July 22, 2024

Words starts with A

 a (अ, जोर देऊन म्हटल्यास एड) an

१. एक:

Draw a star. एक चांदणी काढा.

 There was an orange in the basket.

 टोपलीत एक संत्रे होते.

 २. प्रत्येक. कोणताही

A big sea is called an ocean. 

कोणत्याही मोठ्या समुद्रास महासागर म्हणतात.

about (अबाउट्) १. बद्दल. विषयी. संबंधी

I am going to talk about my favourite animal.

 मी माझ्या सगळ्यांत आवडत्या प्राण्याबद्दल बोलणार आहे.

 २. इकडेतिकडे. सगळ्या बाजूंनी

 A hare was hopping about in a jungle.

एक ससा जंगलात इकडेतिकडे टुणटुण उड्या मारत होता.

३. अंदाजे. जवळजवळ. सुमारे

 There are about fifty lemons on that tree.

 त्या झाडावर सुमारे पन्नास लिंबे आहेत.

 He came at about six.

 तो जवळजवळ सहा वाजता आला.


above (अबव्ह) वर. वरती

The sky above and the ground below.

वर आभाळ आणि खाली जमीन.

अ, आ, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, एड, ओऽ, अॅ, ऑ अशा उच्चारांनी सुरू होणाऱ्या शब्दांच्या आधी 'a' ऐवजी 'an' वापरतात.

absent (अॅब्सन्ट) गैरहजर. रजा

How many children are absent today?

आज किती मुले गैरहजर आहेत ?

accident (अॅक्‌ सिडन्ट) accidents अपघात

There was an accident on the main road.

मुख्य रस्त्यावर एक अपघात झाला.

across (अक्रॉस्) या बाजूकडून त्या बाजूकडे. समोरच्या बाजूला. पलीकडच्या बाजूला

 She took the little boy across the road.

त्या छोट्या मुलाला ती रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला घेऊन गेली.

act (अॅक्ट) acts acting acted १. कृती करणे : Listen and act.

 ऐका आणि कृती करा.

 २. अभिनय करणे. नाटकात, सिनेमात काम करणे :

She acted in the school play last year.

गेल्या वर्षी तिने शाळेच्या नाटकात काम केले.

 • actor (अॅक्टर / अॅक्टर) नट actress (अॅक्ट्रस) नटी


action (अंक्श्न) actions कृती:

Listen carefully and find the picture that shows the action.

 काळजीपूर्वक ऐका आणि ती कृती दाखवणारे चित्र शोधा.

add (अॅड) adds adding अड्डेड

 १. भर घालणे. मिसळणे:

Add a spoonful of sugar.

एक चमचा साखर घाला.

 Add three more words to the list.

या यादीत तीन शब्दांची भर घाला.

 २. बेरीज करणे :

You get five if you add two and three.

दोन आणि तीन यांची बेरीज केली तर पाच येतात.

address (अड्रेस) addresses पत्ता:

Write your name and address on the card. कार्डावर तुमचे नाव आणि पत्ता लिहा.

advertisement (अइव्हर टिस्मन्ट) advertisements जाहिरात , There weremany advertisements in the newspaper.


aeroplane (एअराप्लेऽन्) aeroplanes विमान:


We saw an aeroplane flying in the sky. आम्ही आकाशात उडणारे एक विमान पाहिले.


afraid (अफ्रेड/अफ्रेऽड्) एखादया गोष्टीला घाबरत किंवा भीत असलेला: I am not afraid of dogs. मी कुत्र्यांना घाबरत नाही.


after (आफ्टऽ/आफ्टर) १. नंतर After some time, he saw the giants. काही वेळानंतर त्याला ते राक्षस दिसले. २. पाठोपाठ Read aloud after the teacher. शिक्षकांपाठोपाठ मोठ्याने वाचा. ३. ओळीने लावलेल्या / येणाऱ्या गोष्टींचा क्रम सांगताना 'पुढचे', 'नंतर येणारे' अशा अर्थाने वापरला जाणारा शब्द: The letter 'c' comes after 'b'. 'बी' नंतर 'सी' हे अक्षर येते. ४. मागे. एखादी गोष्ट गेली असेल त्याच दिशेने The cat ran after the mouse. मांजर उंदरामागे धावले.


afternoon (आफ्टनून) afternoons दुपार: It was very hot in the afternoon. दुपारी खूप उकाडा होता.


afterwards (आफ्टवइझ) थोड्या वेळाने. नंतर We will go there afterwards. आपण तिकडे थोड्या वेळाने जाऊ.


again (अगेऽन्/अगेन्) पुन्हा. परत Rain, rain, come again. पावसा, पावसा, पुन्हा ये. again and again पुन्हा पुन्हा.


