September 17, 2022

वाक्प्रचार व त्यांचा अर्थ

 




वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

खोडी उलटणे – आपण केलेली खोडी अंगाशी येणे .

शाळा बुडवणे –शाळेला दांडी मारणे .

परवानगी मिळणे – मोकळीक मिळणे .

रक्ताचे पाणी करणे – खूप कष्ट करणे .

आभाळ ठेंगणे होणे – खूप आनंद होणे .

निरुत्तर होणे – एखाद्याच्या प्रश्नाने अबोल होणे .

पोटतिडकीने बोलणे – मनापासून कळकळीने बोलणे .

अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे ,नवल वाटणे .

डोळे पणावणे – डोळ्यांत अश्रू दाटणे.

गहिवरून येणे – हृदय भावनेने भरून येणे .

कित्ता गिरवणे –एखादा वागेल तसे वागणे .

झटत राहणे – सतत प्रयत्न करणे .
कडकडून भेटणे – घट्ट मिठी मारणे .

मायेचा वर्षाव करणे – खूप प्रेम करणे .

पोटाशी धरणे – मायेने जवळ घेणे .

थंडीने कुडकुडणे – खूप थंडी वाजणे.

डोळा लागणे – झोप लागणे .

पोटात कावळे ओरडणे – खूप भूक लागणे .

टाळाटाळ करणे – एखादी गोष्ट करायची टाळणे .

कडाक्याची थंडी पडणे – खूप कडक थंडी पडणे .

आग्रह करणे – हट्ट करणे , हेका धरणे .

अंधार पडणे – रात्र होणे .

पाठ थोपटणे – शाबासकी होणे .

घामाघूम होणे – खूप घाम येणे .

काळजी वाटणे – खंत वाटणे .

शोध घेणे – हुडकणे .

देहभान विसरणे – स्वतःची जाणीव विसरणे ,गुंग होणे .

पाठलाग करणे – पाठोपाठ जाणे.

पदर पसरणे – दुवा मागणे .

मन भरून येणे – भावना दाटून येणे .

मन लालचावणे- एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे .

गायब होणे – नाहीसे होणे .

मनावर ताबा मिळवणे – संयम बाळगणे .

धुडकावून लावणे – नकार देणे .

नावाचा जप चालणे – सारखी सारखी एखादी गोष्ट आठवणे .

आनद उतू जाणे – खूप आनंद होणे .

मोलमजुरी करणे – कष्टाची कामे करून पैसे मिळवणे .

धाडस दाखवणे – हिम्मत दाखवणे .

झुंज देणे – लढणे .



संवर्धन करणे – काळजीपूर्वक वाढवणे .

खडानखडा माहिती असणे – संपूर्ण माहिती असणे .

वावर असणे – हिंडणे –फिरणे .

गौरव करणे – सन्मान करणे .

गायब होणे – अदृश्य होणे .

डोळे टिपणे – अश्रू पुसणे .

रस्ता पार करणे – रस्ता ओलांडणे .

खुशीत मान डोलवणे – आनंदाने होकार देणे.

गलबलून येणे – गहिवरणे , मन भरून येणे .

छाती धडधडणे – जीव घाबराघुबरा होणे .

आर्जव करणे – विनंती करणे ,विनवणी करणे .

टिंगल करणे –मस्करी करणे ,खोडी करणे ,चेष्टा करणे .

निरीक्षण करणे – नीट पाहणे .

कुतूहल वाटणे – उत्सुकता निर्माण होणे .

आश्चर्य वाटणे – नवल वाटणे .

जोपासणे – निगा राखणे ,काळजी घेणे .

पाळत ठेवणे – नीट लक्ष ठेवणे .

सुळकी मारणे – सूर मारणे , झेप घेणे .

फन्ना उडवणे – पदार्थ खाऊन लगेच संपवणे .

फस्त करणे  - सगळे खाऊन संपवणे .

आधार देणे – आश्रय देणे .

परोपकार करणे – दुसऱ्यांची मदत करणे .









उधळून देणे – विखरून टाकणे .

पसार होणे – पळून जाने .

भरारी घेणे – झेप घेणे .

कानोसा घेणे – अंदाज घेणे .

वीरगती प्राप्त होणे – वीरमरण येणे .

रवानगी करणे – पाठवणे.

कारावास ठोठावणे – कैदेची शिक्षा देणे .

