September 17, 2022

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

 

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aअनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी

aअरण्याचा राजा – वनराज

aअरण्याची शोभा – वनश्री

aअपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित

aअस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी

aआपल्या लहरीप्रमाणे वागणारा – स्वच्छंदी

aआग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र

aइनाम म्हणून वंशपरंपरगत मिळालेली जमीन – वतन

aईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक

aईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक

aउंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा

aऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधीर

aभाषण ऐकणारे – श्रोते

aअंग राखून काम करणारा – अंगचोर

aकथा सांगणारा – कथेकरी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aकथा (गोष्ट) लिहिणारा – कथाकार ,कथालेखक

aकल्पना नसताना आलेले संकट – घाला

aकधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य

aकर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष

aकसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ

aकष्ट करून जगणारा – कष्टकरी

aश्रमांवर जगणारा – श्रमजीवी

aकविता करणारा /रचणारा – कवी

aगाणे गाणारा – गायक

aकविता करणारी – कवयित्री

aकमी आयुष्य असलेला – अल्पायू / अल्पायुषी

a कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी ,क्षणभंगुर

aकादंबऱ्या लिहिणारा / लिहिणारी – कादंबरीकार

aकिल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट

aकुस्ती खेळण्याची जागा – हौद ,आखाडा

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aकेलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ

aकेलेले उपकार विसरणारा – कृतघ्न

aकैदी ठेवण्याची जागा – कारागृह ,बंदिशाळा,तुरुंग

aखूप दानधर्म करणारा – दानशूर

aखूप आयुष्य असलेला – दीर्घायू ,दीर्घायुषी

aखूप मोठा विस्तार असलेला – ऐसपैस , विस्तीर्ण

aखूप पाऊस पडणे – अतिवृष्टी

aगाईसाठी काढून ठेवलेला घास – गोग्रास

aगोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा – वावटळ

aघरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित

aघोडे बांधायची जागा – पागा ,तबेला

aचरित्र लिहिणारा – चरित्रकार

aचार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चवाठा

aअनेकांमधून निवडलेले – निवडक

aचांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुद्धपक्ष , शुक्लपक्ष

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aचित्रे काढणारा – चित्रकार

aजमिनीखालील गुप्त मार्ग – भुयार

aजमिनीवर राहणारे प्राणी – भूचर

aजमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी – उभयचर

aजमिनीचे दान – भूदान

aजादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार

aज्याला आईवडील नाहीत असा – पोरका , अनाथ

aज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि ,चक्रधर

aज्याला मरण नाही असा – अमर

aज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू

aज्याला लाज लाज नाही असा – निर्लज्ज

aज्याचा तळ लागत नाही असा – अथांग

aठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक

aढगांनी भरलेले – ढगाळलेले , अभ्राच्छादित

aतीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aथोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट

aदगडावर / दगडाच्या मूर्ती घडवणारा – शिल्पकार

aदगडावर कोरलेले लेख – शिलालेख

aदररोज प्रसिद्ध होणारे –दैनिक

aदर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक

aदर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक

aदर महिन्याने प्रसिद्ध होणारे – मासिक

aदर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक

aदर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक

aदर वर्षाला ,वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे – वार्षिक

aदररोजचा ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम

aदारावरील पहारेकरी – द्वारपाल , दरवान

aदुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त

aदुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी

aस्वतःवर  अवलंबून असलेला  -  स्वावलंबी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aदोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण – संगम

aदेशाची सेवा करणारा – देशसेवक

aदेवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप

aदुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी

aधान्य साठवण्याची जागा – कोठार

aनदीची सुरुवात होते ती जागा – उगम

aनाटक लिहिणारा – नाटककार

aहोडी चालवणारा – नावाडी,नाखवा,नाविक

aनाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट,अभिनेता

aनेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा

aपहाटेपूर्वीची वेळ – उषःकाल

aपाऊस मुळीच न पडणे – अवर्षण,अनावृष्टी

aपायापासून डोक्यापर्यंत – अपादमस्तक

aपायात जोडे न घातलेला – अनवाणी

aपाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aपायी जाणारा – पादचारी

aपाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी

aपाण्यात राहणारे प्राणी – जलचर

aपुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक – पूरग्रस्त

aपूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व

aप्रेरणा देणारा – प्रेरक

aफुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त ,अन्नछत्र

aविनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई

aबसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक

aबातमी सांगणारा /सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका

aबातमी आणून देणारा /देणारी – वार्ताहर

aभाषण करणारा – वक्ता

aमन/चित्त आकर्षित करणारा – मनोहर ,चित्ताकर्षक

aमालाचा साठा करून ठेवण्याची जागा – गोदाम ,कोठार ,वखार

aमाकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aमासे पकडणारा – कोळी

aमूर्ती बनवणारा – मूर्तिकार

aमूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक

aमूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक

aमोजता येणार नाही असे – अगणित,असंख्य

aश्रेष्ठ (महान)ऋषी – महर्षी

aमृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय

aयोजना आखणारा – योजक

aरणांगणावर आलेले मरण – वीरमरण

aरक्षण करणारा – रक्षक

aरात्रीचा पहारेकरी – जागल्या

aराज्यातील लोक – प्रजाजन ,रयत ,प्रजा

aरोग्यांची सुश्रुषा करणारी – परिचारिका

aलग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी

aलढण्याची विद्या – युद्धकला

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aलाखो रुपयांचा धनी – लक्षाधीश

aलिहिता वाचता येणारा – साक्षर

aलिहिता वाचता न येणारा – निरक्षर

aलोकांचा आवडता – लोकप्रिय

aलोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य

aलोकांचे नेतृत्व करणारा – लोकनायक

aवनात राहणारे प्राणी – वनचर

aडोंगरकपारीत राहणारे लोक – गिरिजन

aवाडवडिलांकडून मिळालेली – वडिलोपार्जित

aविमान चालवणारा – वैमानिक

aव्याख्यान देणारा – व्याख्याता

aशत्रूकडील बातमी काढणारा – हेर

aशत्रूला सामील झालेला – फितूर

aशिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण

aशेती करतो तो – शेतकरी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aशोध लावणारा – संशोधक

aसतत काम करणारा – दीर्घोद्योगी

aसतत निंदानालस्ती करणारा – निंदक

aसमाजाची सेवा करणारा – समाजसेवक

aसर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू

aसर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष

aसंकट दूर करणारा – विघ्नहर्ता

aस्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा –   

                                                                    सांगकाम्या

aसिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथालेखक

aसुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप

aस्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन

aस्वतः संपादन केलेली – स्वार्जित , स्वसंपादित

aस्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ

aस्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा – स्वार्थी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

aस्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी

aस्वतःबद्दल अभिमान नसलेला – स्वभिमानशून्य

aदुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार, दिलदार

aस्वदेशाचा अभिमान असणारा – स्वदेशाभिमानी

aस्तुती गाणारा – भाट

aहत्तीला काबूत ठेवणारा – माहूत

aहरिणासारखे डोळे असणारी –मृगाक्षी ,हरिणाक्षी ,

                                         मृगनयना,कुरंगनयना

aहिंडून करायचा पहारा – गस्त

aहिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल