October 24, 2022

माझा आवडता संत - संत ज्ञानेश्वर MAJHA AAVDTA SANT SANT DNYANESHWAR






 माझा आवडता संत 

  संत ज्ञानेश्वर 

शक्तीच्या ऐलतीरावर भक्तीच्या पैलतीरावर पहुडलेल्या महाराष्ट्राला मानवतेच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय करण्याचं काम एका तेजस्वी ज्ञानसूर्यानं केलं,हा ज्ञानसूर्य म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर होय.ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वी इथला भक्तीचा मार्ग फक्त उच्चवर्णीयांच्याच दरावरून जाट होता.तोच भक्तीचा मार्ग अधिक सोपा करून बहुजनांच्या घरापर्यंत नेण्याचे काम ज्ञानदेवांनी केले.वडील विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी प्रायश्चित म्हणून स्वतःचं आयुष्य संपवल्यावरही ,आळंदीकरांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा छळ थांबवला नाही.ज्या माणसांनी अनाथ ज्ञानदेवांच्या झोळीत 'भिक्षा'ही घातली नाही त्या माणसांच्या अज्ञानी झोळीत ज्ञानाचं भांडार ओतण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं.

 वर्णभेदाच्या आणि जातिभेदाच्या सीमारेषांमध्ये बंदिस्त असलेला तत्कालीन समाज मानवता विसरून गेला होता. अत्मोद्धाराचे सामर्थ्य असलेली ईश्वरभक्ती कर्मकांडाच्या चौकटीत बंदिस्त होती.अशा वेळी ज्ञानेश्वरांनी प्रवाहविरोधी भूमिका स्वीकारून महाराष्ट्राच्या मातीवर परिवर्तनाची पताका उभी केली.योग,कर्मकांड,दांभिकता यांसारख्या सामान्य माणसांना अशक्य असणाऱ्या गोष्टी नाकारून सर्वसामान्य माणसांसाठी 'हरिपाठाच्या'माध्यमातून नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग सांगितला.

बरे केले ज्ञानदेवा,सांगितला हरिपाठ ।

आम्हा साध्या माणसांना ,सोपा केला परिपाठ ।।

उच्चवर्णियांच्या गुलाबी ओठांवर खेळणाऱ्या 'संस्कृत' भाषेत ज्ञानाचे भंडार बंदिस्त होते.हे ज्ञान सर्वसामान्य  माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ,सर्व सामन्यांच्या गळी उतरवण्यासाठी ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी' लिहिली.

" माझ्या आईच्या भाषेत,आहे ग्रंथ 'ज्ञानदेवी'

सांगे जीवनाचे सार ,तिची एक-एक ओवी."

सोपी भाषा,साधी उदाहरणे आणि दैनंदिन जीवनातील दाखले या साहित्य वैशिष्ट्यांचा विचार केला तर संत ज्ञानदेव फक्त 'संत'च नाही तर महान प्रतिभावंत वाटतात.

आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची बीजे सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानदेवांच्या विचारात आढळतात."

पेरुनी नुसतीच हिंसा,उगवेल कशी अहिंसा.'

या भाषेत ज्ञानदेवांनी यज्ञात बळी देण्याच्या प्रथेला ,हिंसेला विरोध केला.

" योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी l वायाचि उपाधी दंभ धर्म अशा कर्मकांडाला ज्ञानदेवांनी विरोध केला.

सातशे वर्षांपूर्वी सर्व जातीधर्मातील संतांना एकत्र करून 'वारकरी संप्रदायाच्या' रूपाने त्यांच्या हातामध्ये ज्ञानदेवांनी समतेची पताका दिली.आजही ती पताका खांद्यावर घेऊन वारकरी सांप्रदाय साऱ्या देशाला शांतीचा व समतेचा संदेश देत पंढरीची वाट चालतो आहे. 

आजच्या भंगलेल्या समाजव्यवस्थेमध्ये ,दुभंगलेल्या मनांना जोडण्याचे सामर्थ्य ज्ञानोबांच्या अभंगांमध्ये आहे.आजही सारा महाराष्ट्र ज्ञानोबांना डोक्यावर घेऊन नाचतो आहे.खरं तर ; ज्ञानोबांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे.त्यांच्या नावाचा नुसता गजर करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलाविले की नाही याला पुरावा नाही पण रेड्याप्रमाणे स्थूल झालेल्या सामान्य माणसांना बोलते करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.ज्ञानदेवांनी दगडी भिंत चालवली की नाही ,हे निश्चित माहित नाही ,परंतु वर्णभेदाच्या चौकटीत भिताड झालेल्या माणसांना चालतं-बोलतं करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे नाकारता येणार नाही अशा या ज्ञानाच्या महासागराबद्दल बोलताना आपोआपच आपल्यासारख्यांना मर्यादा येतात आणि शब्द तुकोबांच्या शब्दांचा आधार घेतात.....