बंड पुकारणे – विरोधात उठाव करणे .

टिकाव लागणे – निभाव लागणे .

जेरीस आणणे – हैराण करणे .

संकल्प करणे – दृढ निश्चय करणे .

असंतोष निर्माण होणे – प्रचंड नाराजी निर्माण होणे ,चीड येणे .

रस घेणे – विशेष आवड असणे .

उरत धडधडणे – भीती वाटणे .

नजर चुकवणे – डोळ्याला डोळा न देणे , शरम वाटणे .

पोटात खड्डा पडणे – भीती वाटणे .

पाय लटलटू लागणे – घाबरून पाय थरथरणे .

कबूल करणे – मान्य करणे .

जीव भांड्यात पडणे – दिलासा मिळणे .

चलबिचल होणे – जीवाची घालमेल होणे .

डोक्यावरून हात फिरवणे – माया करणे.

ठणकावून सांगणे – ठामपणे सांगणे .

ऐपत नसणे – कुवत नसणे .

ढसाढसा रडणे – खूप रडणे.

धूम ठोकणे – जोराने  पळणे.

भरून येणे – गहिवरणे.

बदला घेणे – वचपा काढणे .

निर्धार करणे – ठाम निश्चय करणे.

भूमिगत होणे – लपून राहणे .

अटक करणे – कैद करणे.

बाळकडू मिळणे – लहानपणापासून संस्कार होणे.

प्रभाव असणे – ठसा असणे ,छाप पडणे.

सुगावा लागणे – माग मिळणे, पत्ता कळणे.

पाळत ठेवणे- मुद्दाम नजर ठेवणे.

अवगत होणे- माहित असणे.

सहभाग घेणे – सामील होणे.

धमकावणे – धमकी देणे.

प्रोत्साहित करणे- उत्तेजन देणे .
अवलंब करणे – अंगीकारणे ,स्वीकारणे.

प्रत्यय येणे – अनुभवास येणे .

प्राणांची आहुती देणे – बलिदान करणे.

अजरामर होणे- कायम स्मरणात राहणे .

दंग होणे- गुंग होणे ,मग्न होणे, गर्क होणे.

एकटक पाहणे – एकाच जागी स्थिर नजरेने पाहणे.

उगम होणे – सुरुवात होणे.

भेट घेणे – भेटायला जाणे (मुद्दाम )

स्वागत करणे- सन्मानाने बोलावणे.

ओळख करून देणे – परिचय करून देणे.

पार पडणे – एखादे काम  नीट पूर्ण होणे.

अभिनंदन करणे – कौतुक करणे ,शाबासकी देणे.

मन लावून  ऐकणे –लक्षपूर्वक ऐकणे .

पोट धरून हसणे –मनमुराद खूप हसणे .

छंद लागणे – अति  आवड निर्माण होणे .

नजरेत येणे –लक्षात  येणे.

प्रोत्साहन मिळणे – उत्तेजन मिळणे .

परिवर्तन घडणे - बदल  घडणे .

वळण मिळणे – कलाटणी मिळणे .

मुग्ध होणे- गुंग होणे .

संकल्प करणे –निश्चय करणे .

घरदार सोडणे –कुटुंबीयांपासून दूर राहणे.

त्याग करणे – सोडून देणे .

वनवास सोसणे – हालअपेष्टा सोसणे.

अधीर होणे- उत्सुक होणे.

सामसूम होणे – शांतता पसरणे.

सफल होणे – यशस्वी होणे.

फस्त करणे – खाऊन संपवणे.

आश्चर्य वाटणे – नवल वाटणे .

कूच करणे – पुढे निघणे.

कपाळावर हात मारणे –निराश होणे,हताश होणे.

काबाडकष्ट करणे – खूप मेहनत करणे.

जीव तुटणे – प्राण कळवळणे .

ऋण काढून सण करणे – ऐपत नसताना कर्ज काढून उत्सव करणे.

जीव तोडून सांगणे- तळमळीने बोलणे.

शब्दाला वजन नसणे – सांगण्याला किंमत नसणे.

त्याग करणे – सर्व सोडून देणे.

दंड भोगणे – शिक्षा भोगणे.

पसार होणे- पळून जाणे.

घाम गाळणे – कष्ट करणे.

पत्ता न लागणे – मागमूस नसणे.

