November 10, 2023

8th Standard NMMS Exam Online Test - 03

 



नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 

आज आपण सोडवणार आहोत 8 वी NMMS परीक्षा ऑनलाईन टेस्ट .

यामध्ये पेपर - 02  शालेय क्षमता चाचणी

 ( सामान्य विज्ञान , सामाजिक शास्त्रे व गणित )

 यावर आधारित विविध टेस्ट सोडवणार आहोत. 

यापूर्वीच्या टेस्ट येथे सोडवा .

NMMS ऑनलाईन टेस्ट क्रमांक - 01

NMMS ऑनलाईन टेस्ट क्रमांक - 02


आजची टेस्ट आहे - 

पेपर - 02 -  शालेय क्षमता चाचणी ( सामान्य  विज्ञान , सामाजिक शास्त्रे व गणित )

उद्योग  या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न .



November 3, 2023

8th Standard NMMS Exam Online Test - 02

 




       8 वी NMMS ऑनलाईन टेस्ट - 02



नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 

आज आपण सोडवणार आहोत 8 वी NMMS परीक्षा ऑनलाईन टेस्ट .

यामध्ये पेपर - 02  शालेय क्षमता चाचणी

 ( सामान्य विज्ञान , सामाजिक शास्त्रे व गणित )

 यावर आधारित विविध टेस्ट सोडवणार आहोत. 

आजची टेस्ट आहे - 

पेपर - 02 -  शालेय क्षमता चाचणी ( सामान्य  विज्ञान , सामाजिक शास्त्रे व गणित )

सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न .




November 1, 2023

8th Standard NMMS Guess Paper- 01 8 वी NMMS ऑनलाईन टेस्ट - 01


नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 

आज आपण सोडवणार आहोत 8 वी NMMS परीक्षा ऑनलाईन टेस्ट .

यामध्ये पेपर - 02  शालेय क्षमता चाचणी

 ( सामान्य विज्ञान , सामाजिक शास्त्रे व गणित )

 यावर आधारित विविध टेस्ट सोडवणार आहोत. 

आजची टेस्ट आहे - 

पेपर - 02 -  शालेय क्षमता चाचणी ( सामान्य  विज्ञान , सामाजिक शास्त्रे व गणित )

सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न .


September 6, 2023

सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण दिनविशेष






नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत, सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण दिनविशेष

 १ सप्टेंबर

दुसरे महायुद्ध सुरू. (१९३९)


शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (१९६२)


आयुर्विमा महामंडळाची स्थापना. आकाश क्षेपणास्त्राची चाचणी. (१९९८)


सॅनफ्रान्सिस्को येथे अॅन्झस करार संपन्न झाला. (१९५१)


कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म. (१८८७)


२ सप्टेंबर


थोर समाजसेवक, शिक्षक व साहित्यिक श्री. म. माटे यांचा जन्म. (१८८६)


ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर स्मृतिदिन.

जपानने माघार घेतल्याने दुसरे महायुध्द संपुष्टात आले. (१९४५)


विश्वनाथ आनंद याने त्याचा प्रतिस्पर्धी कास्पारोव्ह याचा परभव करून बुध्दिबळातील विजेतेपद मिळविले. (१९९६)

वि.स. खांडेकर यांचे निधन. (१९७६)


३ सप्टेंबर


महाराष्ट्रशाहीर साबळे झाला. (१९२३)


 श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुलची स्थापना केली. (१९१६)


पंत महाराज बाळे कुद्रीकर यांचा जन्म झाला. (१८५५)


आध्यात्मिक विचारवंत दत्ता बाळ यांचे निधन. (१९८२)


सुविचार :- आत्मविश्वास हा माणसाचा खरा मित्र आहे.

४ सप्टेंबर


 *  भारताचे पितामह दादाभाई नौरोजी जन्मदिन. (१८२५).

 * मोघल आणि छत्रपती शिवराय यांच्या मध्ये पुरंदरचा तह. (१६६५)


*चौथ्या महिला आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ. (१९९५)

 * लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी सुरू केलेल्या बालवीर चळवळीचा पहिला मेळावा भरविला गेला. (१९०९)

 सुविचार :- अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे.

५ सप्टेंबर

 *शिक्षकदिन थोर तत्त्वज्ञ व भारताचे दुसरे राष्ट्रपती राधाकृष्णन  यांचा जन्म.(१८८८)

* शिवरांयाच्या पत्नी सईबाई यांचे निधन. (१६५९ ) थोर समाजसेविका मदर तेरिसा यांचा मृत्यू. (१९९७).

 *नाटककार, कवी रॉय किणीकर यांचा मृत्यू. (१९७८)

सुविचार :- अज्ञान हाच आपला पराजय आहे.


६ सप्टेंबर-

 *  भारत पाक युध्दास प्रारंभ. (१९६५)

 * मराठी रंगभुमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा          जन्म झाला. (१९०१)

 *बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे निधन. (१९९५) 

  *   प्रसारभारती हे विधेयक लोकसभेत मंजूर.


* भारतातील प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ सत्यचरण चॅटर्जी यांचा जन्म (१९०५)

 *  संतचरित्रकार महिपतीबुवा तारहाबादकर यांनी समाधी घेतली.


७ सप्टेंबर

दुर्गा खोटे यांचा जन्म झाला. (१९०५)

बँक ऑफ इंडियाची पहिली स्वदेशी बैंक प्रारंभ. (१९०६)

अमेरिकेचे सिनेटर ग्रुपी लॉन्स यांची अंगरक्षकाकरवी हत्या झाली. (१९३५)

जर्मन भारत महोत्सव प्रारंभ झाला. (१९९१)

वैद्यक विषयातील श्रेष्ठ विद्वान व थोर सुधारक डॉ. भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (१८२४)


८ सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.

लोकमान्य टिळकांवर पहिला राजद्रोहाचा पहिला खटला भरण्यात आला.(१८९७)

गायिका आशा भोसले यांचा जन्म झाला. (१९३३)

पहिल्या भारतीय महिला शास्तज्ञ डॉ. कमला सोहनी यांचा मृत्यू. (१९९७)

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची  स्थापना आशिया खंडातील इराण देशात झाली.


९ सप्टेंबर


उत्तर कोरिया स्वंतंत्र झाला. (१९४८)

 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या जसपाल राणाला नेमबाजीमध्ये सवर्णपदक मिळाले. (१९९८)


रविकिरण मंडळाचा पहिला 'किरण' प्रकाशित झाला. (१९२३)


रशियातील सुप्रसिद्ध लेखक टॉलस्टॉय याचा जन्म. क्रांतीवीर हुतात्मा शिरीषकुमार याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले.


१० सप्टेंबर


मॅगनेलने समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. (१५१९)


पहिले महाराष्ट्रीयन ब्राह्मण हणमंत दीक्षित इंग्लंडला गेले. (१७८१)

क्रिकेटवीर कुमार श्री. रणजीतसिंह यांचा जन्म झाला. (१८७२)


गणिततज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ लुई जेमिनिक पिले यांचे निधन झाले. (१९२५)


देशभक्त वसंत दाते व नारायण दाभाडे यांनी आत्मबलिदान केले.

गोंविदवल्लभपंत यांचा अलमोडा येथे जन्म. (१८८७)


११ सप्टेंबर


शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदाचे गाजलेले भाषण. (१८९३)

आचार्य विनोबा भावे जन्मदिन. (१७१२)


अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले. (१७९५)


मुंबई शहरात विजेचे दिवे चमकले. (१९०५)


हिन्दी कवियत्री वर्मा यांचा मृत्यू झाला. (१९८७)


विश्वबंधुत्व दिन.


१२ सप्टेंबर


विनोबा भावे यांचा मृत्यू (१९२६)


सुप्रसिद्ध संगीतकार जयकिशन यांचे कावीळीमुळे निधन झाले. (१९७१)

गावसकरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर.

