September 27, 2022

महात्मा गांधी Mahatma Gandhi Marathi Speech

 




महात्मा गांधी 

महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी.त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर गावी २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला.

 त्यांचे वडील राजकोटचे दिवाण होते.त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच सत्य व अहिंसेचे शिक्षण दिले. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते.त्यांच्या आईने त्यांना रामायण, महाभारत या पुस्तकांचे वाचन करावयास लावले होते.विद्यार्थीदशेत काही वाईट मित्रांच्या संगतीने गांधीजींनी चुका केल्या.त्यांनी आपली चूक वडिलांजवळ काबुल करून क्षमा मागितली व नंतर त्या चुका पुन्हा कधीही केल्या नाहीत.

    महात्मा गांधी इंग्लंडला जाऊन बरीस्टर झाले.आफ्रिकेत जाऊन वकिली केली.न्याय व स्वातंत्र्यासाठी आपल्या देशात सत्याग्रह केला.१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश महात्मा गांधीजींच्या प्रयत्नांमुळे स्वतंत्र झाला.

      गांधीजीनी सत्य,अहिंसा,सूतकताई ,स्वदेशी वस्तू यांची शिकवण लोकांना दिली.ते सर्व धर्मांचा आदर करत.त्यांनी हरिजनांसाठी खूप कार्य केले.त्यांची राहणी साधी होती.सारे जग महात्मा गांधीजींना महात्मा म्हणू लागले.