October 15, 2022

मराठी निबंध : माझा आवडता सण दिवाळी Marathi Nibandh : Majha Aavdta San Diwali

 









मराठी निबंध 

माझा आवडता सण दिवाळी 

'दिवा पाहुनी लक्ष्मी येते' अशी आपल्या समस्त भारतीयांची श्रद्धा आहे.म्हणून सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरात दिवा लावण्याची प्रथा आहे.कारण दिवा हे आपल्या श्रद्धेचं ,भक्तीचं प्रतिक आहे आणि अशा दिव्यांचा एक मंगलमय सण म्हणजे दिवाळी.

   तसे पाहता मला सगळेच सण अत्यंत प्रिय आहेत पण तरीही दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे.नरक चतुर्दशीपासून ते भाऊबीज असे चार दिवस साजरा होणारा हा सण मला वर्षातालेसार्वात आनंदाचे सण देऊन जातो.

या दिवाळीचा थाटमाट काय वर्णावा ? सगळीकडे दिव्यांची रांग लागलेली दिसते.पणत्या,मेणबत्त्या ,निरांजने,समयीमधून अखंड तेवणाऱ्या ज्योती सगळीकडे लख्ख प्रकाश पसरवित असतात.घराघरातून टांगलेले आकाशकंदिल त्याची शोभा अधिकच वाढवीत असतात.आजकाल टर त्याला विद्युत उपकरणांचीही जोड मिळाली आहे.निळ्या,जांभळ्या,पिवळ्या,लाल ,गुलाबी अशा अनेक रंगांच्या दिव्यांचा झगमगाट पाहून असे वाटते जणू अवघे तारांगणच धरतीवर अवतरले आहे की काय !

त्याच्या जोडीला अनेक रंगांचा अत्यंत कौशल्याने वापर करून कलाकुसर आणि नजाकतीने काढलेल्या रांगोळ्या डोळे दिपवून टाकतात.घराघरात स्वच्छता,सजावट,सुशोभीकरण करून आनंदाच्या आणि प्रसन्नतेच्या लहरी पसरत असतात.लहान मुलांचा आनंद ,पाहुण्यांची वर्दळ,महिलांची लगबग यामुलेउत्साहाचे वातावरण असते.घरातील प्रत्येक जण आपआपल्या परीने दिवाळीचा आनंद लुटत असतो.

या सणातील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे.पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी .श्रीकृष्णाने नरकासुराचा वाढ केला.म्हणून हा आनंदाचा दिवस.श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला आणि तब्बल चौदा वर्षांनी ते अयोध्येत परतले आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली.दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन .संध्याकाळी लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते असे म्हणतात.म्हणून या वेळी लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन होते.तसेच व्यापारी लोक आपल्या हीशेबाच्या वह्यांची पूजा करून सुरुवात करतात.या वेळी होणारी आकर्षक रोषणाई ,फटाक्यांची आतिषबाजी ही डोळ्यांसाठी मेजवानीच असते.

यानंतर बलिप्रतिपदा ,भाऊबीज हे दिवस नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे .पती-पत्नी ,भाऊ-बहिण यांच्या नात्याबरोबरच घरातील सर्वच आप्त स्वकीय एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात.एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात.तसेच एकमेकांच्या सहवासात मेजवानी,लाडू,चिवडा,चकली ,मिठाई इ.फराळ ,गोड पक्वान्ने इ.चा आस्वाद घेतात आणि कौटुंबिक वातावरण प्रफुल्लित ठेवतात.

दिवाळी सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंगस्नान.एरवी वर्षभर उठताना आळशीपणा करणारा मी दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठतो.सुर्योदयापूर्वी उठून अंगाला सुगंधित तेल ,उटणे लावून अभ्यंग स्नान केले की शरीराचा रोमरोम पुलकित होतो.

या सगळ्या आनंदी वातावरणात एक गोष्ट खटकते ती म्हणजे फटाके.फटाक्यांमुळे हवा प्रदूषित तर होतेच शिवाय त्याच्या मोठ्या आवाजामुळे कानावरही विपरित परिणाम होतो.कधीकधी अनवधानाने भाजण्यासारखे अपघातदेखील होतात.या गोष्टी टाळल्या पाहिजेत.कमी आवाजाचे ,प्रदूषण न करणारे फटाके अगदी थोड्या प्रमाणात वाजवले तर दिवाळीचा आनंद निश्चितच द्विगुणीत होईल.