुरुवात होते ती जागा – उगम
aनाटक लिहिणारा – नाटककार
aहोडी चालवणारा – नावाडी,नाखवा,नाविक
aनाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट,अभिनेता
aनेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
aपहाटेपूर्वीची वेळ – उषःकाल
aपाऊस मुळीच न पडणे – अवर्षण,अनावृष्टी
aपायापासून डोक्यापर्यंत – अपादमस्तक
aपायात जोडे न घातलेला – अनवाणी
aपाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aपायी जाणारा – पादचारी
aपाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
aपाण्यात राहणारे प्राणी – जलचर
aपुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक –
पूरग्रस्त
aपूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व
aप्रेरणा देणारा – प्रेरक
aफुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त ,अन्नछत्र
aविनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
aबसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
aबातमी सांगणारा /सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका
aबातमी आणून देणारा /देणारी – वार्ताहर
aभाषण करणारा – वक्ता
aमन/चित्त आकर्षित करणारा – मनोहर ,चित्ताकर्षक
aमालाचा साठा करून ठेवण्याची जागा – गोदाम ,कोठार
,वखार
aमाकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aमासे पकडणारा – कोळी
aमूर्ती बनवणारा – मूर्तिकार
aमूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक
aमूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक
aमोजता येणार नाही असे – अगणित,असंख्य
aश्रेष्ठ (महान)ऋषी – महर्षी
aमृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
aयोजना आखणारा – योजक
aरणांगणावर आलेले मरण – वीरमरण
aरक्षण करणारा – रक्षक
aरात्रीचा पहारेकरी – जागल्या
aराज्यातील लोक – प्रजाजन ,रयत ,प्रजा
aरोग्यांची सुश्रुषा करणारी – परिचारिका
aलग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी
aलढण्याची विद्या – युद्धकला
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aलाखो रुपयांचा धनी – लक्षाधीश
aलिहिता वाचता येणारा – साक्षर
aलिहिता वाचता न येणारा – निरक्षर
aलोकांचा आवडता – लोकप्रिय
aलोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
aलोकांचे नेतृत्व करणारा – लोकनायक
aवनात राहणारे प्राणी – वनचर
aडोंगरकपारीत राहणारे लोक – गिरिजन
aवाडवडिलांकडून मिळालेली – वडिलोपार्जित
aविमान चालवणारा – वैमानिक
aव्याख्यान देणारा – व्याख्याता
aशत्रूकडील बातमी काढणारा – हेर
aशत्रूला सामील झालेला – फितूर
aशिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण
aशेती करतो तो – शेतकरी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aशोध लावणारा – संशोधक
aसतत काम करणारा – दीर्घोद्योगी
aसतत निंदानालस्ती करणारा – निंदक
aसमाजाची सेवा करणारा – समाजसेवक
aसर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
aसर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
aसंकट दूर करणारा – विघ्नहर्ता
aस्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम
करणारा –
सांगकाम्या
aसिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथालेखक
aसुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप
aस्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
aस्वतः संपादन केलेली – स्वार्जित ,
स्वसंपादित
aस्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
aस्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा –
स्वार्थी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
aस्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी
aस्वतःबद्दल अभिमान नसलेला – स्वभिमानशून्य
aदुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार,
दिलदार
aस्वदेशाचा अभिमान असणारा – स्वदेशाभिमानी
aस्तुती गाणारा – भाट
aहत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
aहरिणासारखे डोळे असणारी –मृगाक्षी ,हरिणाक्षी
,
मृगनयना,कुरंगनयना
aहिंडून करायचा पहारा – गस्त
aहिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत –
आसेतुहिमाचल