November 9, 2022

महाराष्ट्रातील नदीप्रणाली Maharashtratil Nadipranali Samanydnyan



महाराष्ट्रातील नदीप्रणाली 

या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील नदीप्रणालीचा अभ्यास करणार आहोत.

सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे.तो महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तर-दक्षिण असा पसरलेला आहे.येथे उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेकडे व पूर्वेकडे वाहत जातात,तसेच सातपुडा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट , महादेव डोंगर यांचाही जलविभाजक आहे.

  * महाराष्ट्रातील काही नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात.त्यात गोदावरी,कृष्ण,भीमा,पैनगंगा या नद्यांचा समावेश होतो.या नद्या महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा ,आंध्र प्रदेश राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात.

  * गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.तिची महाराष्ट्रातील लंबी 668 कि.मी.आहे व ती  सर्वात जास्त जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे.

  * संगमनेर व नेवासा ही ठिकाणे प्रवरा नदीच्या काठावर वसली आहेत.संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली.

  *गोदावरी नदीवर गंगापूर ( नाशिक ) हे देशातील पहिले मातीचे धरण आहे.

  * जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात.

  * उजनी धरणाच्या जलाशयास यशवंतसागर असे म्हणतात.

  * गोदावरीला दक्षिणेकडील गंगा असे म्हणतात.

  * भीमा नदी महाराष्ट्रातील पुणे ,सोलापूर ,अहमदनगर या जिल्ह्यांतून वाहते.

  * मुळा -मुठा नद्यांचा संगम पुणे येथे होतो.या नद्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव या ठिकाणी भीमेला मिळतो.

  * भीमा-नीरा यांचा संगम पुणे जिल्ह्यात नीरा-नरसिंगपूर येथे झाला आहे.

  * महादेव डोंगरांनी भीमा व कृष्णा नद्यांचे पात्र वेगळे झालेले आहे.

  * सरस्वती ही लुप्त नदी मानली जाते.

  * कृष्णा नदी ही सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते.

  * कृष्णा व कोयना यांचा संगम कराड येथे होतो. त्यास 'प्रीतिसंगम' असे म्हणतात.(यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ)

   * कोयना धरणाच्या जलाशयास 'शिवाजीसागर' असे म्हणतात.

   * पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे. 

   * वर्धा व वैनगंगा या महाराष्ट्रातील दक्षिणवाहिनी नद्या आहेत.

   * वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात.टी गडचिरोली जिल्ह्यात आहे.

   *नर्मदा ,तापी व कोकणातील सर्व नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.

    * तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिमवाहिनी नदी आहे.(208 कि.मी.)

    * नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी 54 कि.मी. आहे.टी सर्वात लहान पश्चिमवाहिनी नदी आहे.

    *उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.(130 कि.मी.)

    *वैतरणा नदीवर मोडकसागर प्रकल्प आहे.

    *वेळवंडी ही नीरा नदीची उपनदी आहे.

    *अंबी ही  मुठा नदीची उपनदी आहे.

    * महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र - खोपोली (रायगड) 

    * महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा - रत्नागिरी .

    * भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य - गुजरात .