अलंकारिक शब्द
अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न
अकरावा
रुद्र – अतिशय तापट माणूस
अकलेचा
खंदक – अत्यंत मूर्ख माणूस
अकलेचा
कांदा - मूर्ख
अरण्यरुदन
– ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
अळवावरचे
पाणी – फार काळ न टिकणारे
अक्षरशत्रू
– निरक्षर ,अडाणी .
ओनामा –
सुरुवात ,प्रारंभ.
उंटावरचा
शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा .
उंबराचे फूल
– दुर्मीळ वस्तू .
कर्णाचा
अवतार – उदार मनुष्य .
कळसूत्री
बाहुले – दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा .
कळीचा
नारद – कळलावणारा.
काडीपहिलवान
– हडकुळा .
कुंभकर्ण
– अतिशय झोपाळू .
कूपमंडूक
– संकुचित वृत्तीचा.
कोल्हेकुई
– क्षुद्र लोकांची बडबड .
खडाजंगी
– मोठे भांडण .
खडाष्टक
– जोरदार भांडण.
खुशालचेंडू
– चैनीखोर माणूस.
खेटराची
पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे.
गर्भश्रीमंत
– जन्मापासून श्रीमंत.
गंगा-यमुना
– अश्रू
गंडांतर
– भीतिदायक संकट .
गाजरपारखी
– कसलीही पारख नसलेला , मूर्ख .
गुरुकिल्ली
– मर्म,रहस्य .
गुळाचा
गणपती – मंद बुद्धीचा .
गोगलगाय
– गरीब,निरुपद्रवी मनुष्य .
घरकोंबडा
– घराबाहेर न पडणारा .
घोरपड –
चिकाटी धरणारा .
चर्पटपंजरी
– निरर्थक बडबड.
चौदावे
रत्न – मार .
छत्तीसचा
आकडा – शत्रुत्व .
जमदग्नीचा
अवतार – रागीट .
टोळभैरव
– कामात नासाडी करणारे लोक .
ताटाखालचे
मांजर – दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा .
त्रिशंकू
– धड ना इकडे,धड ना तिकडे .
दगडावरची
रेघ – कधीही न बदलणारे .
दळुबाई –
भेकड मनुष्य .
देवमाणूस
– चांगला ,सज्जन माणूस .
धोपट
मार्ग – सरळ,नेहमीचा मार्ग .
नवकोट
नारायण – खूप श्रीमंत .
नंदीबैल
– होला हो म्हणणारा .
पर्वणी –
अतिशय दुर्मिळ योग .
पाताळयंत्री
– कारस्थान करणारा .
पांढरा
कावळा – निसर्गात नसलेली वस्तू.
पांढरा
परीस – लबाड .
पिकले
पान – म्हातारा .
पोपटपंची
– अर्थ न कळता पाठांतर करणारा .
बृहस्पती
– बुद्धिमान .
बिनभाड्याचे
घर – तुरुंग .
बोकेसंन्यासी
– ढोंगी मनुष्य .
बोलाचीच
कढी – केवळ शाब्दिक वचने.
भगीरथ
प्रयत्न – आटोकाट प्रयत्न .
भाकडकथा
– बाष्कळ गोष्टी .
भीष्मप्रतिज्ञा
– कठीण प्रतिज्ञा .
मंथरा –
दुष्ट स्त्री.
मायेचा
पूत – पराक्रमी मनुष्य ,मायाळू.
मारुतीचे
शेपूट – लांबत जाणारे काम .
मृगजळ –
केवळ आभास.
मेषपात्र
– बावळट.
रामबाण
औषध – अचूक गुणकारी.
लंकेची
पार्वती – अत्यंत गरीब स्त्री.
लंबकर्ण
– बेअकली.
वाटण्याच्या
अक्षता – नकार.
वामनमूर्ती
– ठेंगू किंवा बुटका माणूस.
वाहती
गंगा – आलेली संधी .
शकुनीमामा
– कपटी मनुष्य .
शेंदाड
शिपाई – भित्रा.
श्रीगणेशा
– प्रारंभ .
सव्यसाची
– उलटसुलट काम करणारा .
स्मशानवैराग्य
– तात्कालिक वैराग्य .
सांबाचा
अवतार – अत्यंत भोळा माणूस.
सुळावरची
पोळी – जीव धोक्यात घालणारे काम .
सूर्यवंशी
– उशिरा उठणारा .