औरंगजेबाने आदिलशाहीचा शेवट केला. (१६८६)

प्रतापसिंह भोसले यांचे एकनिष्ठ सेवक रंगो बापूजी गुप्ते हे अन्यायाविरूध्द दाद मागण्यासाठी इंग्लंडला गेले. (१८३९)


१३ सप्टेंबर

हैद्राबादच्या विलिनीकरणासाठी भारतीय सैन्य रवाना झाले. (१९४८)

प्रार्थना समान संस्थापक परमानंद यांचा मृत्यू झाला. (१९४२)


* उत्कृष्ठ हॉकीपटू अरोरा कुलवंत यांचा जन्म झाला. (१९३५)

 क्रांतिवीर जतिंद्रनाथ दास यांनी बोस्टन येथील तुरूंगात प्राण त्याग केला.


* भारत चीन युध्दात चीनने मॅकमोहन रेषा पार करून अरुणाचल प्रदेशात प्रवेश केला. (१९६२)


१४ सप्टेंबर


हिंदी दिवस.


 सर्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात. (१८१३)

भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून तेथे भारतमातेचे मंदिर उभारले.


★ नटवर्य काशीनाथ घाणेकर यांचा जन्म झाला. (१९३२)


स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अनंत भिडे यांचा मृत्यू झाला. (१९९८)


१५ सप्टेंबर


भारतात दूरदर्शन सुरू. (१९५९) पहिले केंद्र दिल्ली येथे सुरू झाले.


विख्यात शास्त्रज्ञ गॅब्रिल फॅरनहीट यांचा मृत्यू (१७३६).

तापमापकात पारा वापरण्याच्या योजनेने संशोधनात क्रांती.


विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली. (१९५३)

 शिक्षणतज्ञ राम जोशी यांचा मृत्यू झाला. (१९९८)


१६ सप्टेंबर


* मराठीतील थोर साहित्यिक जयवंत दळवी यांचे निधन झाले. (१९९४)


* एम. एस. सुब्बालक्ष्मी यांचा जन्म झाला. (१९१६) सुप्रसिध्द इतिहास आबासाहेब मुझुमदार यांचे निधन. (१९७३)


पाऱ्याचा वापर करून तापमापक यंत्र तयार करणारे शास्त्रज्ञ गॅब्रिएल फॅरनहाईट यांचे निधन. त्यांच्याच स्मरणार्थ तापमान फॅरनहाइटमध्ये मोजले जाते. (१७२६)

१७ सप्टेंबर


समाजसुधारक व पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म झाला.


कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (१९८७)

चोविसावी ऑलिंपिक स्पर्धा सेऊल येथे सुरू झाली. (१९८८)

हैद्राबाद संस्थान निजामशाहीतून मुक्त झाले. (१९४८)


सुविचार - अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचे निर्माण केंद्र आहे. खाली पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे.


१८ सप्टेंबर


प्रसिद्ध ब्रिटिश विद्वान डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांचा जन्म. (१७०९)


हॉलिवूडची सम्राज्ञी समजली जाणारी श्रेष्ठ अभिनेत्री ग्रेटा गार्बो हिचा जन्मदिन. (१९०५)

 महात्मा गांधीजीनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसाचे आमरण उपोषण केले. (१९२४)

 भारताचे माजी उपराष्ट्रपती हिदायतुल्ला यांचे निधन झाले. (१९९२)


१९ सप्टेंबर


इंग्रज मराठे यांच्यामध्ये पहिले नाविक युध्द झाले. (१६७९)

सुप्रसिद्ध संगीत संशोधक विष्णु भातखंडे यांचे निधन झाले. (१९३६)

  पहिला व्यंगचित्रपट 'टीम बोलविली' हा प्रकाशित झाला. ( १९२८)


रोगप्रतिकारक लस शोधून काढणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म.(१८९५)


सुविचार :- अभिमान आणि अज्ञान तरूणपणाची नासाडी करते.


२० सप्टेंबर


 तुकाराम महाराजांच्या विख्यात शिष्या संत बहिणाबाईचे निधन झाले. (१७००)


'सकाळ' व 'साप्ताहिक स्वराज्य' या वृत्तपत्राचे संपादक व मालक नानासाहेब परुळेकर यांचा जन्म झाला. (१९९७)


सुप्रसिद्ध संशोधक जॉर्ज ऑगस्ट यांचे निधन झाले. (१९२५)


 बालक कल्याण केंद्राची सुरूवात झाली. (१९५४)

सुप्रसिद्ध हिन्दी चरित्र अभिनेता अनुपकुमार यांचे निधन झाले. (१९९७)


२१ सप्टेंबर

गोवळकोंड्याची कुतबशाही औरंजेबाने संपुष्टात आणली. (१६८७)

 प्रसिद्ध उद्योगपती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामकृष्ण बजाज यांचे निधन.(१९९४)

खडीचा वापर करून पक्की सडक तयार करण्याच्या यंत्राचा शोध लावणारे इंग्रज अधिकारी जॉन मॅकॅडम यांचा जन्म. (१७५६)


सुविचार :- आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे.


२२ सप्टेंबर


 कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन. (१८८७)

 महिला क्रांतिकारक मॅडम कामा जन्मदिन. (१८६१)

 रोजी हॉकीपटू जंटल आर. एस. यांचा जन्म झाला. (१९२२)

सुप्रसिध्द लेखक रणजीत देसाई यांची गाजलेली 'स्वामी' कादंबरी प्रसिद्ध झाली. (१९६२)

मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन झाले. (१९९१)


२३ सप्टेंबर


सत्यशोधक समाजाची स्थापना. (१८७३) > आदीलशाही संपुष्टात आली. (१६८६)

विषुववृत्तीय दिन. 

नेपच्यून गडाचा शोध लागला.

लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षासाठी डांबले गेले.(१९०८)


२४ सप्टेंबर


 श्रेष्ठ देशभक्त मादाम भिकाजी कामा यांचा मुंबईत पार्शी कुटुंबात जन्म झाला. (१८६१)


प्रख्यात पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म झाला. (१९२४) पुणे करार झाला. (१९३२)


* आचार्य अत्रे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. (१९५४) संपूर्ण सूरत शहर प्लेगग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले. (१९९४)


२५ सप्टेंबर 


कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.(१९१९)


श्रीलंकेचे पंतप्रधान सालेमन बंदरनायके यांची बौध्द भिक्षकाकडून हत्या झाली.(१९५९)


पुणे नगरीत पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.

 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म झाला. (१९१६) (१९८३)


२६ सप्टेंबर


लक्ष्मणराव किर्लोस्कर स्मृतिदिन. (१९५६)


न्यूझीलंड स्वतंत्र झाला. (१९०७)


हिन्दी चित्रपट सृष्टीतील थोर संगीतकार हेमंतकुमार मुखर्जी यांचे निधन कलकत्ता येथे झाले. (१९८९)

पत्रकार व माजी खासदार विद्याधर गोखले यांचे निधन. (१९९६)

थोर तत्वचिंतक व लेखक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्म.


२७ सप्टेंबर


जागतिक पर्यटनदिन.


राजा राममोहन रॉय स्मृतिदिन. (१८३३)


अनुताई वाघ स्मृतिदिन. (१९९२)

शि. म. परांजपे यांचे निधन झाले. (१९२९)

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली. (१९९०)


२८ सप्टेंबर

 स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या गायनकोकिळा लता मंगेशकर जन्मदिन. (१९२९)

★ लुई पाश्चरचा स्मृतिदिन. (१८९५) + सशस्त्र क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म झाला. (१९०७)

 * देशभक्त अनंत हरी मिश्रा यांना फाशी झाली. (१९२७)


सुविचार :- आळस शरीर घटविते, मनासही खाते.


२९ सप्टेंबर


मुस्लीम समाजसुधारक हमीद दलवाई यांचा जन्म झाला. (१९३२)

आग्रा घराण्यातील प्रसिद्ध गायक उस्ताद युनुस हुसेनखान यांचे निधन झाले.(१९९१)


ब्रिटीश गव्हर्नर क्लाईव्ह लॉईड यांचा जन्म. (१७२५)


सुविचार :- जो निष्कर्म होऊन परमात्माला समर्पीत होतो तोच आनंदाला प्राप्त होतो. आनंद हा असा सुगंध आहे की जो दुसऱ्यावर शिंपीत असताना स्वतःवरही शिंपला जातो.