" ज्ञानियांचा राजा गृरू महाराव ,

म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे,

मज पामरा हे काय थोरपण ,

पायाची वहान पाया बरी ।।


October 21, 2022

प्राथमिक शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुधारित वेळापत्रक जाहीर

 


क्रमांक. पिय- २०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४

दिनांक २१ ऑक्टोबर २०२२.

प्रति.

मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद (सर्व)

विषय: सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक.

संदर्भ : १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव- ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था. १४. दिनांक ०७.०४.२०२१.

२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव- ४८२०/प्र.क्र. २९० / आस्था. १४. दिनांक ०४.०५.२०२२.

(३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव-२०२२/प्र.क्र.२९/आस्था.१४. दिनांक २९.०६.२०२२.

४) शासनाचे समक्रमांकाचे दिनांक २०.१०.२०२२ चे पत्र.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र. ४ नुसार

निर्गमीत करण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या कालावधीत दिपावली सण तसेच क्षेत्रिय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी काही अधिकचा वेळ लागणार असल्यामुळे उपरोक्त संदर्भ क्र.४ येथील दिनांक २०.१०.२०२२ चे पत्र रद्द करण्यात येत असून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या अनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.

सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून. २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतूद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणान्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र.३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिताच लागू राहील.

आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत  बदल्या खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रकानुसार बदल्याबाबतची कार्यवाही निश्चित करण्यात आलेली आहे.






















October 20, 2022

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच 01 4TH STANDARD TALENT SEARCH TEST 01

 




बुद्धिमता : वर्गीकरण 

'वर्गीकरण ' या प्रकारातील प्रत्येक प्रश्नात चार शब्द,चार आकृत्या किंवा चार संख्या दिलेल्या असतात.त्यातील तीन गोष्टींत तंतोतंत साम्य व सुसंगती आढळते,पण त्यातील एक बाब थोड्याफार फरकाने वेगळी असते.हे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण व विश्लेषण करून हा वेगळा शब्द किंवा संख्या किंवा आकृती ओळखायची असते.

गटात न बसणारा शब्द : वर्गीकरण 

1. वर्गीकरणाच्या या प्रश्नप्रकारात  प्राणी,पक्षी,पदार्थ झाडे,फुले,फळे,ग्रह अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

2.  या प्रकारात निरीक्षण शक्तीला जास्त वाव देण्यात येतो.प्रश्नात चार शब्दांपैकी तीन शब्दात साम्य असते आणि एक शब्द विसंगत म्हणजे वेगळा असतो.

3.  व्याकरणातील घटक,समानार्थी ,विरुद्धार्थी शब्द,समान गुणधर्म असंरे शब्द या सर्वांचीही माहिती असणे आवश्यक असते.

4.  या प्रश्नात दिलेल्या पर्यायातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचून नेमका शब्द सूक्ष्म निरीक्षणाने वेगळा करणे शक्य असते.

आपण एक उदाहरण पाहू.

प्रश्न : खाली दिलेल्या पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा.

1.   मटकी 

2.   गहू 

3.  ज्वारी 

4.  बाजरी 

उत्तर : मटकी 

स्पष्टीकरण - वरील शब्दांपैकी गहू,ज्वारी,बाजरी ही तृणधान्ये आहेत ,तर मटकी हे कडधान्य  आहे.

म्हणून उत्तर पर्याय क्रमांक - 1 

हा गटात न बसणारा शब्द आहे.

पंडित नेहरू यांचे जीवनकार्य Pandit Javaharlal Nehru





पंडित जवाहरलाल नेहरू 

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान 

Pandit Jawharlal Neharu 

First Prime Minister of India 

         प्रगल्भ बुद्धिमत्ता,प्रचंड श्रीमंती,ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या घरामध्ये ज्यांचा जन्म झाला,महात्मा गांधीजींनी ज्यांचा उल्लेख माझ्या विचारांचा वारसदार म्हणून केला,ज्यांना संपूर्ण जगाने शांतिदूत ही पदवी बहाल केली,पंचशील तत्वाचे खंदे समर्थक ,अलिप्तावादी चळवळीचे प्रणेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या महापुरुषाचे नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू.

             पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद या ठिकाणी झाला.पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे निष्णात कायदेपंडित म्हणून प्रसिद्ध होते.भारतातील उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपले उच्च शिक्षण लंडन येथे केले.1912 साली बरीस्टर पदवी प्राप्त करून भारतात आगमन केले.1916 साली कमला कौल यांच्याशी विवाह केला.1920 साली देशात राष्ट्रीय चळवळीचे वारे वाहत असताना सारा देश देशप्रेमावर एकत्र येत होता.परकीय सत्तेचा कडाडून विरोध करत होता.अशाच कालखंडात ब्रिटीशांच्या विरोधात देशात एक वातावरण निर्माण होत होते.या कालखंडात नेहरूंनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीत उडी घेतली.1921 साली प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा भारतात येणार होता तेव्हा त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला.तेव्हा त्यांना सहा महिने तुरुगांची शिक्षा भोगावी लागली.1930 साली गांधीजीसमवेत मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले.1936 , 1937 च्या या दोन्ही कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.

  1942 साली देशात 'चले जाव' चा नारा मोठ्या प्रमाणात दिला.देशातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.तेव्हा नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात डांबले.तुरुंगात असताना त्यांनी  'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' नावाचा ग्रंथ लिहिला.1945 साली त्या ग्रंथाचे प्रकाशन केले.1947 साली देशात चळवळीचे वारे वाहत होते.अशाच कालखंडात ब्रिटीशानी भारतीय सत्ता भारतीयांना दिली.15 ऑगस्ट 1947 ची पहाट उगवली.महापुरुषाच्या प्रयत्नाने स्वातंत्र्याच्या चळवळीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले.

    15 ऑगस्टला पंडित नेहरूंनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्राला अभिप्रेत असणारे भाषण करताना पंडित नेहरू म्हणाले ." मला हा देश शेतकरी,कष्टकरी,श्रमिक यांच्या प्रयत्नातून व बुद्धीजीवी लोकांच्या कल्पनेतून साकार करावयाचा.त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे.नेहरूंचे हे भाषण सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे होते." पुढे नेहरू असे म्हणाले, या देशामध्ये हरित क्रांती करून भारतीय शेती शेतकऱ्याचा विकास करावयाचा आहे. आणि शेतकऱ्याचा विकास करून मला भारताला सक्षम देश उभा करावयाचा आहे.असेच सक्षम भारत निर्माण करण्यासाठी नेहरूंनी प्रामुख्याने प्रयत्न केले.मुला-फुलांचे नेहरू ......... चाचा नेहरू ...चाचा नेहरू!

   आजही नेहरूंचा जन्मदिवस साजरा करताना आपण बालदिन म्हणून साजरा करतो.पंडित नेहरुंना लहान मुले फार आवडत असत.याच बालकातून उद्याच्या तरुणांची निर्मिती होणार आहे.बालकांच्यासमोर सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून उद्याच्या राष्ट्राची निर्मिती त्यांच्या हातातूनच होणार आहे हा विचार आमच्यासमोर ठेवण्याचे कार्य जवाहरलाल नेहरूंनी केलेले पहावयास मिळते.

1955 - रशियाचा दौरा.

1957 - दुसऱ्यांदा पंतप्रधान.

1960 - महाराष्ट्र राज्य स्थापनेत नेहरूंचे योगदान.

शेजारी असणाऱ्या राष्ट्रांना वेळोवेळी भेट देऊन त्या राष्ट्रांना सहकार्य करण्याची भावना नेहरूंच्यामध्ये होती.

    तिसऱ्या जगाचा शोध घेणारे नेहरू जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती राष्ट्राच्या नुकसानीस जबाबदार असते.यासाठी त्यांनी अलिप्ततावाद चळवळीची स्थापना केली.बेलग्रेड येथे 1961 साली सहभाग घेतला.1962 साली पुन्हा पंतप्रधानपदी पंडितजींची निवड झाली.देशाला हरितक्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी वेगवेगळ्या जागतिक पातळीवरची योजना अंमलात आणल्यामुळे माणुसकी व मानवतेचा स्वीकार करणारा आधुनिक शांतीदूत म्हणून नेहरूंचा उल्लेख केला जातो.नेहरू हे जितके हळवे  आणि संयमी होते तितकेच ते स्पष्टवक्तेही होते.भारतीय लोकशाहीचे नेतृत्व करताना ,देशातील सर्वोच्च पदी असताना ,देशात शांतता प्रस्थापित करताना सनदशीर मार्गांनी वल्लभभाई पटेल तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आणि संरक्षण मंत्र्यांच्या मदतीने सर्व संस्थानांचे विलीनीकरणा योग्य पद्धतीने करून घेतले.देशातील अराजकता ,फुटीरता नष्ट करण्यासाठी शांतता हेच एकमेव मध्यम आहे हे जनतेच्या आणि संस्थानिकांच्या लक्षात आणून दिले.

