November 13, 2022

To be Phrases इंग्रजी वाक्प्रचार

 

 

 


To be Phrases -

To be on edge – चिडचिड करणे.

To be on terms with – शी सलोख्याचे संबंध असणे .

To have an idea – कल्पना असणे,कल्पना सुचणे .

To have a dream-स्वप्न पडणे.

To have an effect on-  च्यावर परिणाम करणे .

To have a doubt about – च्याविषयी शंका असणे.

To have a difficulty – शंका असणे.

To have a cold – सर्दी होणे .

To have an argument with – शी वाद होणे .

To have an accident – अपघात होणे .

To have time – वेळ असणे.

To have a wish – इच्छा असणे.

To have a success – यश मिळणे .

To have an intention – हेतू असणे.

To have tea etc.- चहा इ.घेणे .

 Account for – च्यासाठी योग्य कारण देणे

Answer somebody back –उलट उत्तर देणे .

Ask after –चौकशी करणे ,कुशल विचारणे .

Bear with –शांतपणे ऐकणे.

Break down –बिघाड होणे,भावनाविवश होणे.

Break into –जबरदस्तीने घुसणे.

Break up –संपणे,विसर्जन करणे.

Bring about –घडवून आणणे .

Bring up –संगोपन करणे.

Call off-मागे घेणे.

Call on –अल्पकाळ भेट देणे, आवाहन करणे.

Carry on –चालू ठेवणे.

Carry out –पार पडणे,अंमलात आणणे.

Come about –घडणे.

Come across –भेटणे,अचानक गाठ पडणे,वाचनात येणे .

Come round –बरे होणे,सहमत होणे.

Cut out for –च्यासाठी योग्य .

Deal in –चा धंदा करणे.

Deal with-च्या शी वागणे,व्यवहार करणे.

Fall out –भांडणे.

Get over  - आजारातून बरे होणे.

Get through – पास होणे,उत्तीर्ण होणे.

Give away-वितरण करणे.

Give up- सोडणे .

Go on –चालू ठेवणे.

Go through –बारकाईने तपासणे.

Jump at –उत्साहाने स्वीकारणे.

Keep back –चोरून ठेवणे,गुप्त ठेवणे.
keep on –चालू ठेवणे.

Look after –काळजी घेणे.

Look for –शोधणे.

Look forward to-उत्सुकतेने अपेक्षा करणे.

Look into –चौकशी करणे.

Look on –मानणे .

Look down upon – तुच्छ लेखणे.

Make up one’s mind –निश्चय करणे.

Make up for –भरपाई करणे.

Pull down –पाडणे,नष्ट करणे.

Put off –पुढे ढकलणे.

Put out –विझवणे.

Pull up –कानउघाडणी करणे.

Put up with –सहन करणे.

Run out of –संपणे.

Stand by –पाठींबा देणे,आधार देणे.

Send for –बोलावणे पाठवणे.

Set in –सुरु होणे.

Set out –प्रवासाला सुरुवात करणे.

Take after –सारखे असणे.

Take down –लिहिणे.

Take off –उड्डाण करणे.

A bolt from the blue –आकस्मिक झालेला आघात,वज्राघात.

A bone of contention – वादाचा किंवा भांडणाचा विषय.

A hard nut to crack –सोडवायला कठीण असा प्रश्न ,अत्यंत अवघड प्रश्न

Add fuel to the fire –आगीत तेल ओतणे.

At arm’s length –जरा दूरच.

At one-एकमताचे.

At one’s beck and call –दिमतीला हजर ,-च्या पूर्ण ताब्यात.

At sixes and sevens –गोंधळात .

At a stretch-सतत.

Beat black and blue –निर्दयपणे चोपून काढणे.

Be at daggers drawn –वैर असणे.

Be at one’s wit’s end-मती गुंग होणे.

Be hand in glove with-दाट मैत्री किंवा संगनमत असणे.

Be under a cloud –संशयाचे वातावरण असणे, प्रतिकूल मत असणे.

Beyond all question –निःसंशयपणे.

Breathe one’s last –मरणे,निधन पावणे,मृत्यू पावणे.

Bring to light –उघड करणे,उजेडात आणणे.

Burn fingers –अडचणीत येणे.

By hook or by crook –भल्याबुऱ्या मार्गाने.

By fits and starts –अनियमितपणे.

By leaps and bounds –अत्यंत वेगाने,झपाट्याने.

Call a spade a spade –परखड बोलणे,भीडभाड न ठेवता स्पष्टपणे सांगणे.

Change colour – गोरामोरा होणे.

Coining money – खोऱ्याने पैसा ओढणे,सहज खूप पैसा कमावणे.

Come to grief –दुःखी होणे,अयशस्वी होणे.

Cook the accounts –खोटे हिशोब तयार करणे.

Flesh and blood –जवळचे नातलग.

Foot the bill –पैसे देणे.

For good –कायमचे.

Go back on –वचन न पाळणे.

Hang in the balance –अनिर्णीत असणे,अनिश्चित असणे.

Hard of hearing –थोडासा बहिरा.

Harp on the same string –तेच ते तुणतुणे वाजवत राहणे.

Have an axe to grind –खाजगी किंवा स्वार्थी उद्देश असणे.

Have at fingertips-निष्णात असणे,पूर्ण माहिती असणे.