३० सप्टेंबर


पेनिसिलीनचा शोध लागला. (१९२९)


आरती साहा ही पहिली आशियाई महिला इंग्लिश खाडी पोहून गेली. (१९५९)

 प्रलयंकारी भुकंप होऊन सुमारे दहा हजार लोक मृत्यूमुखी

पडले. (१९९३)


जगप्रसिद्ध संपादक व हिंदुमहासभेचे अध्यक्ष रामानंद चटर्जी यांचे निधन. (१९४३)


सुविचार :- कायद्यापुढे सगळे लहान.

July 27, 2023

15 August मराठी भाषण आपला स्वातंत्र्य दिन


स्वातंत्र्य दिवस मराठी भाषण

15 ऑगस्ट मराठी भाषण




 अध्यक्ष महाशय ,गुरुजन वर्ग,  उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,

 आज आपल्या आनंदाचा दिवस .उत्साहाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. भारताचे समाज क्रांतीचा आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचा. त्यांच्या कर्तृत्वाचा विजय म्हणजे स्वातंत्र्य दिन. 150 वर्षे इंग्रजांच्या जुलूमशाहीतून मुक्त झालेल्या भारताचा हा स्वातंत्र्य दिन.

          मित्रहो,आज आपण अतिशय सुस्थितीत आणि सुरक्षित आहोत.तो पारतंत्र्याचा काळ आठवून पहा.कसे जगले असतील हे लोक? कसा सहन केला असेल त्यांनी इंग्रजांचा अत्याचार ?अहो नुसते आठवले तरी अंगावर शहारे येतात.व्यापारी म्हणून आलेल्या या गोऱ्यांनी आपल्या भारतात बस्तान बसवले.हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. आपल्या भोळ्याभाबड्या ,काही अंशी अडाणी जनतेवर त्यांनी हुकूमत गाजवणे सुरू केले.

    पाहता पाहता त्यांनी सर्व देश व्यापला आणि राज्यकर्ते बनले. 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी 'अशा पद्धतीने त्यांनी भारतीय जनतेला गुलाम बनविण्याचा चंगच बांधला. अनेक व्यवसाय सुरू केले. भारतीय जनतेला नोकरी देऊन त्यांच्यावर हुकूमत दाखवून कसलीही कामे इंग्रज सरकार करून घेऊ लागले.

    हळूहळू जनतेच्या लक्षात येऊ लागले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा वीट येऊ लागला होता आणि अशातच क्रांतीच्या ज्वाला भारतीय तरुणांच्या रक्तात भडकू लागल्या. भगतसिंग,राजगुरू,सुभाषचंद्र बोस,वासुदेव बळवंत फडके अशा अनेक धुरंधरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले.अहिंसेचा मार्ग स्वीकारत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी ब्रिटिशांच्या हुकूमशाहीचा निषेध करत अनेक आंदोलने केली, सत्याग्रह केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"  असे विश्वासपूर्ण उद्गार काढत भारतीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देत इंग्रजी सत्तेला त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असे परखडपणे विचारत लोकमान्य टिळकांनी इंग्रजा विरुद्धची आपली चळवळ बळकट केली.

      "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा l " असे भावनिक आवाहन भारतीयांना करत सुभाष बाबूंनी 'आझाद हिंद सेना ' नावाची सशस्त्र क्रांतीची बलाढ्य फौज गोऱ्या इंग्रजा विरुद्ध उभी केली. कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वातंत्र्य हे मिळवावयाचेच,असा चंग प्रत्येक नेत्यांनं मनाशी बांधला होता. प्राण गेला तरी बेहत्तर, पण माझ्या मायभूमीला मी पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त करणारच, अशी क्रांतीची चळवळ भक्कम करत असताना इंग्रजांनी आपल्या नेत्यांवरही अनेक प्रकारचे अत्याचार केले.

       कुणाला काळ्यापाण्याची शिक्षा दिली, कुणाला जन्मठेप तर कुणाला चक्क फाशीला दिले! अशा क्रूर,दुष्ट इंग्रजांचा नायनाट व्हावा म्हणून त्यांनी ते सहनही केले. वि.दा. सावरकर,लाला लजपतराय,सरदार वल्लभ भाई पटेल,महात्मा ज्योतिबा फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर अशा अनेक नेत्यांनी समाज क्रांतीसाठी आणि देश हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. अनेकांच्या बलिदानाने, अनेक नेत्यांच्या कर्तृत्वाने भारत देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला आणि आपण जुलमी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झालो.

      आता आपण मुक्तपणे जगायला सिद्ध झालो.मित्रहो स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेले त्यावेळचे नेते, त्यांचे चरित्र वाचले तरी अंगावर रोमांच उठतात. रक्त सळसळते आणि आताच्या राजकारणी नेत्यांचे घोटाळ्यांचे पराक्रम पाहिले तर वाटते की, खरंच आपला देश स्वतंत्र झाला आहे काय? मित्रहो,आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे भाषण येथेच थांबवतो.

 जय हिंद! जय भारत!








July 9, 2023

Lokmanya Tilak Marathi लोकमान्य टिळक मराठी भाषण

लोकमान्य टिळक मराठी भाषण

Lokmanya Tilak Marathi Speech 




 "नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते, 

समृद्ध लेखणीची जळती मशाल होते,

परकीय बंदीवास शापीत देश होता ,

पण आग केसरीचा एकेक लेख होता,

 त्या सिंहगर्जनेने जागा समाज झाला,

उदयास भारतात  स्वातंत्र्यसूर्य आला......!"

        सूर्याप्रमाणे तेज दिसणारेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक, गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो...

           भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव 'बाळ गंगाधर टिळक ' असे होते. त्यांचे नाव केशव असे होते. पण सर्वजण त्यांना लाडाने 'बाळ' असे म्हणत. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

     लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख असलेल्या टिळकांचे गणित आणि संस्कृत हे आवडीचे विषय होते. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या युक्तीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले. टिळकांचे गणितातील प्राविण्य  तर वाखाणण्याजोगे होते . एकदा गुरुची वर्गात गणित शिकवत होते. सर्व मुलांनी गुरुजींनी दिलेली उदाहरणे वहीत लिहून सोडवायला सुरुवात केली. टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना याबद्दल विचारलेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे असता वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे अचूक उत्तरासहित  व योग्य क्रमाने अचूक सांगितली. टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व  स्मरणशक्ती पाहून गुरुजींना सुद्धा खूप आश्चर्य वाटले.

           टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध प्रचंड चिड होती. त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर बाणा लहानपणापासूनच दिसत होता.

         एकदा टिळक वर्गात बसलेले असताना, त्यांच्या शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफलं टिळकांच्या बाकाखाली टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांनी टिळकांना उभे केले आणि त्यांना ओरडून बाकाखालील टरफलं उचलण्यास सांगितले.  तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले की, " मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफलं उचलणार नाही. " आणि त्यांनी टरफले उचलण्यास साफ नकार दिला. किती हे धाडस! किती ही हिम्मत! आणि  किती ही अन्यायाविरुद्ध चीड! पुढे याच वृत्तीने टिळकांना शांत बसू दिले नाही. याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला. इंग्रज सरकारच्या अन्या्या्विरुद्ध बंड पुकारण्यासाठी!

        लहानपणापासूनच त्यांना उत्साही आणि उत्कट राष्ट्रवादी  आणि क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती. वयाच्या सोळाव्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी बी.ए. व एल. एल. बी. ची परीक्षाही उत्तीर्ण केली. इसवी सन 1880 मध्ये त्यांनी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले.

          टिळकांनी लोक जागृतीसाठी 'मराठा' व 'केसरी' ही वृत्तपत्रे सुरु केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश होता. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकऱ्यांना  संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले आणि केसरी वर्तमानपत्रातून त्यांनी सरकारला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. 1897 पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका  महत्त्वपूर्ण ठरली. भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेलेेेेेे अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांंनी आपले संपूर्ण जीवन भारत आणि भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी पासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले. टिळकांच्या सिंहगर्जनेनेेेेेेेेेेेेेेे संपूर्ण इंग्रज सरकार हादरुन जात असे. टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय केले. इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती. त्यांना ब्रिटिश सरकारने 'भारतीय असंतोषाचेेेेेेेेे जनक' असे संबोधले.