उत्तम पालक आणि उत्तम प्रशासक यांचे दर्शन नेहरूंच्या पत्र लिखाणातून पाहावयास मिळते.1930 ते 1955 या कालखंडात आपल्या बहिणीला लिहिलेली पत्रे त्याचबरोबर तुरुंगात असताना आपल्या मुलीला केलेला पत्रव्यवहार आजही एक आदर्श  पत्र म्हणून पहावयास मिळतात.प्रतिभासंपन्न नेहरूंचे दर्शन या पत्रातून पाहावयास मिळते.सार्वजनिक जीवनात लढा देणारा आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगणारा माणूस हळव्या मनाचाही असतो यांचे दर्शन त्यांच्या या पत्रातून होते.

आजही नेहरू 'मनमिळावू नेहरू' म्हणून त्यांच्या विचारांची प्रचिती पाहावयास मिळते.महालामध्ये रममाण होण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेत सामील होऊन स्वातंत्र्याची पताका खांद्यावरती घेणारा एक झंझावाती तरुण म्हणजे नेहरू.देशातील निरक्षरता,अज्ञान,परंपरा,रूढी नष्ट करून वैज्ञानिक दृष्टीकोनाला साद घालणारा ,विज्ञानाची गीतं गाणारा हा महामानव खऱ्या अर्थाने 'आधुनिक भारताचे शिल्पकार'च आहेत.त्यांचाच जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो.

एल निनो म्हणजे काय ? What is El Nino ?




                               दर तीन - चार वर्षांनी पॅसिफिक महासागराच्या बहुतांश पृष्ठभागाचे सुमारे पाच ते सहा अंश सेंटीमीटर नी तापमान वाढते. युरोपच्या भौगोलिक क्षेत्रफळाएवढे याचे आकारमान असते. उष्ण  पाण्याची घनता थंड पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ही आश्चर्यकारक घटना घडत असते. महासागराच्या ज्या क्षेत्राचे उष्णतामान वाढलेले असते, त्या क्षेत्राची पातळी इतर भागापेक्षा सुमारे पाच ते सहा इंच वाढते. जणू काही पाच ते सहा इंच जाडीचा एक थर समुद्रावर जमा होतो. हवेचा दाब व पाण्याचे तापमान यांचा सहसंबंध असल्याने तापमान वाढलेल्या या क्षेत्रावरून वाहणारे वारे आपली दिशा बदल वितात आणि तापमान वाढलेला हा हवेचा पट्टा 100 किमीच्या   वेगाने पुढे सरकतो. यालाच एल निनो म्हणतात.


October 19, 2022

सामान्यज्ञान महाराष्ट्रातील किल्ले General Knowledge - The Forts in Maharashtra

 

सामान्यज्ञान 

महाराष्ट्र पर्यटन - किल्ले 

अमरावती - गाविलगड 

अहमदनगर - हरिश्चंद्रगड , रतनगड, 

खर्डा ,अहमदनगरचा भुईकोट किल्ला 

उस्मानाबाद - नळदुर्गाचा किल्ला ,

परंड्याचा  किल्ला

औरंगाबाद- देवगिरी [दौलताबाद] किल्ला.

कोल्हापूर - विशाळगड, पन्हाळगड, 

भुदरगड, गगनगड

नाशिक - ब्रम्हगिरी,अंकाई-टंकाई,

साल्हेर-मुल्हेर,अलंग-कुलंग 

पुणे - सिंहगड,शिवनेरी,राजगड,

तोरणा,पुरंदर,प्रचंडगड.

ठाणे -वसई(भुईकोट) ,अर्नाळा(सागरी),

भैरवगड,गोरखगड,माहुली .

रत्नागिरी - सुवर्णदुर्ग(सागरी),प्रंचितगड,

पालगड,मंडणगड,रत्नगड,जयगड,

कनकदुर्ग,महीपतगड,गोवळकोट,

यशवंतगड,समरगड.

रायगड -रायगड,कर्नाळा,द्रोणागिरी,

सुधागड,लिंगाणा,मुरुड-जंजिरा (सागरी),अवचितगड,सागरगड,

तळगड .

सातारा - प्रतापगड,सज्जनगड,अजिंक्यतारा,

मकरंदगड,केंजळगड,वसंतगड,

पांडवगड,कमळगड.

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी),

देवगड ,मनोहरगड,पद्मगड,रामगड.

सांगली - मिरजेचा भुईकोट किल्ला,

मच्छिंद्रगड ,प्रचितगड.

अकोला - नर्नाला.

लातूर - उदगीरचा किल्ला, 

औसा येथील किल्ला,

धुळे - सोनगीर.

बीड - धारूरचा किल्ला. 