against (अगेन्स्ट्) १. विरुद्ध Our team will play against their team. आमचा संघ त्यांच्या संघाविरुद्ध खेळेल. २. टेकून. टेकवून: He put the board against the wall. त्याने फळी भिंतीला टेकवून ठेवली.


ago (अगोड) पूर्वी : 1 came home two hours ago. मी दोन तासांपूर्वी घरी आलो. long, long ago फार फार वर्षांपूर्वी.


ahead (अहेइ) पुढे. समोर Look straight ahead. सरळ समोर बघा.



air (एअ/एअर) हवा There is air all around us. आपल्याभोवती सगळीकडे हवा असते.


alive (अलाइव्ह) जिवंत Once I caught a fish alive. एकदा मी एक जिवंत मासा पकडला.


all (ऑडल) ९. सर्व. सगळे They all started laughing. ते सगळे हसायला लागले. She ate up all the grapes, तिने सगळी द्राक्षे खाऊन टाकली. २. पूर्ण. सारा, अख्खा. सगळा It was a holiday. Raju played all day. तो सुट्टीचा दिवस होता. सारा दिवस राजू खेळत होता.


alone (अलोऽन्) एकटा The poor parrot was alone in the cage. बिचारा पोपट पिंजऱ्यात एकटा होता.


along (अलॉग) १. एखादया गोष्टीच्या कडेने, कडेकडेने किंवा त्यावरून You will see a small shop if you walk along this road. या रस्त्याने चालत गेलात, तर तुम्हांला एक छोटे दुकान दिसेल. २. तसेच पुढे : And so the engine speeds along. आणि इंजिन तसेच धावत पुढे जाते. Come along. चल माझ्याबरोबर.


aloud (अलाउइ) मोठ्याने Read the words aloud. शब्द मोठ्याने वाचा.


alphabet (अॅल्फबेट) एखाद्या भाषेतील सर्व मुळाक्षरांची क्रमवार यादी. वर्णमाला: Say the letters of the alphabet from 'a' to 'z'. वर्णमालेतील अक्षरे 'a' पासून 'z' पर्यंत म्हणा. alphabetical order वर्णमालेतील अक्षरांचा ठरलेला क्रम.


एकेका अक्षराला letter (लेटर) म्हणतात, alphabet (अॅल्फबेट) नाही.


also (ऑडल्सोऽ) सुद्धा, देखील I can read and write Marathi and also English. मला मराठी लिहिता-वाचता येतं आणि इंग्रजीसुद्धा.


always (ऑडल्वेऽङ) नेहमी. कायम There were always some letters in the postbox. पोस्टाच्या पेटीत नेहमी काही पत्रे असायची.


am (म्/अम, जोर देऊन म्हटल्यास अॅम्) be पहा. स्वतःबद्दल बोलताना वापरला जाणारा शब्द. आहे : I am reading. मी वाचतो आहे. I am thin. मी लुकडा आहे.


I am हे शब्द काही वेळा थोडक्यात I'm असेही लिहितात.


among (अभंग) १. पुष्कळ लोकांच्या किंवा गोष्टींच्या मध्ये He hid among the trees. तो झाडांमध्ये लपला. २. त्यांमध्ये. त्यांपैकी There were some roses among the flowers. त्या फुलांपैकी काही फुले गुलाबाची होती. ३. आपसात Don't talk among yourselves. तुम्ही आपसात 'बोलू नका. ४. सगळ्यांना, प्रत्येकाला मिळेल असे Divide the apple among all four of you. हे सफरचंद तुम्ही चौघेही वाटून घ्या.




Besiny's Beve


या पानावरचे प्राणी डिक्शनरीतून शोधून काढा.


an (न/अन्, जोर देऊन म्हटल्यास अॅन्) व पहा.


and (न/अन्/अन्ड, जोर देऊन म्हटल्यास अॅन्ड) आणि I keep the books, cards and charts in this cupboard. मी पुस्तके, कार्ड आणि तक्ते या कपाटात ठेवतो. The king got angry and took the mouse's cap. राजा रागावला आणि त्याने उंदराची टोपी घेतली.


angle (अँग्ल) angles कोन: There are three angles in a triangle. त्रिकोणाला तीन कोन असतात.


