Pages

October 15, 2022

शिंक का येते?

 जिज्ञासा

शिंक का येते ?

 शिंक येणे ही प्रतिक्षिप्त शारीरिक क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे मेंदूच्या नकळत मज्जारज्जू मार्फत आपल्या संरक्षणाकरिता किंवा अन्य काही कारणास्तव अवयवांच्या ज्या क्रिया घडवून आणल्या जातात त्यांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. अशा क्रियांवर आपला ताबा नसतो. नाकाच्या आत पातळ त्वचा असते. ती काही कारणाने हुळहुळली किंवा चुरचुरली तर शिंक येते. सर्दी झाल्यानंतर आतील त्वचा थोडी सुजते किंवा बाहेरील एखादा कण गेल्याने किंवा स्पर्शामुळे शंका येते. अशावेळी आतील हवा जोराने बाहेर फेकली जाऊन त्या योगे आतील कण, बाष्प हवेच्या झोताबरोबर बाहेर फेकले जाते. शिंक आणण्यासाठी काहीजण तपकीर ओढतात किंवा दोऱ्याचे  टोक नाकात घालतात.