         "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" "उजाडले पण सूर्य कुठे आहे?" "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!" अशा अग्रलेखांमधून त्यांनी इंग्रज सत्तेवर घणाघात केला.

   "कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी, त्यावर पाय ठेवून उभा राहील मी", असे ते म्हणत.

     स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. 'देश कार्य म्हणजे देवकार्य' हा विचार त्यांनी भारतीय समाजामध्ये रुजवला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले .

      भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले, याचा मला फार अभिमान आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन.....

 "पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती,

 होऊनिया बेभान धावले भारत मातेसाठी,

 कधी न थांबले विश्रांतीस्तव,पाहिले न मागे,

 संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे."

धन्यवाद!


 






July 6, 2023

इयत्ता तिसरी अभ्यासक्रमावर आधारित जोडशब्द

इयत्ता तिसरी अभ्यासक्रमावर आधारित जोडशब्द

प्रज्ञाशोध परीक्षेकरिता उपयुक्त 

अर्धामुर्धा

अक्राळविक्राळ

आडवातिडवा

अळमटळम

 कागदपत्र 

औरसचौरस

 ऐषआराम

एकटादुकटा

कडेकपारी

चारापाणी

चुपचाप

जिवजंतू

सटरफटर

ध्यानीमनी

पालापाचोळा

देवघेव

मालमसाला

उघडाबोडका

कानाकोपरा

खाडाखोड

चीजवस्तू

दयामाया

टक्केटोणपे

सोनेनाणे

आगतस्वागत

रानोरानी

अवतीभवती

अधून मधून

आसपास

कावराबावरा

कामकाज

काळासावळा

गडकिल्ले

गुरेढोरे

दगाफटका

जेवणखाण

ठाकठीक

तारतम्य

पैसाअडका

बागबगीचा

मुलेबाळे

कर्तासावरता

काबाडकष्ट

गोडधोड

जवळपास

दागदागिने

धनदौलत

नोकरचाकर

आंबटचिंबट

आरडाओरडा

आडपडदा

अचकटविचकट

अक्कलहुशारी

ओढाताण

इडापिडा

उच्चनीच

खेडोपाडी

गोळाबेरीज

जाळपोळ

झाडेझूडपे

साधासुधा

स्थिरस्थावर

थांगपत्ता

भीडभाड

मंत्रतंत्र

अंगतपंगत

कोर्टकचेरी

चिठ्ठीचपाटी

वाडवडील

दिवाबत्ती

डागडुजी

तिखटमीठ

हळदकुंकू

बापलेक

मायमाऊली

उपासतापास

कुजबूज

गाठभेट

जाडाभरडा

झाडझाडोरा

साधाभोळा

चोळामोळा

शेतीवाडी

देवाणघेवाण

सोयरेधायरे

त्रेधातिरपिट

बेलभांडार

मोलमजुरी

खेडीपाडी

दाणावैरण

अमीरउमराव

पैपैसा

सरसकट

धनदौलत

व्यापारउदीम

शिक्कामोर्तब

चिरीमिरी

पानसुपारी

शेठसावकार

काळवेळ

पिवळाधमक

पैसाअडका

जवळपास

नदीनाले

 हाल हवाल

 भाजीपाला

 मेवा मिठाई

 कामधंदा

 गणगोत

 घरदार

 शेतीभाती

 सदा सर्वदा

 धागा दोरा

 जडीबुटी

 दानधर्म

 टंगळ मंगळ

 पाटपाणी

 हावभाव

भोळाभाबडा

रोखठोक

मंत्रतंत्र

दानापाणी

जीर्णशीर्ण

पैपाहुणा

दंगाधोपा

पाचपोच

धरबंद

वरणभात

मायलेक

सुखशांती

दुधदुभते

गाडगेमडके

चंबूगबाळे

जडीबुटी

ऊठबैस

साधाभोळा

चोळामोळा

भांडणतंटा

रामरगाडा

किडूकमिडूक

गाजावाजा

जमीनजुमला

सगेसोयरे

धक्काबुक्की

तडकाफडकी

शेजारीपाजारी

संगतसोबत

धनधान्य

तोडफोड

फौजफाटा

मारपीट

रीतीरिवाज

पोरेसोरे

गोरागोमटा

स्थावरजंगम

सरमिसळ

दंगामस्ती

सवतासुभा

हेवादावा

गूळखोबरे

साधुसंत

बहिणभाऊ

लाडीगोडी

वजनेमापे









July 2, 2023

गुरुपौर्णिमा मराठी भाषण

'गुरुपौर्णिमा'  'व्यास पौर्णिमा' मराठी भाषण





" स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात,

 स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते,

 यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात,

त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लाभतात."

              आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. 'गुरु'  या शब्दांमध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे.ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले,त्यांनी यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरू भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु  द्रोणाचार्य यांचे रामायण- महाभारतातील आदर्श आजही लोकांना नवी दिशा देतात.आई-वडील पंख देतात. त्या पंखात भरारी  मारण्याचेे बळ गुरुजन देतात.

         गुरु परमात्मा परे्षु.प्रत्येक विद्या,कला,,शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये   गुरु -शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो. खरंच मित्रांनो.....

 "विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत

आपल्या जीवनात 'गुरु' नावाचं पान कधीच तुटत नाही."

               आधुनिक काळात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे.तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु-शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे "गुरु बिन कौन बतावे बाट? " या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य उपयोग  होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडवून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे.

             विद्यार्थी मित्रांनो गुरु म्हणजे काय? तर जगातले दुःख नाहीसे करण्याची क्षमता  ही दुसऱ्याची दुःखे पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात  आहेत. हेच हृदय म्हणजे गुरु.

         तर शिष्य म्हणजे काय?  शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक. शिष्य ही अशी एक 'बी ' आहे. ती ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक.

    आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकविलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून  हस्तांतरित करायला हवे! हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल .

 धन्यवाद!


पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 
संख्याज्ञान :
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे
देवनागरी संख्याचिन्हे
रोमन संख्याचिन्हे
संपूर्ण स्पष्टीकरणासहित 






July 1, 2023

गुरुपौर्णिमा - मराठी भाषण

 गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी भाषण



 गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरूंची महिमा थोर आहे.आपले गुरु आपल्याला समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात..

    आषाढ शुद्ध पौर्णिमेला ' गुरुपौर्णिमा ' साजरी केली जाते. याच दिवशी आदिगुरू महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले ,त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे 'गुरुपौर्णिमा'. आपले गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप  आहेत. आपल्या अनमोल जीवनात सुख-दुःख, सत्य- असत्य  पाप-पुण्य या गोष्टींचे स्पष्टीकरण गुरूंनी केलेले असते.

               एखाद्याच्या अंगी पशुत्व  जरी असले तरी त्याला दैवत्व प्राप्त करून देण्याची शक्ती गुरुमध्ये असते. आपले प्रथम गुरु आई-वडील असतात. तर शालेय जीवनात शिक्षक प्रेरणा,नवनवीन ज्ञान देतात. आपण सर्वांकडून काही ना काही शिकत असतो.

       आपले गुरु आपल्याला चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात. गैरवर्तन केल्यावर शिक्षाही देतात. आपल्या गुरांना आपल्याकडून  प्रेम आपुलकी आदर आणि आपलं यशस्वी होणं हवं असतं.

 आपले गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत. त्यांचा सन्मान करणे, आज्ञा पाळणे  हे आपलं परम कर्तव्य असते.

 धन्यवाद! 




 पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ 350 विरुद्धार्थी शब्द  व्हिडिओमध्ये नक्की पहा.






June 26, 2023

हिरवे मित्र - वरूण वृक्षाची ओळख





 नमस्कार मित्रांनो,

 आज आपण 'हिरवे मित्र'  या ज्ञान मालिकेमध्ये वरुण वृक्षाची ओळख करून घेणार आहोत.