L


angry (अँग्रि) रागावलेला. संतापलेला Are you angry with me? तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? The angry man stamped his foot. त्या रागावलेल्या माणसाने जोरात पाय आपटला.


animal (अॅनिमल) animals प्राणी There are many plants and animals in this world. या जगात अनेक वनस्पती व प्राणी आहेत.


ankle (ॲक्ल) ankles घोटा The water on the street came up to my ankles. रस्त्यातले पाणी माझ्या घोट्यापर्यंत आले.


another (अनुदऽ /अनुदर) दुसरा एखादा. आणखी एखादा We'll play another game. आपण दुसरा एखादा खेळ खेळू.


answer (आन्सड / आन्सर) answers answering answered उत्तर देणे : He answered my question. त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले.


answer (आन्सउ / आन्सर) answers उत्तरे Listen carefully and write the answer. काळजीपूर्वक ऐका व उत्तर लिहा.


ant (अॅन्ट) ants मुंगी: Ants work very hard. मुंग्या खूप काम करतात. -


antenna (अॅन्टेनड) antennas/antennae १. फुलपाखरे, झुरळ वगैरे कीटकांच्या डोक्यावर असणाऱ्या लांब, बारीक मिश्या The butterfly shook its antennas. त्या फुलपाखराने आपल्या मिश्या हालवल्या. २. रेडिओ किंवा टीव्ही वगैरेंसाठी उभारलेले संदेशवाहक उपकरण, अँटेना: There was a bird sitting on the TV antenna. टीव्हीच्या अँटेनावर एक पक्षी बसलेला होता.


any (एन) १. कोणतेही : You can choose any letter. तुम्ही कोणतेही अक्षर निवडू शकता. Say any poem. कोणतीही एक कविता म्हणguests

२. प्रश्न विचारताना 'काही', 'थोडेफार' अशा अर्थाने वापरला जाणारा शब्द : Have you any wool? तुझ्याकडे थोडीफार लोकर आहे का ? Have you got any marbles ? तुझ्याकडे काही गोट्या आहेत का ? ३. अजिबात. थोडेसुद्धा. एकही 1 don't have any money. माझ्याकडे थोडेसुद्धा पैसे नाहीत. He didn't have any pencils. त्याच्याकडे एकही पेन्सिल नव्हती.


anybody (एनिवडी) १. कोणी, कुणाला, कोणाचे, कोणाकडे इत्यादी Is there anybody inside ? आत कोणी आहे का ? Does anybody know the answer ? कुणाला उत्तर माहीत आहे का? २. प्रश्न विचारताना 'एकजण तरी, एकाने तरी, एकाला तरी' इत्यादी अर्थांनी वापरला जाणारा शब्द : Did anybody help him ? त्याला एकाने तरी मदत केली का ? ३. कोणीही, कोणालाही इत्यादी Anybody can go there. तिथे कोणीही जाऊ शकेल. Don't pinch anybody. कुणालाही चिमटे काढू नकोस.


Brainy's Box


anyone (एनिवन्) अर्थ आणि वापर anybody प्रमाणे.


या चौकटीत एकूण किती शब्द आहेत, ते सागा.


body one


any thing where


anything (एनिथिंग) १. कोणतीही गोष्ट. काहीही. पाहिजे ते. हवे ते: You can draw anything. तुम्ही पाहिजे ते काढू शकता. २. काहीच But I didn't do anything. पण मी काहीच केले नाही.


An elephant can


anywhere (एनिवेअ/ एनिवेअर) कोठेही shoot the water in its trunk anywhere. हत्ती आपल्या सोंडेतील पाणी कोठेही जोरात मारू शकतो.


apple (अॅप्ल) apples सफरचंद Bansi bought red, juicy apples. बन्सीने लाल, रसाळ सफरचंदे विकत घेतली. कधीकधी are हा शब्द


लिहितात we're


are (२/अर, जोर देऊन म्हटल्यास आड/आर) be पहा. १. आहोत : We are going on a picnic. आम्ही सहलीला चाललो आहोत. २. आहात: What are you doing? तुम्ही काय करत आहात ? ३. आहेत: They are playing. ते खेळत आहेत. थोडक्यात 're असाही


you're they're


arm (आऽम्/आर्म) arms खांदयापासून हातापर्यंतचा भाग. हात. बाहू. भुजा: Fold your arms. हाताची घडी घाला.


army (आऽमि/आर्मि) armies सैन्य. लष्कर Her brother is in the army. तिचा भाऊ सैन्यात आहे.


around (अराउन्ड्) १. भोवती Run around the tree. झाडाच्या भोवती पळा. २. उलट दिशेला तोंड होईल अशा रीतीने. पाठीमागच्या बाजूस : Turn around.


पाठीमागे वळा. ३. एखादया जागेत सगळीकडे She took the guests.


around the school. ती पाहुण्यांना शाळेत सगळीकडे घेऊन गेली. ४. आसपास. जवळपास There was no one around. तेथे आसपास कोणीच नव्हते.


arrange (अरेऽन्न) arranges arranging arranged व्यवस्था करणे. नीट लावणे: Arrange the books on the shelf. पुस्तके फळीवर नीट लावून ठेवा.


arrow (अॅरोड) arrows बाण The arrow had six feathers at the other end. बाणाच्या दुसऱ्या टोकाला सहा पिसे होती.


