'गुरुपौर्णिमा' 'व्यास पौर्णिमा' मराठी भाषण
" स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात,
स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते,
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात,
त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लाभतात."
आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. 'गुरु' या शब्दांमध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे.ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले,त्यांनी यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरू भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण- महाभारतातील आदर्श आजही लोकांना नवी दिशा देतात.आई-वडील पंख देतात. त्या पंखात भरारी मारण्याचेे बळ गुरुजन देतात.
गुरु परमात्मा परे्षु.प्रत्येक विद्या,कला,,शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु -शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो. खरंच मित्रांनो.....
"विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत
आपल्या जीवनात 'गुरु' नावाचं पान कधीच तुटत नाही."
आधुनिक काळात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे.तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु-शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे "गुरु बिन कौन बतावे बाट? " या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य उपयोग होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडवून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो गुरु म्हणजे काय? तर जगातले दुःख नाहीसे करण्याची क्षमता ही दुसऱ्याची दुःखे पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहेत. हेच हृदय म्हणजे गुरु.
तर शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक. शिष्य ही अशी एक 'बी ' आहे. ती ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक.
आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकविलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे! हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल .
धन्यवाद!
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा
संख्याज्ञान :
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे
देवनागरी संख्याचिन्हे
रोमन संख्याचिन्हे
संपूर्ण स्पष्टीकरणासहित