 वरूण हा मध्यम आकाराचा वृक्ष निम सदाहरित वनांमध्ये नदीकाठी वाढतो. तो शहरातही अनेक ठिकाणी लावलेला दिसतो. वरुणाची पाने बेलासारखी तीन पर्णिकांनी बनलेली असतात. हिवाळ्यात ही सारी पाने गळतात.हिवाळा संपता संपता वरुणाला शुभ्र पांढरी, सुवासिक, अत्यंत सुंदर फुले येतात. या फुलांमध्ये गुलाबी रंगाचे फुलांच्या बाहेर डोकावणारे पुंकेसर असतात.ही फुले जेव्हा फुलतात तेव्हा झाडावर पाने नसतात. त्यामुळे गच्च फुलांनी बहरलेले वरुणाचे झाड खूप आकर्षक भासते. फुलांच्या तळाशी मधुरस असतो. एकदा फुलांचे परागीभवन झाले की ती पिवळी पडतात. कधी कधी या फुलांसोबतच झाडावर नवी कोवळी पालवी अवतरते. वरुणाच्या सालीपासून 'वरूणादी क्वाथ ' नावाचे औषध मिळते.वरुणाला ' वायवर्ण 'असेही एक नाव आहे.वरूण हा अनेक ठिकाणी मंदिरांजवळ, बौद्ध धर्मीयांच्या मठाजवळ लावलेला असतो. त्यामुळे तो भारतातल्या धार्मिक महत्वाच्या वृक्षांपैकी एक आहे.त्याचे पुंकेसर कोळ्यांच्या लांबसडक पायांसारखे दिसतात. म्हणून वरुणाला इंग्लिश मध्ये 'स्पायडर ट्री 'असे नाव आहे.




June 23, 2023

विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीबाबत महत्वाचा शासन निर्णय




विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती बाबत महत्त्वाचा शासन निर्णय 





विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता विचारात घेऊन, विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करावे. अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकाच्या जागेवर करण्यात यावी आणि प्रत्यक्ष पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येऊ नये, अशी तरतूद उक्त संदर्भ क्रमांक २ येथील शासन परिपत्रकान्वये करण्यात आली आहे. परंतु उक्त संदर्भ क्र.१ येथील अधिसूचनेमधील तरतूद क्र. (४) ख अनुसार शिक्षकाची एका स्तरामधून दूसऱ्या स्तरामध्ये पदोन्नती करताना एनसीटीई ने निश्चित केलेली किमान अर्हता धारण करणे आवश्यक आहे. यामधील तरतुदीनुसार इ. ६ वी ते ८ वी वर्गाकरीता असलेली प्रशिक्षीत पदवीधर अर्हता, तसेच सद्यस्थितीत विज्ञान शाखेतील पदवीधर उमेदवारांची उपलब्धता विचारात घेता, शासन परिपत्रक दि. १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतुद कालबाह्य ठरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे:-


शासन परिपत्रक-


शासन परिपत्रक दिनांक १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतूद वगळण्यात येत असुन, सदर तरतुदीनुसार विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत या शिक्षकांनी पदवी अर्हता धारण केली नसल्यास, अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात यावी. ०२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०६२३१३२२१६६०२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

June 20, 2023

मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

 मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन 

 

*जुन महिना*----------------

1) SMC मिटिंग आयोजन 14/6

2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.

3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन

4) Student pramotion करणे.

5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.

6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.

7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.

8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.

9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 

10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड

11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.

12) Staff Attach-deteach करणे.

13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6

14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ

15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.

16)शा.पो.आ. करारनामा करणे.

17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.

18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.


*जुलै महिना*----------------

1) माता-पालक संघ सभा

2) सरल st. request-coinfirm पाठविणे.

3) मीना राजु मंच सभा

4) SMC मिटिंग

5) कथाकथन स्पर्धा आयोजन

6) शा.पो.आ.सभा

7) दिंडी उपक्रम आयोजन

8) पालक सभा आयोजन

9) आदर्श परिपाठ तयारी

10) गुरुपोर्णिमा उपक्रम

11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी

12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी

13)पायाभुत चाचणी 1 आयोजन 


*आँगस्ट महिना*------------------

1) Student माहिती online भरणे.

2) शिक्षक -पालक संघ सभा

3) SMC मिटिंग आयोजन

4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी

5) सरल school portal भरणे.

6) सरल Staff portal भरणे.

7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम 

8) अकारिक चाचणी १ आयोजन

9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन

10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8

11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन

12) परिसर सहल आयोजन


*सप्टेंबर महिना*-----------------

1) माता-पालक संघ सभा

2) संच मान्यता portal भरणे.

3) गणपती उपक्रम 

4) SMC मिटिंग

5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.

6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.

7) शा.पो.आ.सभा

8) मीना राजु मंच सभा

9) पालक सभा आयोजन

10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.

11) पायाभुत online marks भरणे.

12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.

13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.

14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम 

15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9


*आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना*--------------------

1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.

2) सत्र 1 परीक्षा घेणे.

3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन

4) स्वच्छता अभियान राबविणे.

5) SMC मिटिंग

6) दिवाळी अभ्यास नियोजन

7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10

8) नवरात्र भोंडला आयोजन.

9) चित्रकला उपक्रम आयोजन.

10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.

11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी

12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.

13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन

14) शिक्षक -पालक संघ सभा

15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन

16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10


*डिसेंबर  महिना* --------------------

1) माता पालक संघ सभा

2) SMC मिटिंग

3) शा.पो.आ.सभा

4) पालक सभा आयोजन

5) कला व क्रिडा स्पर्धा 

6) शैक्षणिक सहल आयोजन

7) Udise+ Online भरणे

8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.

9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम


*जानेवारी महिना*------------------

1) शिक्षक -पालक संघ सभा

2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 

3) सा.फुले जयंती उपक्रम 

4) सांस्कृतिक कार्यक्रम 

5) बाल आनंद मेळावा

6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1

7)नेताजी जयंती 23/1

8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन


*फेब्रुवारी महिना* --------------------------

1) माता पालक संघ सभा

2) शा.पो.आ.सभा

3) पालक सभा आयोजन

4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा 

5) आकारिक चाचणी 2 आयोजन

6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी

7) शिवजयंती कार्यक्रम 19/2

8) Udise + online भरणे.


*मार्च महिना* -------------------------

1) शिक्षक -पालक संघ सभा

2)SMC मिटिंग

3) वार्षिक तपासणी

4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ 

5) शाळेची वार्षिक तपासणी

6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग 

7) SSA online link भरणे.

8) जागतिक महिला दिन 8/3

9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3

10) जागतिक अपंग दिन 17/3

11) संत गाडगेबाबा जयंती 4/3

12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.


*एप्रिल महिना* -----------------

1) माता-पालक संघ सभा

2)शा.पो.आ. सभा

3) द्वितीय सत्र परीक्षा 

4) पायाभुत चाचणी 3

5) माँडरेशन तयारी

6) महात्मा फुले जयंती 11/4

7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.

8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.

9) आंबेडकर जयंती 14/4

10) नवोद्य परीक्षा 5 वी

11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी


*मे महिना* ----------------------

1)निकाल जाहीर करणे 

2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.

3) पुढील वर्ष वर्गवाटप,

4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.

5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.

6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल

7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.

 --------------------------------------------

May 4, 2023

माझा आवडता ऋतू मराठी निबंध

 माझा आवडता ऋतू मराठी निबंध

       आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद,हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतूंमध्ये वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो.

    पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो, उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात, सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसाचे टाकत असते,सर्व पशुपक्षीदेखील थंडगार सावलीचा निवारा शोधत असतात आणि त्याचवेळी पाऊस येतो धो- धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमांत गारवा शिरतो, चराचर सृष्टी तृप्त होते.असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही?

     जून मध्ये शाळा सुरू होते.त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा गणवेश,नवी पुस्तके आणि नवी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याचवेळी हा चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या तऱ्हेतऱ्हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगानी फुलून जाते.वाटते की जणू ती वाटच आपल्या सोबत उत्साहाने शाळेत येत आहे!

