गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी भाषण
गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरूंची महिमा थोर आहे.आपले गुरु आपल्याला समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात..
आषाढ शुद्ध पौर्णिमेला ' गुरुपौर्णिमा ' साजरी केली जाते. याच दिवशी आदिगुरू महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले ,त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे 'गुरुपौर्णिमा'. आपले गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप आहेत. आपल्या अनमोल जीवनात सुख-दुःख, सत्य- असत्य पाप-पुण्य या गोष्टींचे स्पष्टीकरण गुरूंनी केलेले असते.
एखाद्याच्या अंगी पशुत्व जरी असले तरी त्याला दैवत्व प्राप्त करून देण्याची शक्ती गुरुमध्ये असते. आपले प्रथम गुरु आई-वडील असतात. तर शालेय जीवनात शिक्षक प्रेरणा,नवनवीन ज्ञान देतात. आपण सर्वांकडून काही ना काही शिकत असतो.
आपले गुरु आपल्याला चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात. गैरवर्तन केल्यावर शिक्षाही देतात. आपल्या गुरांना आपल्याकडून प्रेम आपुलकी आदर आणि आपलं यशस्वी होणं हवं असतं.
आपले गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत. त्यांचा सन्मान करणे, आज्ञा पाळणे हे आपलं परम कर्तव्य असते.
धन्यवाद!
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ 350 विरुद्धार्थी शब्द व्हिडिओमध्ये नक्की पहा.