Hit the nail on the head –अगदी योग्य गोष्टी करणे,बोलणे.

Hope against hope –आशेला जागा नसतानाही आशा करणे.

Ill at ease –अस्वस्थ करणे.

In black and white –लेखी.

In full swing –पूर्ण जोशात,जोरात .

In high spirits –आनंदात.

In order –असायला हवे तसे,सुव्यस्थित.

In the good books of –-च्या मर्जीत असणे.

In the long run –परिणामी ,अखेर ,सरते शेवटी.

In the nick of time-अगदी योग्य वेळी.

Into hot water –अडचणीत.

Into the bargain –च्या जोडीला ,भरीला भर.

Keep place with –च्या बरोबरीने जाणे.

Know where the shoe pinches – अडचण कोठे आहे ते कळणे.

Learn by heart –पाठ करणे.

Leave no stone unturned -कोणताही उपाय करण्याचे बाकी न ठेवणे.

Leave one in the lurch-एखाद्याला संकटात सोडून देणे.

Like a fish out of water –चमत्कारिक परिस्थिती,अत्यंत अस्वस्थ होणे.

Live by wits –अकलेच्या जोरावर पोट भरणे.

Live from hand to mouth –कसाबसा उदरनिर्वाह करणे.

Lose ground –प्रभाव कमी होणे.

Lose heart –नाउमेद होणे.

Make a clean breast of – सर्व काही कबूल करणे.

Make both ends meet –उत्पन्नात भागवणे.

Make common cause with-सहकार्य करणे.

Meet half way-तडजोड करणे,समझोता करणे.

Minting money-खोऱ्याने पैसा ओढणे.

Move heaven and earth-प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.

Neither here nor there –मुद्दयाला सोडून .

Nip in the bud –मुळातच नष्ट करणे.

Off and on –अधूनमधून .

On the alert –जागरूक,दक्ष ,सावध.

Out of date –कालबाह्य .

Out of hand –नियंत्रणाबाहेर.

Out of the way-चमत्कारिक ,मुलखावेगळे .

Pay off old scores –सूड घेणे.

Put a spoke in wheel-अडथळा करणे, योजना उधळून लावणे.

Put one’s foot down-कठोरपणे वागणे.

Rain cats and dogs-मुसळधार पाऊस पडणे.

Red handed –रंगेहात ,प्रत्यक्ष गुन्हा करताना.

See eye to eye with-सहमत असणे,पटणे.

Smell a rat-संशय घेण्यास जागा असणे.

Spread like wild fire-अतिशय वेगाने पसरणे.

Take off-उड्डाण करणे.

Take into account-विचारात घेणे,- चा विचार करणे.

Take to heart-मनाला लावून घेणे,दुःख करणे.

Take to one’s heels-पलायन करणे,पळून जाणे.

Take to task –खरडपट्टी काढणे.

Take stock of-आढावा घेणे.

The gift of the gab-वक्तृत्वाची देणगी.

The ins and outs-संपूर्णपणे,बित्तंबातमी.

The long and short of it –थोडक्यात सांगायचे म्हणजे.

The order of the day- नित्याची गोष्ट.

Through thick and thin –चांगल्या-वाईट सर्व परिस्थितीत .

To all intents and purposes –प्रत्यक्षात,खरोखर,वस्तुतः.

To one’s hearts content –मनसोक्त ,हवे तेवढे.

Tooth and nail-सर्व शक्तीनिशी.

Turn a deaf ear to-दुर्लक्ष करणे.

Vanish into thin air –पूर्णपणे नाहीसे होणे.

With a high hand –मग्रुरीने ,अरेरावी वृत्तीने.

With all one’s heart –अगदी मनापासून .

Within a stone’s throw of-अगदी जवळ.

With one voice –एकमताने.

With open arms –खुल्या मनाने ,प्रेमभराने.

Without reserve – पूर्णपणे.

To be fond of – ची आवड असणे .

To be glad of –आंनद वाटणे.

To be good at – च्यात वाक्बगार असणे.

To be afraid of – ची भीती वाटणे .

To be angry with – च्यावर रागावणे .

To be bent on – चा निश्चय असणे .

To be aware of – ची जाणीव असणे .

To be cross with – च्यावर चिडलेले असणे .

To be busy with – च्यात गुंतलेले असणे .

To be grateful to- चा आभारी असणे .

To be ungrateful to – शी कृतघ्नपणे वागणे .

To be hungry – भूक लागणे .

To be ill with – ने आजारी पडणे .

To be indifferent to – च्या विषयी उदासीन असणे .

To be proud of – चा अभिमान वाटणे .

To be sick of – चा उबग येणे .

To be jealous of – चा मत्सर वाटणे .

To be regardless of – च्याविषयी बेपर्वा असणे.

To be sorry – वाईट वाटणे .

To be thirsty – तहान लागणे .

To be successful –यशस्वी होणे .

To be worthy of – ला लायक असणे .

To be pleased with – च्यावर खूश असणे .

To be tired of – चा कंटाळा येणे .

To be related to- शी नातेसंबंध असणे.

To be used to – चा सराव असणे .

To be in a hurry – घाईत असणे.

To be in two minds –द्विधा मनस्थितीत असणे.

To be off ones guard – गाफील असणे.