     हा पाऊस मोठा जादूगार आहे. तो रुक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमली सारखी हिरवळ पसरते. वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात. शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. खळाळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते.

     या पावसाची रूपे तरी किती? कधी तो थुई थुई नाचत येतो.कधी रिमझिमत येतो; कधी तो धो धो कोसळतो; तर कधी प्रचंड गडगडाट करत, विजांचा चकचकाट करत धुवाधार बरसतो.

           एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात. भर दिवसा जणू रात्र सुरू होते.पाऊस पडून गेला की धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. अचानक उघडीप येते, तेव्हा सर्वत्र हिरवागार गालीचा पसरल्यासारखे वाटते. पहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते. क्वचित सूर्याला पावसाची मजा लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो. त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात आणि काय आश्चर्य! आकाशात ते मनोहरी इंद्रधनुष्य तरळू लागते आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात -

 वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;

मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे!

 असा हा सुखदाता पावसाळा सर्वसृष्टीचा पोशिंदाही आहे.तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरणी मातेला सुजलाम सुफलाम बनवतो. चार महिन्यात हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. म्हणूनच मी म्हणतो की,वर्षाऋतू म्हणजे पावसाळा हाच सर्व ऋतूंचा राजा आहे!




January 15, 2023

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान






प्रजासत्ताक दिनानिमित्त

मराठी भाषण

     माझा भारत महान

 आम्ही सारे भारतीय आहोत.

 भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.

 प्रार्थनेच्या वेळी प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याकडून ही प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते या प्रतिज्ञातून व्यक्त होणाऱ्या भावना लहानपणापासूनच मुलांच्या मनात दृढ होत जातात.

   आपल्या भारत मातेच्या अफाट पसरलेल्या भूमीवर विविध भाषा, विविध संस्कृती,अनेक जाती अनेक धर्मांची लोक आहेत. या देशात उत्तरेला जम्मू काश्मीर पासून दक्षिणेला तामिळनाडू केरळ पर्यंत, पश्चिमेला असलेल्या गुजरात महाराष्ट्रापासून ते पूर्वेच्या आसाम नागालँड पर्यंत 29 राज्य आहेत प्रत्येक राज्याची स्वतःची अशी मातृभाषा,  बोलीभाषा यामध्येही विविधता आहे.

 हिंद देश के निवासी,

 सभी जन एक है 

 रंग रूप वेश भाषा

 चाहे अनेक है ।'

 या भारत देशामध्ये हिंदू हा प्रमुख धर्म मानला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदू संस्कृती प्रत्येक भारतीयांच्या नसानसात भिनलेली आहे. असे असले तरी याच भूमीवर मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, बौद्ध अशा अनेक धर्मांनाही तेवढाच मानसन्मान दिला जातो. प्रत्येक धर्मातील सण सारख्याच प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हिंदू धर्मातील दिवाळी,होळी,गणेशोत्सव यांसारख्या सण-उत्सवांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन बांधव सामील होताना दिसतात. तर मुसलमान बंधूंच्या ईद मध्ये हिंदू लोक ही आनंदाने भाग घेतात. ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणासाठी तर  सर्वच भारतीय एकमेकांना 'मेरी ख्रिसमस' असे म्हणत केक, मिठाई शुभेच्छा ख्रिसमस ट्री ची सजावट यांचा वर्षाव करतात. म्हणून कवी वसंत बापट प्रार्थना करतात....

 भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना

 मानवाच्या एकतेची, पूर्ण होवो कल्पना 

 मुक्त आम्ही फक्त मानू, बंधूतेच्या बंधना

 सत्य सुंदर मंगलाची,नित्य हो आराधना

 अशा या उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर भावना असलेल्या देशांमध्ये मात्र काही वेळा जातीय दंगली, धार्मिक तेढ, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, परकीय आक्रमणे अशा काही भयानक संकटांचा सामना करावा लागत आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमा भागात  चालू असलेला संघर्ष, पूर्वेला धुमसत असलेला नक्षलवाद, स्वतंत्र विदर्भासाठी चालू असलेले आंदोलन, दोन राज्यांमध्ये असलेला पाणी प्रश्न अशा देशांतर्गत चालू असलेल्या समस्यांबरोबरच शेजारील देशांची आक्रमणे, घुसखोरी,दहशतवाद यांसारख्या भयानक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत.

   भाषाभेद,दारिद्र्य,बेकारी आर्थिक विषमता,भ्रष्टाचार, लाचखोरी, वशिलेबाजी यांच्या खाईत लोटलेल्या भारतीयांची आपल्या स्वतःची भारतीयत्वाची जाणीव हळूहळू बोथट होऊ लागली आहे. एकमेकांशी प्रेमळ संवाद करणारे डोळे दुसऱ्याकडे संशयाने बघू लागले आहेत. असे असताना माझा देश,माझे देश बांधव, मी भारतीय अशी एकजुटीची भावना कशी बळकट होणार?

पण सभोवतालच्या दुःखांना संकटांना घाबरतील तर ते भारतीय कसले ?

' भीती न आम्हा तुझी मुळी ही

 गडगडणाऱ्या नभा,

 अस्मानीच्या सुलतानीला

 जबाब देती जिभा'

 असे निर्भीडपणे सांगणाऱ्या भारतीयांच्या नसानसातून देशाभिमान, एकात्मता या भावना उसळून वाहत आहेत.

   इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येईल की, लाखो लोकांनी आजपर्यंत देशासाठी बलिदान दिले आहे. अजूनही लोक देशाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी बलिदान देत आहेत. त्यासाठी आपण भारतीयांना  अभिमान असला पाहिजे. आपणही आपापल्या परीने देशासाठी काही ना काहीतरी  योगदान दिले पाहिजे.

   आपण सारे भारतीय एकत्र आलो तर काय चमत्कार घडेल! आपल्या भारतामध्ये अशा कितीतरी चांगल्या बाजू आहेत. आपला देश जगामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. हीच आपली मोठी शक्ती आहे.

 आपण जर या मनुष्यबळाचा कुशलतेने वापर करून घेतला तर जगामध्ये आपला देश सर्वात शक्तिशाली होईल.

      दुष्ट शत्रूंविरुद्ध लढण्याची हिंमत आम्हाला श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून दिलेली आहेच. त्याचबरोबर अलीकडच्या काळातील स्वातंत्र्यसैनिक, थोर समाजसुधारक उदाहरणार्थ- लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यापासून ते आधुनिक काळातील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर,अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजासाठी वाहून घेतलेल्या थोर व्यक्तीमत्त्वामुळे सर्वांनाच देश प्रेमाची प्रेरणा मिळते. मग लढा स्वातंत्र्याचा असो वा परकीय आक्रमणांचा. ते आंदोलन भ्रष्टाचार निर्मूलनाचे असो वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे.आपण सारे भारतीय एकजूट होऊनच लढू.कारण

 'भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई!

 पावन भूमी भारतातली ही आमची आई!!

 धन्यवाद!



January 9, 2023

माझा भारत महान Majha Bharat Mahan Marathi bhashan




 माझा भारत महान

 मराठी भाषण


माझा हिंदुस्थान,माझा,माझा हिंदुस्थान 

हिमाचलाचे हीरक मंडित शिरभूषण भरदार 

वक्षावर गंगा यमुनांचे सळसळती मौक्तिक हार 

कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार 

महोदधीचे चरणा जवळी गर्जतसे आव्हान  

       माझ्या भारतभूचे हे वर्णन ऐकताना रोमरोम फुलून येतो आणि निसर्गाच्या या मुक्त लावण्याबरोबरच गिरीशिखरांचे आणि महासागरांचे आव्हान नजरेसमोर ठाकते. भारताच्या नावाबरोबरच मला आठवते ती माझ्या देशाची अनेकविध परंपरा,संस्कृती आणि पवित्र्य यांचा मनोहर संगम इथं विनयाच्या कोंदणात शौर्य खुलतं तसा लाजऱ्या स्मितातून शालिनीता खुलते. शृंगाराबरोबर वीरता आणि विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे रमणीय रूप आहे.