October 18, 2022

महाराष्ट्र - जिल्हे व त्यांची टोपणनावे

महाराष्ट्र - जिल्हे व त्यांची टोपणनावे 

जिल्हा व टोपणनाव या क्रमाने 

मुंबई - भारताचे प्रवेशद्वार ,

भारताची आर्थिक राजधानी,

भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर ,

सात बेटांचे शहर 

अहमदनगर - साखर कारखान्यांचा जिल्हा 

अमरावती - देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा 

उस्मानाबाद - श्री.भवानी मातेचा जिल्हा 

औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी,

अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा.

कोल्हापूर - गुळाचा जिल्हा,

कुस्तीगीरांचा जिल्हा,

गडचिरोली - जंगलांचा जिल्हा.

गोंदिया - तलावांचा जिल्हा,

भाताचे कोथर .

चंद्रपूर - गोंड राजांचा जिल्हा.

जळगाव - केळीच्या बागा,

कापसाचे शेत, 

अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार .

नागपूर - संत्र्यांचा जिल्हा .

नांदेड - संस्कृत कवींचा जिल्हा.

नाशिक - द्राक्षांचा जिल्हा,

मुंबईची परसबाग .

नंदुरबार - आदिवासींचा जिल्हा.

पुणे- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी.

बीड - जुन्या मराठी कवींचा जिल्हा.

बुलढाणा - महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ .

भंडारा - तलावांचा जिल्हा,

               भाताचे कोठार .

यवतमाळ - पांढरे सोने पिकवणारा जिल्हा.

रत्नागिरी - देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

रायगड - जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा

 जिल्हा,

मिठागरांचा जिल्हा,तांदळाचे कोठार.

सातारा- शूरांचा जिल्हा,कुंतल देश .

सोलापूर -  ज्वारीचे कोठार .

परभणी - ज्वारीचे कोठार .


October 17, 2022

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?



जिज्ञासा - 

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवल्यास ताकातील लॅक्टिक आम्लाची तांबे व पितळ या धातूंवर अभिक्रिया होते आणि त्यापासून विषारी क्षार बनतात.हे विषारी क्षार ताकात मिसळतात व ताक कळकते म्हणून तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवत नाहीत .तांबे -पितळ धातूंवर आम्लाची क्रिया होऊ नये म्हणून अशा भांड्यांवर कथलाचा थर देतात.म्हणजेच कल्हही करतात.कथलावर जरी आम्लाची अभिक्रिया झाली तरी त्यापासून बनलेले क्षार विषारी नसतात.

मोती,शंख,शिंपले कसे बनतात ?

 





          ऑईस्टर प्राण्याचे शरीर व भोवतीचा शिंपला यांच्यामध्ये कधी कधी रेतीचा एखादा बारीक कण घुसतो.हा कण त्या त्या प्राण्याच्या मऊ शरीराला टोचू लागतो.या त्रासापासून सुटण्यासाठी त्या कणाभोवती तो कॅल्शियमच्या क्षाराचे थर चढवतो.

सर्व बाजूंनी अनेक थर दिल्यामुळे कणाचा खडबडीतपणा त्याला जाणवत नाही.हा कण जर शिंपल्यातील जागेत फिरू शकत असेल तर क्षाराचे एकावर एक थर बसून त्याचा सुंदर गोल तयार होतो.हा गोल चमकदार खडा म्हणजेच मोती.



शंख किंवा शिंपला तयार करणारा प्राणी आपल्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट नावाच्या एका क्षाराचे चिकट लुकण बाहेर टाकून त्याचे एकावर एक अनेक थर चढवतो.हे लुकण सुकले की चांगले टणक बनते.प्राणी जसा मोठा बनतो तसा तो आणखी थर चढवतो व शिंपला चांगला मोठा होतो.यातील जुने थर बाहेरच्या भागात तर नवे थर आतील भागात असतात.

गोगलगाई विविध प्रकारचे शंख असेच तयार करतात.

October 16, 2022

फ्रिज वारंवार बंद का करू नये ?

 



जिज्ञासा 

फ्रिज वारंवार बंद का करू नये ?

फ्रिज वारंवार बंद केल्याने जेवढी विद्युतउर्जा वापरली जाते त्याच्याहून कितीतरी जास्त उर्जा पुन्हा तो चालू करताना खर्च होते.फ्रिज बंद केल्यानंतर फ्रिजच्या  आतील तापमान वाढते व फ्रिजमधील बर्फाचे पाण्यात रुपांतर होते.फ्रिज पुन्हा चालू केल्यानंतर त्याच्या आतील तापमान कमी  होण्यास  म्हणजे ० अंश से.पर्यंत येण्यास कालावधीही लागतो व पाण्याचे रुपांतर बर्फात होण्यास बरीच उर्जा लागते. ती वाचवलेल्या उर्जेच्या जवळजवळ दुप्पट असते.