Brainy's Box


art (आउद्/आई) arts कला: Drawing is an art. चित्र काढणे ही एक कला आहे.


as fresh as a १ as small as an as bright as a


artist (आऽटिस्ट/आर्टिस्ट) artists चित्रकार, कलाकार Our teacher is a good artist. आमचे गुरुजी चांगले चित्रकार आहेत.


as (अझ, जोराने म्हटल्यास अॅझ) ९. तसे. त्याप्रमाणे. त्यासारखे Do as I say. मी सांगेन तसे करा. २. 'जितके... तितके', 'जेवढ्या ... तेवढ्या' अशा अर्थाने 'as as' हे शब्द वापरले जातात: As fast as you can. जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर. Find as many words as you can. जेवढे शब्द शोधता येतील तेवढे शोधा. ३. एखादया गोष्टीएवढा. तसा green as grass गवतासारखा हिरवागार, ⚫ as gentle as a feather. पिसाएवढा हळुवार.


४. अमुक म्हणून. त्या दृष्टीने. त्या नात्याने As a friend


you should help her. मैत्रीण म्हणून तू


तिला मदत करायला हवीस.


ask (आस्कृ) asks asking asked विचारणे The children liked to ask questions. मुलांना प्रश्न विचारायला आवडे. ask for मागणे What will you ask for ? तू काय मागशील ?


& Brainy's


एकच शब्द वापरा आणि सगळी वाक्ये पूर्ण करा :


Look ..... that bird. I go to bed... 10.


The dog barked the cat


Take one card ..... a time.


6


asleep (अस्लीप्) झोपलेला Lazy Mary was fast asleep. आळशी मेरी गाढ झोपलेली होती.


at (अट्ट, जोर देऊन म्हटल्यास अॅट्) १. विशिष्ट जागा किंवा स्थान दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द: There is a small yard at the back. मागच्या बाजूला एक छोटे अंगण आहे. २. एखादया गोष्टीकडे. त्या बाजूला. त्या दिशेने Look at the moon. चंद्राकडे पहा. He threw stones at the


giants. त्याने त्या राक्षसांना दगड मारले.


३. किती वाजता किंवा कोणत्या वेळी, केव्हा हे दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द: 1 get up at 7.30. मी ७.३० ला उठतो. We buy new clothes at Diwali. दिवाळीच्या वेळी आम्ही नवे कपडे खरेदी करतो.

4.








एखादया गोष्टीची किंमत किंवा दर किंवा वेग वगैरे सांगताना वापरला जाणारा शब्द: I bought the bananas at 1 rupee each. मी रुपयाला एक या दराने केळी विकत घेतली. She drove the car at the speed of 80 kilometres. तिने ८० किलोमीटर वेगाने गाडी चालवली. • Speak one at a time. एका वेळी एकानेच बोला.


ate (एड्ट्)


eat पहा.


attack (अटॅक) attacks attacking attacked हल्ला करणे The tiger attacked the buffalo. वाघाने म्हशीवर हल्ला केला.


attention (अटेन्शन) लक्ष Pay attention, everybody, प्रत्येकाने लक्ष क्या. Attention! सावधान !


aunt (आन्ट्) aunts काकू/आत्या/मामी/मावशी My aunt knows many stories. माझ्या मावशीला खूप गोष्टी माहीत आहेत.


awake (अवेऽक) झोपेतून जागा झालेला किंवा जागा असलेला : Is the baby awake? बाळ जागे आहे का ?


away (अवेड) १. दूर. लांब The little bird flew away. तो छोटा पक्षी दूर उडून गेला. २. अंतर किंवा काळ दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द : The hospital was two kilometres away. दवाखाना दोन किलोमीटरवर होता. Diwali is just one week away. दिवाळी फक्त एक आठवड्यावर आली.


axe (अॅक्स) axes कुऱ्हाड He cut the log with an axe. त्याने कुऱ्हाडीने त्या ओंडक्याचे तुकडे केले.


baa (बाs) मेंढीच्या ओरडण्याचा आवाज.


baby (बेऽचि) babies बाळ. अगदी छोटे मूल Baby took its first step today. बाळाने आज पहिले पाऊल टाकले.


back (बॅक्) १. परत Go back to your classroom. तुमच्या वर्गात परत जा. Give me back my pencil. माझी पेन्सिल मला परत दे. २. मागे. पाठीमागे Go back two steps. दोन पावले मागे जा.


back (बँक) backs १. मागची बाजू We were sitting at the back. आम्ही मागच्या बाजूला बसलो होतो. २. पाठ: He put the bundles on the donkey's back. त्याने ती गाठोडी गाढवाच्या पाठीवर ठेवली.


bad (बॅड) वाईट: The giants were very bad. ते राक्षस फार वाईट होते.


badge (चेंज) badges बिल्ला We all wear a school badge. आम्ही सगळेजण शाळेचा बिल्ला लावतो.