      माझ्या देशाची संस्कृती संपूर्ण विश्वात वंदनीय, पूजनीय आहे.म्हणूनच स्वामी विवेकानंदांची माय 'ब्रदर्स अँड सिस्टर्स ' ही हाक साऱ्या धर्म मार्तंडाचे काळीज काबीज करून गेली.

       माझ्या देशावर निसर्गाने आपले लावण्य मुक्तहस्ते उधळले आहे. जणुसृष्टीचा लावण्य महोत्सवच. उत्तुंग हिमगिरी, नजर फिरेल अशा खोल दऱ्या,खळखळ करणाऱ्यांना नद्या,डोलणारी हिरवी शेती, तऱ्हेतऱ्हेची मनोहर फुले आणि पावला पावलावर बदलणारी अनेक मनोहर दृश्ये. निसर्गाचे हे मुक्त लावण्य जगाच्या पाठीवर कुठेही नाही. इंद्रधनुचे सात रंग, मोरपिसांची मोहक रंगसंगती यांचा सुरेख लावण्यविलास फक्त माझ्या देशातच पाहायला मिळतो.

'श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटेचोहिकडे,

क्षणात येते सरसर शिरवे,

क्षणात फिरुनी ऊन पडे.'

 हे फक्त माझ्या देशातच शक्य आहे.निसर्गाच्या या मुक्त लावण्यात आणखी एक रंग मिसळला आहे लाल. तो रंग आहे रक्ताचा.स्वधर्म, स्वदेश यांच्यासाठी ज्यांनी या धरणीवर आपले रक्त सांडले,तो रक्ताचा लाल रंग माझ्या देशातील त्यागाची महती सांगतो. सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,कृष्णदेवराय,राणा प्रताप या महापराक्रमी राजांनी माझ्या देशाचा इतिहास आपल्या रक्तांनी रंगवला आहे आणि माझ्या देशाची संस्कृती 'त्यागाची आहे भोगाची नाही' हे सिद्ध केले आहे.

      संस्कृती, संस्कृती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक अर्थ आहे.हा अर्थ 'प्रकृती,विकृती आणि संस्कृती' या तीन शब्दाधारे व्यक्त करता येतो. भूक लागली असता खान ही प्रकृती. भूक लागली नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला याची अधिक गरज आहे हे पाहून त्याला खायला घालणं ही संस्कृती आणि हीच आमची संस्कृती आहे. म्हणून तर 'अतिथी देवो भव' हा महामंत्र आम्ही जपला आहे.

    यजमानाचा धर्म आणि अतिथीचे स्वागत हे आमच्या संस्कृतीचे दोन स्तंभ आहेत. आमच्या संस्कृतीची शालिनीता, पावित्र्यता जपण्यासाठी आमच्या स्त्रियांनी सुद्धा आपले सर्वस्व पणाला लावले आहे म्हणून तर.......

 'अहिल्या, द्रौपदी,सीता,तारा मंदोदरी तथा

पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम् 

 असे आम्ही म्हणतो.आपल्या शालिनीतेने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आमच्या स्त्रियांनी आपल्या शौर्यानेही जगाचे डोळे दीपवले आहेत. राणी लक्ष्मीबाई,राणी चन्नम्मा,जिजाऊ माँसाहेब,अहिल्या होळकर, ताराराणी या स्त्रियांनी आपल्या डोईवरचा पदार्थ तसुभरही न हलवता हातात तलवारी घेतल्या आणि शालिनीता,पावित्र्य याचबरोबर रणचंडीकाही जगाला पाहायला मिळाल्या. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते.

    माझ्या देशाची ही संस्कृती, ही परंपरा साऱ्या जगात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे हे मी अभिमानाने सांगतो.रामाचा त्याग, लक्ष्मण- भरताचे बंधुप्रेम,हनुमानाची स्वामिनीष्ठा, सीतेची पतीनिष्ठा, अर्जुनाचे शौर्य, भीमाची ताकद आणि कृष्णाचे कर्मयोग हे फक्त माझ्या देशातच निर्माण झाले. राम- कृष्णाची परंपरा,शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचा चा इतिहास ही माझ्या देशाची श्रद्धास्थाने आहेत. शंकराचार्य, रामशास्त्री,भवभूती,कालिदास, व्यास,वाल्मिकी राजाभोज,शाहू महाराज,भगतसिंग,महात्मा गांधी, नेहरू, सावरकर, टिळक यांच्यापासून ते ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, कुसुमाग्रज यांच्यापर्यंतची अगणित अनमोल रत्ने केवळ माझ्या देशाच्या मातीतच जन्मली. हा माझ्या देशाचा तर गौरव आहेच पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तींचा गौरव जास्त आहे ज्यांना भारतभूसारखी मातृभूमी लाभली.

       अंतराळात आज आमची विमाने भिरभिरत आहेत. आमच्या पाणबुड्या सागरतळाचा शोध घेत आहेत.आमचे डॉक्टर नवनवीन औषधे शोधण्यात मग्न आहेत.आमचे शास्त्रज्ञ मानवाचे जीवन अधिकाधिक सुखी करण्यात प्रयत्नशील आहेत. आमचे खेळाडू देशाचा ध्वज आंतरराष्ट्रीय सामन्यातून अभिमानाने उंचावत आहेत. आमची मुस्लिम शीख  भावंडे आमच्या हातात हात घालून चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या सत्ताधारी पक्षाने व विरोधी पक्षांनी आमच्या देशातील लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत ठेवली आहे.

    म्हणूनच नेहरूंसारखा पुरुषोत्तम या देशाच्या मातीतच आपली रक्षा विसर्जित व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो तर भगतसिंग सारखा तेजस्वी युवक हसत हसत फासावर जाताना 'पुनर्जन्म जर असेल तर तो मला भारत भूमीतच मिळावा' अशी आस मनी बाळगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर '  ने मजसी ने परत मातृभूमीला ' अशी त्या सागराला विनवणी करतात तर इकबाल सारखा एखादा कवी 'हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा 'अशी जाहीर कबुली देऊन माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाचा तिरंगा आपल्या तीन रंगाने विविधतेतून एकतेबरोबरच आमची त्यागाची,शांततेची आणि समृद्धीची प्रतिमा आसमानापर्यंत उन्नत मानेने सांगतो आहे.

    माझ्या देशाच्या या साऱ्या सत्यशील,सुंदरतेला दृष्ट लागू नये म्हणून हत्याकांडाचे भ्रष्टाचाराचे, गालबोट लागले आहे.हे गालबोट जोपर्यंत चेहऱ्यावरील तिळाच्या रूपात असते तोपर्यंत ते सौंदर्यतीत ठरते पण हे गालबोट जर साऱ्या सौंदर्यावर पसरले तर या सुंदरतेची कुरूपता व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्ही,आम्ही साऱ्यांनी ज्यांना तिरंगा पाहताना भरून येत त्यांनी.

  म्हणूनच मित्रांनो चला, तुम्हाला खळाळणाऱ्या सागराची आण... तुम्हाला या भूमीच्या कणाकणाची शपथ..... या माझ्या देशाची ही गौरवशाली परंपरा,त्या परंपरेचे आपण पाईक आहोत.म्हणूनच आपण एक मुखाने म्हटले पाहिजे...

 गे माय भू तुझे मी,

 फेडीन पांग सारे.

आणीन आरतीला,

हे सूर्य,चंद्र तारे.

 धन्यवाद!




 





January 7, 2023

भाषाविषयक सामान्य ज्ञान Samanydnyan




 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत, भाषाविषयक सामान्य ज्ञान.

-----------------------------------

 कवी व लेखकांची पूर्ण नावे.