October 15, 2022

शिंक का येते?

 जिज्ञासा

शिंक का येते ?

 शिंक येणे ही प्रतिक्षिप्त शारीरिक क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे मेंदूच्या नकळत मज्जारज्जू मार्फत आपल्या संरक्षणाकरिता किंवा अन्य काही कारणास्तव अवयवांच्या ज्या क्रिया घडवून आणल्या जातात त्यांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. अशा क्रियांवर आपला ताबा नसतो. नाकाच्या आत पातळ त्वचा असते. ती काही कारणाने हुळहुळली किंवा चुरचुरली तर शिंक येते. सर्दी झाल्यानंतर आतील त्वचा थोडी सुजते किंवा बाहेरील एखादा कण गेल्याने किंवा स्पर्शामुळे शंका येते. अशावेळी आतील हवा जोराने बाहेर फेकली जाऊन त्या योगे आतील कण, बाष्प हवेच्या झोताबरोबर बाहेर फेकले जाते. शिंक आणण्यासाठी काहीजण तपकीर ओढतात किंवा दोऱ्याचे  टोक नाकात घालतात.

मराठी निबंध : माझा आवडता सण दिवाळी Marathi Nibandh : Majha Aavdta San Diwali

 









मराठी निबंध 

माझा आवडता सण दिवाळी 

'दिवा पाहुनी लक्ष्मी येते' अशी आपल्या समस्त भारतीयांची श्रद्धा आहे.म्हणून सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरात दिवा लावण्याची प्रथा आहे.कारण दिवा हे आपल्या श्रद्धेचं ,भक्तीचं प्रतिक आहे आणि अशा दिव्यांचा एक मंगलमय सण म्हणजे दिवाळी.

   तसे पाहता मला सगळेच सण अत्यंत प्रिय आहेत पण तरीही दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे.नरक चतुर्दशीपासून ते भाऊबीज असे चार दिवस साजरा होणारा हा सण मला वर्षातालेसार्वात आनंदाचे सण देऊन जातो.

या दिवाळीचा थाटमाट काय वर्णावा ? सगळीकडे दिव्यांची रांग लागलेली दिसते.पणत्या,मेणबत्त्या ,निरांजने,समयीमधून अखंड तेवणाऱ्या ज्योती सगळीकडे लख्ख प्रकाश पसरवित असतात.घराघरातून टांगलेले आकाशकंदिल त्याची शोभा अधिकच वाढवीत असतात.आजकाल टर त्याला विद्युत उपकरणांचीही जोड मिळाली आहे.निळ्या,जांभळ्या,पिवळ्या,लाल ,गुलाबी अशा अनेक रंगांच्या दिव्यांचा झगमगाट पाहून असे वाटते जणू अवघे तारांगणच धरतीवर अवतरले आहे की काय !

त्याच्या जोडीला अनेक रंगांचा अत्यंत कौशल्याने वापर करून कलाकुसर आणि नजाकतीने काढलेल्या रांगोळ्या डोळे दिपवून टाकतात.घराघरात स्वच्छता,सजावट,सुशोभीकरण करून आनंदाच्या आणि प्रसन्नतेच्या लहरी पसरत असतात.लहान मुलांचा आनंद ,पाहुण्यांची वर्दळ,महिलांची लगबग यामुलेउत्साहाचे वातावरण असते.घरातील प्रत्येक जण आपआपल्या परीने दिवाळीचा आनंद लुटत असतो.

या सणातील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे.पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी .श्रीकृष्णाने नरकासुराचा वाढ केला.म्हणून हा आनंदाचा दिवस.श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला आणि तब्बल चौदा वर्षांनी ते अयोध्येत परतले आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली.दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन .संध्याकाळी लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते असे म्हणतात.म्हणून या वेळी लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन होते.तसेच व्यापारी लोक आपल्या हीशेबाच्या वह्यांची पूजा करून सुरुवात करतात.या वेळी होणारी आकर्षक रोषणाई ,फटाक्यांची आतिषबाजी ही डोळ्यांसाठी मेजवानीच असते.

यानंतर बलिप्रतिपदा ,भाऊबीज हे दिवस नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे .पती-पत्नी ,भाऊ-बहिण यांच्या नात्याबरोबरच घरातील सर्वच आप्त स्वकीय एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात.एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात.तसेच एकमेकांच्या सहवासात मेजवानी,लाडू,चिवडा,चकली ,मिठाई इ.फराळ ,गोड पक्वान्ने इ.चा आस्वाद घेतात आणि कौटुंबिक वातावरण प्रफुल्लित ठेवतात.

