October 17, 2022

मोती,शंख,शिंपले कसे बनतात ?

 





          ऑईस्टर प्राण्याचे शरीर व भोवतीचा शिंपला यांच्यामध्ये कधी कधी रेतीचा एखादा बारीक कण घुसतो.हा कण त्या त्या प्राण्याच्या मऊ शरीराला टोचू लागतो.या त्रासापासून सुटण्यासाठी त्या कणाभोवती तो कॅल्शियमच्या क्षाराचे थर चढवतो.

सर्व बाजूंनी अनेक थर दिल्यामुळे कणाचा खडबडीतपणा त्याला जाणवत नाही.हा कण जर शिंपल्यातील जागेत फिरू शकत असेल तर क्षाराचे एकावर एक थर बसून त्याचा सुंदर गोल तयार होतो.हा गोल चमकदार खडा म्हणजेच मोती.



शंख किंवा शिंपला तयार करणारा प्राणी आपल्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट नावाच्या एका क्षाराचे चिकट लुकण बाहेर टाकून त्याचे एकावर एक अनेक थर चढवतो.हे लुकण सुकले की चांगले टणक बनते.प्राणी जसा मोठा बनतो तसा तो आणखी थर चढवतो व शिंपला चांगला मोठा होतो.यातील जुने थर बाहेरच्या भागात तर नवे थर आतील भागात असतात.

गोगलगाई विविध प्रकारचे शंख असेच तयार करतात.