-----------------------------------

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे - पु ल देशपांडे

पांडुरंग सदाशिव साने-  साने गुरुजी

कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

यशवंत दिनकर पेंढारकर - कवी यशवंत

त्र्यंबक बापूजी ठोंबरे -  बालकवी

विष्णू वामन शिरवाडकर-  कुसुमाग्रज

राम गणेश गडकरी -  गोविंदाग्रज

मुरलीधर नारायण गुप्ते -  बी

-----------------------------------

थोर व्यक्तींची नावे व संबोधने

-----------------------------------

लोकमान्य -  बाळ गंगाधर टिळक

राष्ट्रपिता - मोहनदास करमचंद गांधी

सरदार, लोहपुरुष -  वल्लभभाई पटेल

नेताजी - सुभाषचंद्र बोस

महात्मा - जोतिबा फुले, मोहनदास करमचंद गांधी

पितामह - दादाभाई नौरोजी

स्वातंत्र्यवीर - विनायक दामोदर सावरकर

महर्षी - वी.रा.शिंदे, धोंडो केशव कर्वे

गुरुदेव - रवींद्रनाथ टागोर

पंडित,चाचा - जवाहरलाल नेहरू

------------------------------------

 थोर नेते व प्रसिद्ध व्यक्ती यांची पूर्ण नावे

------------------------------------

म. गांधी -  मोहनदास करमचंद गांधी

पं.नेहरू -  जवाहरलाल मोतीलाल नेहरू

लो. टिळक - बाळ गंगाधर टिळक

म. फुले - जोतिबा फुले

बाबा आमटे - मुरलीधर देविदास आमटे

लता मंगेशकर - लता दीनानाथ मंगेशकर

आगरकर - गोपाळ गणेश आगरकर

आंबेडकर - भीमराव रामजी आंबेडकर

स्वा.सावरकर - विनायक दामोदर सावरकर

------------------------------------

 संतांची पूर्ण नावे

------------------------------------

संत ज्ञानेश्वर - विठ्ठल पंत कुलकर्णी

संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा आंबिले

संत नामदेव - नामदेव दामाशेटी शिंपी

संत एकनाथ - एकनाथ  सूर्यनारायण पंत

संत रामदास स्वामी - नारायण सूर्याजी ठोसर

-----------------------------------

 थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा

-----------------------------------

'आराम हराम है ।'  - पंडित नेहरू

चले जाव -  महात्मा गांधी

"जय जवान, जय किसान " -  लालबहादूर शास्त्री

"मेरी झाशी नही दूंगी ।" -  राणी लक्ष्मीबाई

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा । "-  सुभाषचंद्र बोस

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!" - लोकमान्य टिळक

"जय जवान,जय किसान,जय विज्ञान " - अटल बिहारी वाजपेयी

-----------------------------------

 राष्ट्रीय महत्त्वाची माहिती

-----------------------------------

राष्ट्रीय फूल - कमळ

राष्ट्रीय प्राणी - वाघ

राष्ट्रीय पक्षी - मोर

राष्ट्रीय ध्वज - तिरंगा

राष्ट्रगीत - जन-गण-मन

राष्ट्रीय गीत - वंदे मातरम

-----------------------------------

 काही कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे

-----------------------------------

माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन 

गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 

शंकर काशिनाथ गर्गे - नाट्यछटाकार, दिवाकर 

चिंतामण त्र्यंबक  खानोलकर - आरती प्रभू 

नारायण मुरलीधर गुप्ते - बी 

दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त 

मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत 

नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास 

यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत 

विनायक जनार्दन करंदीकर-  विनायक 

काशिनाथ हरी मोडक -  माधवानुज 

दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी 

आत्माराम रावजी देशपांडे - अनिल 

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार 

शंकर केशव कानेटकर गिरीश 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी 

वि. वा. शिरवाडकर - कुसुमाग्रज 

राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज ,,बाळकराम 

कृष्णाजी केशव दामले -  केशवसुत

-----------------------------------

 काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी लेखक 

-----------------------------------

ज्वाला आणि फुले - बाबा आमटे 

स्वेदगंगा - विंदा करंदीकर 

बिजली - वसंत बापट 

गीत रामायण-  ग. दि. माडगूळकर 

यथार्थदीपिका - वामन पंडित 

केकावली - मोरोपंत 

दासबोध व मनाचे श्लोक - समर्थ रामदास 

भावार्थरामायण - संत एकनाथ 

नल -दमयंती ,स्वयंवराख्यान - रघुनाथ पंडित 

अभंग गाथा - संत तुकाराम 

भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) - संत  ज्ञानेश्वर

-----------------------------------

 काही नाटके व त्यांचे नाटककार

-----------------------------------

 नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर 

टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर 

साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी -  अत्रे 

प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव ,एकच प्याला, भावबंधन - राम गणेश गडकरी 

कीचकवध, भाऊबंदकी ,मानापमान, विद्याहरण - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर 

सौभद्र - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर 

शारदा -  गोविंद बल्लाळ देवल

-----------------------------------

 काही पुस्तके व त्यांचे लेखक

-----------------------------------

 एक झाड, दोन पक्षी -  विश्राम बेडेकर 

मृत्युंजय , छावा -  शिवाजी सावंत 

तराळ-  अंतराळ - शंकरराव खरात 

बलुतं -  दया पवार 

कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण 

कऱ्हेचे पाणी - अत्रे 

स्मृती चित्रे - लक्ष्मीबाई टिळक 

एरंडाचे गुऱ्हाड - चि. वी. जोशी 

ययाती - वि. स. खांडेकर 

पडघवली - गो.नी. दांडेकर 

गीता रहस्य - लोकमान्य टिळक 

वहिनीच्या बांगड्या - जोशी 

चक्र - जयवंत दळवी 

स्वामी,श्रीमान योगी - रणजीत देसाई

गीताई - विनोबा भावे 

काळे पाणी,माझी जन्मठेप ,वि. दा. सावरकर 

रथचक्र ,गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे 

गुजगोष्टी - ना.सी. फडके 

श्यामची आई साने गुरुजी 

शाकुंतल, मेघदूत, रघुवंश, कालिदास, मृच्छकटिक,

शूद्रक ,मुद्राराक्षस -  विशाखा दत्त 

गीता - व्यास मुनी 

महाभारत - व्यास मुनी 

रामायण - वाल्मिकी

-----------------------------------

 महाराष्ट्रातील समाज सुधारक ,

 विचारवंत व प्रसिद्ध व्यक्ती

-----------------------------------

जगन्नाथ शंकरशेठ - आधुनिक मुंबईचे शिल्पकार 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर - मराठी वृत्तपत्र सृष्टीचे  जनक 

दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी

गोपाळ हरी देशमुख -लोकहितवादी 

भाऊ दाजी लाड -धन्वंतरी या नावाने गौरव 

महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक 

गणेश वासुदेव जोशी स्वदेशीचे आद्य प्रवर्तक 

सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 

महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री जातीचे उद्धारक ,पहिले महाराष्ट्रीय भारतरत्न 

महाराज सयाजीराव गायकवाड - हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - आधुनिक काळातील महान कलीपुरुष

राजर्षी शाहू महाराज - सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष

संत गाडगे महाराज - महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ 

सेनापती बापट - संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या आंदोलनातील अग्रणी 

कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक

आचार्य विनोबा भावे - भारतीय भूदान चळवळीचे जनक

डॉक्टर पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाजाचे संस्थापक 

क्रांतिसिंह नाना पाटील - ब्रिटिशांच्या विरोधातील प्रतिसरकारचे संस्थापक 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - 'ग्रामगीता ग्रंथाचे' निर्माते

बाबा आमटे - कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन चे निर्माते 

अण्णा हजारे - भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अध्यक्ष

वासुदेव बळवंत फडके - आद्य क्रांतिकारक 

विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमालाकार, मराठी भाषेचे शिवाजी 

शिवराम महादेव परांजपे - काळकर्ते 

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे -  इतिहासाचार्य 

दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक

श्रीधर व्यंकटेश केतकर - ज्ञानकोशकार 

नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व 

दत्तो वामन पोतदार - महामहोपाध्याय 

चिंतामणराव देशमुख - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री

डॉ सलीम अली - जागतिक कीर्तीचे पर्यावरण व पक्षी तज्ञ

साने गुरुजी - मृत्यूचे चिंबन चुंबन घेणारा महाकवी, अमृताचा पुत्र 

डॉक्टर होमी भाभा - भारताच्या अणुविज्ञानाचे जनक