दिवाळी सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंगस्नान.एरवी वर्षभर उठताना आळशीपणा करणारा मी दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठतो.सुर्योदयापूर्वी उठून अंगाला सुगंधित तेल ,उटणे लावून अभ्यंग स्नान केले की शरीराचा रोमरोम पुलकित होतो.

या सगळ्या आनंदी वातावरणात एक गोष्ट खटकते ती म्हणजे फटाके.फटाक्यांमुळे हवा प्रदूषित तर होतेच शिवाय त्याच्या मोठ्या आवाजामुळे कानावरही विपरित परिणाम होतो.कधीकधी अनवधानाने भाजण्यासारखे अपघातदेखील होतात.या गोष्टी टाळल्या पाहिजेत.कमी आवाजाचे ,प्रदूषण न करणारे फटाके अगदी थोड्या प्रमाणात वाजवले तर दिवाळीचा आनंद निश्चितच द्विगुणीत होईल. 

October 11, 2022

भारतातील प्रमुख हस्तकला









भारतातील प्रमुख हस्तकला 

बिदरी - कर्नाटक,आंध्रप्रदेश  राज्यात धातूच्या वस्तूवर केले जाणारे नक्षीकाम .


फुलकरी- पंजाबात कापडावर केले जाणारे फुलांचे नक्षीकाम .


मीनाकाम - राजस्थानात धातूंच्या वस्तूवर केले जाणारे नक्षीकाम .



पैठणी - महाराष्ट्रात तयार होणारी विशेष प्रकारची साडी .


चित्रशैली - मधुबनी,वारली.



पावसाचे पाणी बेचव का लागते ?

 जिज्ञासा 

पावसाचे पाणी बेचव का लागते ?

पावसाचे पाणी हे उर्ध्वपातीत पाणी असते .म्हणजेच ते ढगातून खाली येते.सूर्याच्या प्रखर उष्णतेने भूजलाचे बाष्पीभवन होते.बाष्पीभवन होताच पाण्यातील क्षार हे जमिनीवरच राहतात व फक्त शुद्ध पाणी बाष्परुपात हवेत जाते.हवेतील या बाष्पाचेच संद्रीभावन होऊन मगच पाऊस पडतो.हवेतून जेव्हा या  पाण्याचे थेंब खाली येतात ,तेव्हा खाली येताना त्यात कार्बन डायऑक्साईड विरघळतो परंतु त्याचे प्रमाण अगदीच अल्प असते.त्यामुळे पावसाचे पाणी हे जवळपास क्षारविरहित शुद्ध पाणी असते व त्याला चव नसते.

भाजी चिरल्यावर का धूत नाहीत ?


भाजी चिरल्यावर का धूत नाहीत ?


भाजीमध्ये असणारी ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य असतात.भाजी चिरल्यावर धुतल्यास त्यातील ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विरघळतात.भाजी चिरण्याअगोदर भाजी स्वच्छ धुवून घ्यावी.म्हणजे ब आणि क जीवनसत्वे सुरक्षित राहतील.अन्यथा ब आणि क जीवनसत्वाअभावी होणारे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतील .

October 10, 2022

सामान्य ज्ञान भारतातील सर्वात पहिले



भारतातील सर्वात पहिल्या व्यक्ती

 भारताचे पहिले राष्ट्रपती - डॉक्टर राजेंद्र प्रसाद

 भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती- डॉक्टर झाकीर हुसेन

 भारताचे पहिले शीख राष्ट्रपती - ग्यानी झैलसिंग

 राष्ट्रपतीपदी निवडून येणारे पहिले उपराष्ट्रपती - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 सत्ताधारी पक्षाचे अधिकृत उमेदवार नसतानाही राष्ट्रपतीपदी निवडून आलेली पहिली व्यक्ती - वराहगिरी वेंकटगिरी

 पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती - डॉ. झाकीर हुसेन

 राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारी सर्वाधिक तरुण व्यक्ती - नीलम संजीव रेड्डी

 सर्वाधिक पंतप्रधानांसोबत कार्य केलेले राष्ट्रपती - आर. वेंकट रमण

 अनुसूचित जाती मधील उपराष्ट्रपतीपदी तसेच राष्ट्रपतीपदी  विराजमान होणारी पहिली व्यक्ती- के. आर. नारायण

 राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

 हंगामी राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली व्यक्ती - वराहगिरी वेंकटगिरी

 भारताचे पहिले शीख पंतप्रधान - डॉक्टर मनमोहन सिंग

 भारताचे पहिले उपराष्ट्रपती - डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

 पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती- के. कृष्णकांत

 भारताचे पहिले पंतप्रधान- पंडित जवाहरलाल नेहरू

 काँग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान  - मोरारजी देसाई

 काँग्रेसेतर पक्षाचे सर्वाधिक काळ व सर्वात कमी काळ पदावर असणारे पंतप्रधान - अटल बिहारी वाजपेयी