पर्वा न करणे- चिंता न करणे.

पायावर डोके ठेवणे- नमस्कार करणे.

झिम्मड उडणे- गर्दी उसळणे.

पळ काढणे- पळून जाणे.

पायाखाली घालणे- अंतर कापणे,हिंडणे.

तडाखा देणे- मार देणे.

हाताच्या अंतरावर असणे- अगदी जवळ असणे.

भान सुटणे- लक्ष  विचलित होणे,जाणीव नसणे.

मोडून पडणे- कोलमडून जाणे.

पंचाईत होणे- अडचण निर्माण होणे.

आभार मानणे- कृतज्ञता व्यक्त करणे.

थक्क होणे – आश्चर्यचकित होणे.

पार करणे – पलीकडे जाणे.

गलका करणे – आरडाओरडा करणे, गोंधळ करणे.

लचांड निर्माण होणे – अडचण निर्माण होणे.

निरोप घेणे – निघून जाणे.

थरकाप उडणे – भीतीने अंग थरथरणे.

थंडीने  काकडणे – थंडीमुळे अंग कापणे.

हुज्जत घालणे – वाद घालणे.

आरोप करणे – आळ घेणे,तक्रार करणे.

मनाला लागणे – वाईट वाटणे.

मनात घोळत राहणे – नेहमी आठवत राहणे.

कमी लेखणे – कमी महत्व देणे.

नावारूपाला येणे – प्रसिद्ध पावणे.

संधी चालून येणे – स्वतःहून मोका मिळणे.

स्वप्न साकार होणे- स्वप्न प्रत्यक्षात येणे.

विलंब लावणे – उशीर करणे.

रवाना करणे – पाठवणे.

प्रोत्साहन देणे – उत्तेजन देणे.

निधन होणे – मरण पावणे.

गुबगुबीत होणे – बाळसे येणे.

जीव गुंतणे- मन एखाद्या गोष्टीत अडकणे .

कपाळावर आठ्या येणे – नाराजी व्यक्त करणे.

वाया जाणे – फुकट जाणे.

आतुर असणे – उत्सुक  होणे.

मेळ बसणे –सांगड घालणे.

कामाची कास धरणे – कामाला तयार असणे.

पोटाला घास मिळणे- खायला अन्न मिळणे.

अबाधित ठेवणे – बंधन न घालणे.

अंतर न देणे – दूर न ठेवणे.

पालनपोषण करणे – संगोपन करणे.

कुरकुर करणे – तक्रार करणे.

खंत न बाळगणे – काळजी न करणे.

हरखून जाणे – थोड्याशा यशाने आनंदित होणे.

न डगमगणे – न घाबरणे.

संकटाचे डोंगर उभे राहणे – खूप मोठे संकट येणे.

संसाराचा गाडा चालवणे – प्रपंच नेटाने करणे.

जीवन वाहून घेणे – सर्वस्व देणे.

नाव कमावणे – प्रसिद्ध पावणे.

स्थापना करणे – निर्माण करणे.

बेगमी करणे- भविष्यासाठी साठा करणे.

भारावून जाणे – प्रभावित होणे.

नियम पाळणे – अटी सांभाळणे.

नियंत्रण ठेवणे – ताबा ठेवणे.

आडवे होणे – झोपणे.

चेहरा उतरणे – नाराज होणे , वाईट वाटणे.

बोटांनी ओठ झाकणे – हसू लपवणे.

गाडग्यासारखे तोंड करणे- रुसून बसणे.

आरंभ करणे – सुरुवात करणे.

धूम पळणे – जोराने धावणे.

झडप घालणे – पकडण्यासाठी उडी घेणे.

नकार देणे – नाही म्हणणे.

बट्ट्याबोऴ होणे – सगळे बिघडून जाने.

ठेंगा दाखविणे – चिडविण्यासाठी अंगठा दाखवणे .

टाळाटाळ करणे- मुद्दाम दुर्लक्ष करणे.

घाबरगुंडी उडणे- खूप घाबरणे.

विचारपूस करणे – चौकशी करणे.

काबुल करणे – मान्य करणे .

देखभाल करणे – सांभाळ करणे.

आकाश ठेंगणे वाटणे- खूप आनंद होणे.

सामील करणे – सहभागी करणे.

संमती दर्शवणे – मान्यता देणे.