 हंगामी पंतप्रधानपद भूषविणारे पहिली व्यक्ती - गुलझारीलाल नंदा

 भारताचे पहिले उपपंतप्रधान- वल्लभभाई पटेल

 लोकसभेचे पहिले सभापती- ग. वा. मावळंकर

 ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल- वॉरन  हेस्टिंग्ज

 ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे गव्हर्नर जनरल- लॉर्ड कॅनिंग

 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माउंट बॅटन

 स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल- चक्रवर्ती राजगोपालचारी

 ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसराय - लॉर्ड कॅनिंग

 ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसराय - लॉर्ड माऊंटबॅटन

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष - पी. आनंद चार्लू 

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष - दादाभाई नौरोजी

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दिन तैयब्जी  

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष - मौलाना आझाद

 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनापती - जनरल करिअप्पा

 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय भूदल प्रमुख- जनरल एम. राजेंद्र सिंग

 स्वतंत्र भारताचे पहिले हवाईदल प्रमुख - एअर मार्शल एस. मुखर्जी

 स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख - व्हाइस एडमिरल आर डी कटारी

 भारताचे पहिले फिल्ड मार्शल - जनरल माणेकशा

 इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय - राजा राममोहन रॉय

 ब्रिटिश पार्लमेंट चे पहिले भारतीय सदस्य - दादाभाई नौरोजी

 हाऊस ऑफ लॉर्डचे पहिले भारतीय सभासद - एस. पी. सिन्हा

 अमेरिकन काँग्रेसचे पहिले भारतीय सभासद - दिलीप सिंग सौध

 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष- डॉक्टर नागेंद्र सिंग

 संयुक्त राष्ट्र संघात हिंदी मध्ये भाषण करणारे पहिले भारतीय - अटल बिहारी वाजपेयी

 सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश - न्या. हिरालाल कन्हैया

 उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश - शंभुनाथ पंडित

 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त- सुकुमार सेन

 पहिले रँग्लर - ए. एम. बोस

 आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय - सुरेंद्रनाथ बॅनर्जी

 पहिले भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 बॅरिस्टरची पदवी मिळविणारे पहिले भारतीय- ज्ञानेन्द्रमोहन टागोर

 पहिले भारतीय वैमानिक- जे. आर. डी. टाटा

 भारतात सर्वप्रथम प्रिंटिंग प्रेस ची सुरुवात करणारा - जेम्स हिक्ले

 पहिल्या भारतीय अंटार्टिका मोहिमेचे नेतृत्व करणारा - प्रा. कासिम

 अंटार्क्टीका पाऊल ठेवणारे पहिले भारतीय - लेफ्टनंट रामचरण

 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय - कर्नल जे. के. बजाज

 इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय - मिहिर सेन

 भारताचा पहिला अंतराळ यात्री- राकेश शर्मा

जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय - ले.के. राव

 एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा - तेनसिंग नोर्के

 प्राणवायू शिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा - फू. दोरजी

 नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी- रवींद्रनाथ टागोर

 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय - सी. व्ही. रामन

 अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय - डॉक्टर अमर्त्यकुमार सेन

 रॅमन मॅगसेसे पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी - आचार्य विनोबा भावे

 पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळवणारे पहिले कलाकार - उस्ताद बिस्मिल्ला खॉं

 पहिला परमवीर चक्र विजेता - मेजर सोमनाथ शर्मा

 भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी- जी. शंकर कुरूप 

 भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर - चिंतामणराव डी.  देशमुख

 लोकसभेत महाभियोग आला सामोरे जावे लागलेले पहिले न्यायाधीश - न्या. व्ही. रामस्वामी

 योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष- पंडित जवाहरलाल नेहरू

 रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सभासद - दादाभाई नौरोजी

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष- न्यायमूर्ती रानडे

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले दलित अध्यक्ष - शंकरराव खरात

 आद्य क्रांतिकारक - वासुदेव बळवंत फडके

 वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष- के.सी. नियोगी

 अणूशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष - डॉ होमी भाभा


October 9, 2022

भारतीय नृत्य : पारंपारिक नृत्यशैली

 




भारतीय नृत्य : भारतीय नृत्यशैली 

राज्य   -   नृत्यप्रकार 

ओरिसा - ओडिसी 

उत्तर प्रदेश - कथ्थक नृत्य 

आंध्र प्रदेश - कुचिपुडी 

कर्नाटक - यक्षगान 

तामिळनाडू - भरतनाट्यम 

केरळ - मोहिनी अट्टम ,ओट्टम , थुल्लल , कथकली , मणिपुरी